सन २०२६-२७ च्या संचमान्यता अनुषंगाने कामकाजाबाबत शिक्षण संचालक आदेश २/९/२०२६

सन २०२६-२७ च्या संचमान्यता अनुषंगाने कामकाजाबाबत शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक यांनी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे 

क्र. शिसंमा/२०२६-२७/सरल प्रणाली/टि-८/ई-३०८३२९१/परिपत्रक

दिनांक : स्वाक्षरी खाली नमूद

प्रति, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम/उत्तर/दक्षिण) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व) केद्रप्रमुख (सर्व)

विषय :- सन २०२६-२७ च्या संचमान्यता अनुषंगाने कामकाजाबाबत...

उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२५-२६ च्या संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ व शासनस्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्राची संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ च्या सुधारित संचमान्यता निकषांनुसार यु-डायस पोर्टलवरील नोंद असलेल्या दि.३० सप्टेंबर, २०२६ रोजी पटावर नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येनुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सन २०२६-२७ च्या योग्य संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने यु-डायस पोर्टल व सरल पोर्टलवरील शाळा, तुकडी, माध्यम, शाळा व्यवस्थापन प्रकार, कार्यरत पदे, विद्यार्थी तपशिल, विद्यार्थी आधार प्रमाणिकरण व इतर माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे.

तद्नुषंगाने सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी तपशील, सरल व यु-डायस पोर्टलवरील तपशील क्षेत्रीयस्तरावरील यंत्रणेच्या सहयोगाने दि.१६.०९.२०२६ पूर्वी अद्यावत करण्याची कार्यवाही करावी.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्राची यु-डायस पोर्टल व सरल पोर्टलवरील शाळा, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी तपशील, विद्यार्थी आधार प्रमाणिकरण या व इतर आवश्यक माहिती अद्यावत करतांना एकसमान राहील, याबाबत दक्षता घेण्यात यावी.


Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 01-09-2026 19:13:09

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 01-09-2026 19:03:04

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीसाठी :-

विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)

/- यांनी विषंयाकित प्रकरणी आपल्या विभागातील कामकाज विहित मुदतीत होईल याबाबत दक्षता घेण्यात यावी.


शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत,

पुणे-४११ ००१.

दुरध्वनी: (०२०) २६१२५६९२/९४ क्रः प्राशिसं/समायोजन/२०२६/टे-५०२/

E mail-depmah2@gmail.com

दिनांक : स्वाक्षांकित दिनांक

प्रति,

१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, (सर्व)

२. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा/नप, (सर्व)

विषय : अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत.

संदर्भ : १. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४

२. संचालनालयाचे पत्र क्रमांक शिसंमा २०२५-२६/समायोजन/टि-८८/१७०४०८८, दि.०४.०२.२०२६

३. संचालनालयाचे पत्र क्रमांकः प्राशिसं/समायोजन/२०२६/टे-५०२/१८७४११, दि.३०.०४.२०२६

४. संचालनालयाचे पत्र क्रमांकः प्राशिसं/समायोजन/२०२६/टे-५०२/१८७९०९, दि.०५.०५.२०२६

५. संचालनालयाचे पत्र क्रः प्राशिसं/समायोजन/२०२६/टे-५०२/१९०८०६३ दि.१९.०५.२०२६

६. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/समायोजन/२०२६/टे-५०२/१९३१८११ दि.०१.०६.२०२६

७. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/समायोजन/२०२६/टे-५०२/२००६००० दि.०७.०७.२०२६

८. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/समायोजन/२०२६/टे-५०२/२०३८५७८ दि.२३.०७.२०२६

उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भ क्र.५ दि.१९.०५.२०२६, संदर्भ क्र.६ दि.०१.०६.२०२६, संदर्भ क्र.७दि.०७.०७.२०२६ व संदर्भ क्र.८ दि.२३.०७.२०२६ रोजीच्या पत्राचे अवलोकन करण्यात यावे.

उक्त प्रकरणी आपणांस कळविण्यात येत आहे की, शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२४ अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती निर्गमीत केली आहे.

