प्रत्येक शाळेत भरणार इंग्रजी माध्यमातून पदविका पूर्ण केलेला शिक्षक? शासन निर्देश.

पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसह बिगर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळांवर शासन निर्णय, दिनांक १९.०६.२०१३ मधील तरतूदीनुसार इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका (डिएड/डी.टिएड) प्राप्त शिक्षकांची प्राधान्याने उपलब्धता करुन घेणेबाबत दिनांक दहा जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणमंत्री पुढील प्रमाणे आयुक्त शिक्षण यांना निर्देश दिले आहेत.


काही सन्माननीय लोकप्रतिनिधी, विविध संघटना व इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविकाधारक उमेदवार यांच्याकडून निवेदने प्राप्त झालेली आहेत. त्यानुषंगाने संदर्भ क्र. ३ येथील संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडून व संदर्भ क्र. ४ येथील पत्रान्वये आपल्या कार्यालयाकडून शासनास प्राप्त अहवाल विचारात घेता, इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविकाधारक उमेदवारांना यापूर्वी रद्द केलेले २० टक्के आरक्षण पूर्ववत करणे शक्य होणार नाही.


२. बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शाळा सुरु करण्यास परवानगी देताना, संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णय, दिनांक १९.६.२०१३ मधील अट क्रमांक ३- सेमी इंग्रजी शाळेकरीता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका (डिएड/डी.टिएड) धारक असणे आवश्यक राहील, अशी अट शासनाने विहीत केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे तरतूद विहीत असताना केवळ अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारक शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यापुढे इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारक शिक्षकाअभावी कोणतीही सेमी इंग्रजी माध्यम शाळा बंद पडणार नाही यांची दक्षता सक्षम प्राधिकारी यांनी घ्यावी. तसेच, अशा सेमी इंग्रजी शाळांमध्ये शासन निर्णय, दिनांक १९.६.२०१३ मध्ये विहीत उपरोक्त नमूद अटीनुसार मंजूर पदांपैकी किमान एका इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविकाधारक (डिएड/डी.टिएड) शिक्षकाची नियुक्ती झाल्याची खातरजमा करावी. याप्रमाणात असे शिक्षक उपलब्ध नसल्यास, जेवढ्या सेमी इंग्रजी शाळा असतील किमान तेवढे इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविकाधारक (डिएड/डी. टिएड) शिक्षक उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची असल्याने, चालू भरती प्रक्रिया २०२२ पासून अशा शिक्षकांची मागणी नोंदवून ती प्राधान्याने उपलब्ध करुन घेणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने तशी मागणी पवित्र पोर्टलवर नोंदविण्यासंदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह बिगर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेच्या संबंधित सक्षम प्राधिकान्यांना आपल्या स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, ही विनंती.


आपला,

(द. छ. शिंदे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन





वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.