शासन निर्णय १५ मार्च, २०२४ मधील मुद्दा क्र.३ (१०) नुसार सदरील कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही जे कर्मचारी समायोजीत ठिकाणी हजर होणार नाहीत, अशा न हजर न होणा-या कर्मचा-यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये. व त्यांचे विरूद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच, ज्या शाळांनी अशा समायोजनानुसार अतिरिक्त कर्मचा-यांना हजर करून घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली असल्यास त्या शाळेचे सदर पद व्यपगत करावे व शालार्थ प्रणालीनुसार असे पद काढून टाकावे. असे पद शासनाच्या मान्यतेशिवाय पुनर्जिवित करण्यात येवू नये, असे तरतूद आहे.

त्या अनुषंगाने सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या समायोजन झालेल्या शिक्षकांना संबंधित शाळेने रुजु करून घेतले नसलेल्या शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२४ गुदा क्र.३ च्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल संचालनालयास सादर करावा.

तसेच, सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे तसेच समायोजन न झालेल्या शिक्षकांचे तातडीने अन्य शाळांमध्ये शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२४ मधील तरतुदींनुसार समायोजन करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.


Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 13-08-2026 13:40:11

(शरद गोसावी) 

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.


सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर समायोजनाबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक सहा एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

क्र. : शिसंमा-२०२६/समायोजन/टि-८ ब/1830033 

दिनांक : 06 APR 2026

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प (सर्व)

३. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) बृहन्मुंबई.

विषय: सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर समायोजनाबाबत..

संदर्भ : १. शासन निर्णय क्र. एयएवएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टिएनटी-२ दि.१५.०३.२०२४

२. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/२०२५-२६/समायोजन/टि-८ व/१७०४०८८ दि.०४.०२.२०२६

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विदयालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करणेबाबत संचालनालयाचे संदर्भक्र. अन्वये कार्यवाही करणेबाबत आपणांस अवगत करण्यात आले होते.

१. शुन्य शिक्षक/शिक्षकेत्तर पदे मंजूर असणा-या शाळेमधील शिक्षक-शिक्षकेत्तर अतिरिक्त कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरु असून सदर शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल २०२६ मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विदयार्थ्यांच्या परिक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झालेनंतर व शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हजर व्हायचे.

२. कार्यरत शिक्षकेत्तर वर्ग-४ चे कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळांमधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग-४ चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येईल. (शासन निर्णय दि.२७.०१.२०२६ मधील क मधील (२) ज्या पदांवर नियमित चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत, अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये अशी तरतुद आहे).

सबब आपणांस कळविण्यात येते की, ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे समायोजन झालेबाबतची माहिती तसेच समायोजन झाले नाही अशा कर्मचा-यांची माहिती संबंधित शिक्षण उपसंचालक यांचेकडे व संचालनालयास दि.०६.०४.२०२६ पर्यंत कळविण्यात यावी तसेच ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन विभाग स्तरावर करावयाचे असल्यास त्यासंबंधीतील माहिती संचालनालयास दि.०६.०४.२०२६ अन्वये सादर करावी.


Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 06-04-2026 17:45: 

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

 (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१.


सन २०२५-२६ च्या संचमान्यतेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 24 मार्च 2024 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

क्रमांक : एसएसएन-२०१५/प्र.क्र. (१६/१५)/टिएनटी-२ प्रति,

दिनांक : २४/०३/२०२६

१) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : सन २०२५-२६ च्या संचमान्यतेबाबत

संदर्भ :-

१) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिउसं/संचमान्यता/२०२४-२५/टि-८/२५६३, दि.२६.०५.२०२६

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क. शिउस/२०२४-२५/टि-४/०३८०८, दि.२३.०७.२०२५.

३) शासन पत्र क्र. बैठक-२०२६/प्र.क्र.५५/टिएनटी-२, दि.१८.०३.२०२६

शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२४ मधील तरतुदीच्या अनुषंगाने गट ९-१० साठी शिक्षक मंजूरीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.१ अन्वये शासनास विकल्प सादर करण्यात आले होते. तसेच, मट ९-१० मध्ये ० शिक्षक अनुज्ञेय झालेल्या शाळांची पटसंख्यानिहाय व नजिकच्या शाळांसोबतची अंतरनिहाय माहिती संदर्भ क. २ अन्वये सादर करण्यात आली आहे.

२. शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२४ मधील संचमान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.२४.०२.२०२६ रोजी त्यांचे मंत्रालयीन दालन क्र. ७०२, सातवा मजला (विस्तार), मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त संदर्भ क्र.३ अन्वये आवश्यक कार्यवाहीस्तव निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने शासन निर्णय दि. १५.०३.२०२४ मधील गट ९-१० च्या अनुषंगाने आपणांस खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे:

१. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ते ३ किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी.

२. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ३-५ किलोमीटर परिसरात असणा-या व त्या परिसरात माध्यमिक शाळांत इ.९ ते १० वी गटाकरिता ० पदे मंजूर होणा-या शाळांमध्ये इ. ९-१० वी च्या गटामध्ये संचमान्यता वर्ष २०२५-२६ मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या ४० असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे.

३. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ५ किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील त्याच माध्यमाची माध्यमिक शाळा उपलब्ध आहे, परंतु त्या परिसरात माध्यमिक शाळांत इ.९ ते १० च्या गटाकरिता ० पदे मंजूर होणा-या शाळांमध्ये इ. ९-१० वी च्या गटामध्ये संचमान्यता वर्ष २०२५-२६ मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या ३० असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे.

४. वरीलप्रमाणे सन २०२५-२६ च्या संचमान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ एका वर्षासाठी देण्यात येत आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये.


24.3.26 

(आबासाहेब काळे)

 उप सचिव, महाराष्ट्र शासन.




शासन निर्णय दि. १५ मार्च, २०२४ मधील संचमान्यतेच्या तरतूदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आयोजित बैठक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक : १८.०३.२०२६ नवीन निर्देश पुढील प्रमाणे. 

प्रति,

१) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय :- शासन निर्णय दि. १५ मार्च, २०२४ मधील संचमान्यतेच्या तरतूदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आयोजित बैठक.

उपरोक्त विषयांकीत प्रकरणी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.२४.०२.२०२६ रोजी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे मंत्रालयीन दालन क्र. ७०२, सातवा मजला (विस्तार), मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त आवश्यक कार्यवाहीस्तव सोबत जोडले आहे.


18.3.28 

(ओबासाहेब कवळे) 

उप सचिव, महाराष्ट्र शासन.


सोबत : वरीलप्रमाणे

प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीस्तव,

१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

२) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व).

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व).

प्रत माहितीस्तव,

१) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव.

२) मा. मंत्री (उद्योग, मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव.

३) मा. मंत्री (मत्स्य व्यवसाय व बंदरे) यांचे खाजगी सचिव

४) मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, वि.प.स. यांचे स्वीय सहायक

५) प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), मंत्रालय यांचे स्वीय सहायक.

६) उपसचिव, (टिएनटी) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, यांचे स्वीय सहायक.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग/टिएनटी-२

मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त

अ. क्र.

विषय

मा. मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश

कार्यवाहीशी संबंधित अधिकारी


१) प्राथमिक गटातील १ ली ते ५ वीच्या रिक्त पदांवर अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकाचे समायोजन करणे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील १ ली ते ५ वीच्या गटामधील रिक्त पदांवर त्याच जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या ६ वी ते ८ वी गटातील शिक्षकाचे शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदींनुसार समायोजन करण्यात यावे. अशी कार्यवाही करताना सदर शिक्षकांच्या मूळ पदावरील वेतनास संरक्षण राहील.

कार्यकारी अधिकारी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य


मराठी/उर्दू शिक्षकांची त्यांच्या माध्यम नसलेल्या शाळांमध्ये नेमणूक झालेली असल्यास त्याबाबत करावयाची कार्यवाही.

मराठी/उर्दू शिक्षकांचे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्याशी संबंधित माध्यम असलेल्या शाळांमधील पदांवर शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदींनुसार समायोजन करण्यात यावे.

१. शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे

२. शिक्षण संचालक (माध्यमिक उच्च माध्यमिक), पुणे


३) शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील इ. ९-१० वी च्या पटसंख्येमध्ये सवलत देणेबाबत.

१) शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून० ते ३ किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी.


२) शासन निर्णय दि. १५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ३-५ किलोमीटर परिसरात असणा-या व त्या परिसरात माध्यमिक शाळांत इ.९ ते १० वीच्या गटाकरिता ० पदे मंजूर होणा-या शाळांमध्ये इ. ९-१० वी च्या गटामध्ये संचमान्यता वर्ष २०२५-२६ मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या ४० असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे.

३) शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ५ किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील त्याच माध्यमाची माध्यमिक शाळा उपलब्ध आहे, परंतु त्या परिसरात माध्यमिक शाळांत इ.९ ते १० च्या गटाकरिता ० पदे मंजूर होणा-या शाळांमध्ये इ. ९-१० वी च्या गटामध्ये संचमान्यता वर्ष २०२५-२६ मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या ३० असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे.

४) वरीलप्रमाणे सन २०२५-२६ च्या संचमान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ एका वर्षासाठी देण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये.

शिक्षण संचालक (माध्यमिक उच्च माध्यमिक), पुणे




शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 18 मार्च 2026 रोजी अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर समायोजनाबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

18 MAR 2026

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व), 

शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व), 

शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) बृहन्मुंबई

विषय :- अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर समायोजनाबाबत.

सन २०२५-२६ संचमान्यता कामकाज शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व शाळा स्तर यांच्या लॉगीनला विद्यार्थी, कार्यरत पदे, माध्यम, अनुदान प्रकार, वर्ग व शाखा इ. नमूद नसणे या कारणामुळे संच मान्यता झालेल्या नसल्याचे दिसून येते. विविध स्तरावर अशा १६०० शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते.

आपणास सूचना देण्यात येते की, सन २०२५-२६ च्या संचमान्यता प्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करावे. याबाबत निर्देश यापूर्वी देण्यात आलेले आहेत. तातडीने सन २०२५-२६ संचमान्यतेचे कामकाज पूर्ण करण्यात यावे. सन २०२५-२६ संचमान्यता उपरोक्त कारणामुळे झाली नसल्यास तात्पुरत्या स्वरुपात मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन २०२४-२५ ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पुर्ण करावी.

सन २०२५-२६ ची संचमान्यता झाली नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत.


Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 18-03-2026 17:40:14

(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक

माध्यमिक व उच्च माध्यमिक


महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दालन क्र. ४३६, मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई-४०००३२

दिनांक : २३.०२.२०२६,

कमांक: बैठक-२०२६/प्र.क्र.५५/टिएनटी-२

बैठकीची सूचना

दिनांक व वारः मंगळवार दि.२४.०२.२०२६

वेळ : दुपारी ०१.०० वा

स्थळ : गा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे विधानभवनातील दालन क्र.१३६-क, पहिला मजला, विधानभवन, मुंबई.


प्रति,

१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी.

३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

४) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.


विषयः- अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत.

उपरोक्त विषयांकीत प्रकरणी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.२४.०२.२०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे विधानभवनातील दालन क्र. १३६-क, पहिला मजला, विधानभवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी, सदर बैठकीस आवश्यक कागदपत्रे व माहितीसह उपस्थित राहण्याची आपणास विनंती करण्यात येत आहे. तसेच, विषयाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती/अभिप्राय वरील ई-मेल आयडी वर किंवा खास दुतामार्फत शासनास आजच सादर करण्यात यावी, ही विनंती.


(विशाल लोहार) 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.


प्रत माहित्तीस्तव तथा आवश्यक कार्यवाहीस्तव,

१) शिक्षण संचालक (प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे.

२) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.

३) विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग / रत्नागिरी/ रायगड / पालघर. आपणांस कळविण्यात येते की, प्रस्तुत प्रकरणी संबंधित अद्ययावत माहितीसह सदर बैठकीस उपस्थित राहावे. तसेच, विषयाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती/अभिप्राय वरील ई-मेल आयडी वर किंवा खास दुतामार्फत शासनास आजच सादर करण्यात यावी, ही विनंती


प्रत माहितीस्तव,

१) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव.

२) मा. मंत्री (उद्योग, मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव.

३) प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), मंत्रालय यांचे स्वीय सहायक.

४) उपसचिव, (टिएनटी) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, यांचे स्वीय सहायक



शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचा अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत आदेश.

दिनांक : 20/02/2026

शुध्दीपत्रक

प्रति, विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (पश्चिम/दक्षिण/उत्तर)

विषय :- सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत...

संदर्भ :

- १. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टिएनटी-२, दि.१५.०३.२०२४

२. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र जा.क्र. शिसंमा २०२५-२६/समायोजन/टी-८, दि.२९.११.२०२५

३. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२५-२६/समायोजन/टि-८ब/१७०४०८८, दि.०४.०२.२०२६

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाचे संदर्भ क्र.३, दि.०४.०२.२०२६ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार रिक्त/ अतिरिक्त पदांची पडताळणी करुन अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजन कार्यवाहीबाबत वेळापत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

संचालनालयाचे संदर्भ क्र.३, दि.०४.०२.२०२६ च्या पत्रामधील परिच्छेद क्र.६ मधील पहिल्या ओळीत नमूद "सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार" ऐवजी "सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार" असे वाचावे.


Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 20-02-2016116:34:05 

शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय)

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date 62-262613:11:48 शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे


04 FEB 2026

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)

शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) बृहन्मुंबई

विषयः- सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत...

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टिएनटी-२, दि.१५.०३.२०२४ २. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र जा.क्र. शिसंमा २०२५-२६/ समायोजन/ टी-०८, दि.२९/११/२०२५

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित / अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विषद केली आहे. तसेच संदर्भ २ अन्वये दिलेली स्थगिती उठविण्यात येत आहे.

सन २०२५-२६ ची संच मान्यता शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.२३.१०.२०२५ रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे डिसेंबर २०२५ मध्ये शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.५४५६/२०२५ दाखल केली असून सदर याचिकेमध्ये मा. न्यायालयाने दि.२३.०४.२०२५

रोजी जैसे-थे आदेश पारित केलेले असल्याने सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होती. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र.५४५६/२०२५ मध्ये मा. न्यायालयाने दि. १४.११.२०२५ रोजीच्या आदेशान्वये शा.नि.दि.१५.०३.२०२४ च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्र.५४५६/२०२५ सह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत.

तद्‌नुषंगाने शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतूदीनुसार सन २०२५-२६ च्या संच मान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी दि.१३.०२.२०२६ पर्यंत घोषित करावी.

तद्नुसार सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतूदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हास्तवरील कार्यवाही दि.०३.०३.२०२६ पर्यंत करावी.

तद्नंतर जिल्हास्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यांनतर रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दि.१०.०३.२०२६ पूर्वी सादर करावी.

विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभागस्तरावर समायोजन प्रक्रिया दि.२५.०३.२०२६ पर्यंत पूर्ण करावी. 

उर्वरित रिक्त पदांचा तपशिल / अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग/ विषय / अनुदानाचा व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास दि. ३१.०३.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत सादर करावा.

दि.०३.०३.२०२६ पर्यंत जिल्हा स्तरावरील आणि दिनांक २५.०३.२०२६ रोजी विभाग स्तरावर समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे / शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, याची नोंद घ्यावी.

शिक्षणाधिकारी माध्यमिक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशिल / अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग/ विषय / अनुदानाचा / व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यामधील तपशिलासह दि. ३१.०३.२०२६ पर्यंत सादर करावा. सदर बाब प्राथमिक/माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे.

उपरोक्त प्रकरणी सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार रिक्त / अतिरिक्त पदांची पडताळणी करुन अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन वरील वेळापत्रकानुसार करण्यात यावे.


SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 04-02-2026 17:08:51

Digitally signed by

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक

प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

Digitally signed byPALKAR MAHESH MADHUKAR Date: 04-02-2026 11:36:21

(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव सविनय सादरः- १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. आयुका (शिक्षणा, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत शिक्षण आयुक्तांनी दिनांक 29 नव्हेंबर 2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ - संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा२०२-४२५/समायोजन/टी-०८/१५५२००९, दि.२०.११.२०२५.

उपरोक्त विषयान्वये मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी दाखल याचिका क्र. ५४५६/२०२५ मधील मा. न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दि. १५.०३.२०२५ अन्वये निर्गमित संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दतीचा अवलंब करुन समायोजना प्रक्रीया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशिल / अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग / विषय / अनुदानाचा/व्यवस्थापनाचा प्रकारासह) संचालनालयास, सादर करणेसाठी संचालनालयाचे पत्र दि. २०.११.२०२५ अन्वये क्षेत्रिय अधिका-यांस कळविण्यात आले होते.

तथापि, सन २०२५-२६ च्या ऑनलाईन संच मान्यताबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्यात असल्याने तसेच सन २०२४-२५ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त झागलेले शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रीया माहे. डिसेंबर, २०२५ मध्ये राबविणे व सन २०२५२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रीया संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रीया राबविण्याऐवजी सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झालेनंतरच समायोजन प्रक्रीया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांचे स्तरावरुन दि. २०.११.२०२५ च्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबतच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे.

तसेच सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झालेनंतर विहित कार्यपध्दतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजना करण्यात यावे.


Digitally signed by

Sachindra Pratap Singh Date: 29-11-2025 22:56

आयुक्त 

(शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे ०१.


सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी दिनांक 20 नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ:

1. शासन निर्णय क्रमांक एसएसएन-2017/(प्र.क्र.22/17)/टिएनटो-2, दि. 15.03.2024 2. सन 2024-25 संच मान्यता

उपरोक्त विषयाचाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे.

सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.30.09.2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025 च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सदर सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित) व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दि. 13.05.2025 पर्यंत पूर्ण करणेस्तव संचालनालयाचे दि. 28.04.2025 च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.5456/2025 दाखल केली असून सदर याचिकेमध्ये मा. न्यायालयाने दि. 23.04.2025 रोजी जैसे-थे आदेश पारित केलेले असल्याने सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होती.

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र.5456/2025 मध्ये मा. न्यायालयाने दि.14.11.2025 रोजीच्या आदेशान्वये शा.नि.दि. 15.03.2024 च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्र.5456/2025 सह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत.

तद्नुषंगाने शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील तरतुदीनुसार सन 2024-25 च्या संच मान्यतंन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दि.05.12.2025 पर्यंत पूर्ण करावी.

तसेच, संचालनालयाचे पत्र क्र.1481616, दि.09.10.2025 अन्वये सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजनाबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

तद्‌नुसार सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील तरतूदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दि.05.12.2025 पर्यंत करावी.

जिल्हास्तरीय समायोजनाबाबत दिलेल्या कालमयर्यादित समायोजन प्रक्रियेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, याची नोंद घ्यावी.

तद्नंतर जिल्हास्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा/अतिरिक्त शिक्षक कर्मचारी (असल्यास) यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दि.08.12.2025 पूर्वी सादर करावी.

विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे विभागस्तरावर समायोजन प्रक्रिया दि. 19.12.2025 पर्यंत पूर्ण करावी. व उर्वरित रिक्त पदांचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास दि.22.12.2025 पूर्वी सादर करावा. दिनांक 19.12.2025 रोजी विभागस्तरावर समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरौत झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, याची नोंद घ्यावी.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रीया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करुन विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पर्दाचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यामधील तपशिलासह दि.22.12.2025 पूर्वी सादर करावा. सदर बाब प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे.


Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 20-11-2025 14(5)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date 6:57:01

शिक्षण संचालक

प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे


प्रत माहितीस्तव सविनय सादर 1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई -32

2. मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-01


सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत  शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 27 मे 2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे.

सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.30.09.2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025 च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सदर सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शासनास सादर करावयाची आहे. त्यानुषंगाने एकूण अतिरिक्त ठरलेल्या माध्यमनिहाय शिक्षकांची संख्या आणि माध्यमिक विभागातील जिल्हानिहाय आणि विषयनिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती दि.28.05.2025 पर्यंत संचालनालयास सादर करावी.


 (डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव : प्रशासन अधिकारी (प्रशासन), शिक्षण आयुक्तालय, म.रा.पुणे




सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजन बाबत  शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे.

सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.30.09.2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025 च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सदर सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित) व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दि. 13.05.2025 पर्यंत पूर्ण करावी.

दिनांक 13.05.2025 रोजी समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

तनंतर जिल्हास्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा/अतिरिक्त शिक्षक कर्मचारी (असल्यास) यांची यादी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दि. 15.05.2025 पूर्वी सादर करावी.

विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दि.22.05.2025 पर्यंत पूर्ण करावे. व उर्वरित्त रिक्त पदांचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास दि.25.05.2025 पूर्वी सादर करावा. दिनांक 22.05.2025 रोजी विभागस्तरावर समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार समायोजन प्रक्रीया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करुन विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास सोबत जोडलेल्या नमून्यामधील तपशिलासह दि.25.05.2025 पूर्वी सादर करावा.

सदर बाब माध्यमिक/ उच्च माध्यमिक दोन्ही स्तरासाठी लागू आहे.


(डॉ. श्रीराम पानझाड) 

प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे ती पुढील प्रमाणे.


वाचा :- १) शासन परिपत्रक क्रमांक व्हिएलएस-१४१२/३६९/१२)/प्राशि-३, दि.०४ डिसेंबर, २०१२.

२) शासन परिपत्रक क्रमांक एसएसएन-२०१४/प्र.क्र.५/१४/टीएनटी-२, दि.२८ नोव्हेंबर, २०१४. ३) शासन परिपत्रक क्रमांक एसएसएन-२०१६/प्र.क्र.४७/१६/टीएनटी-२, दि.०२ ऑगस्ट, २०१६.

४) शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१७/प्र.क्र.(२२/१७/टीएनटी-२. दि.०४ ऑक्टोंबर, २०१७.

५) शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१९/प्र.क्र.१११/१९/टीएनटी-२, दि. १२ डिसेंबर, २०२२


प्रस्तावना :-

राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती दिनांक ४ डिसेंबर, २०१२ व दिनांक २८ नोव्हेंबर, २०१४ च्या परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आली आहे. तसेच, शासन निर्णय दि.०२.०८.२०१६ व दि.०४.१०.२०१७ अन्वये सुधारित कार्यपध्दती ठरविण्यात आली आहे. सदरहू शासन निर्णयातील तरतुदी व महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ नियम २६ अन्वये बिंदुनामावलीनुसार व विषय साधर्म्यानुसार अन्य शाळेतील रिक्त पदावर करण्यात येत आहे.

राज्यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, नगर विकास विभाग या चार विभागामार्फत राज्यात आजमितीस १,२०,३४५ शाळा चालविल्या जातात, त्यामध्ये खाजगी अनुदानित, अंशता अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थ सहाय्यीत शाळा तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असे राज्य शासनाकडून या शाळांना अनुदान प्रकार/व्यवस्थापन प्रकारानुसार विभाजित केले आहे.

शाळा व्यवस्थापन प्रकार, नियुक्ती प्राधिकारी, अनुदान प्रकार या तिन्ही मुख्य प्रकारासोबतच शाळा व शिक्षकांचे उपरोक्त उपप्रकार आहेत. या उपप्रकारांचा विचार करतांना समायोजनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार समायोजनामध्ये स्तरीय अडथळे येत असल्यामुळे अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजना करीता विहीत कालमर्यादेची तरतुद सध्या अस्तित्वात नसल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजनास होणाऱ्या विलंबामुळे विनाकारण विनाकाम आर्थिक भार शासनास सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रीयेतील अडथळे दुर करुन त्यामध्ये सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले सर्व शासन निर्णयाचे एकत्रिकरण करुन समायोजनाच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन होती.


शासन निर्णय :-

जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (DISE) च्या अनुषंगाने राज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे. तथापि, संचमान्यता/पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग/तुकड्या बंद पडणे, शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील, अशा शिक्षकांचे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती नियमावली), १९८१ मधील नियम २६ अनुसार अनुदानित खाजगी प्राथमिक/ उच्च प्राथमिक / माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत अन्य ठिकाणी समायोजन होणे अनिवार्य आहे. त्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना यापुढे खालील कार्यपध्दतीचे अनुपालन करण्यात यावे.

२. समायोजनाची कार्यपध्दती :-

१) शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी यांनी दरवर्षी माहे सप्टेंबर, ३० अखेरचा पट (आधार वैधता) विचारात घेऊन संच मान्यता १५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी.

२) दरवर्षी १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नियुक्ती प्राधिकारी यांनी आपल्या सर्व शाळांमधील रिक्त पदांची यादी व अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी संकेत स्थळावर प्रकाशित करावी. नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अंतर्गत रिक्त पदावर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, तद्नंतर रिक्त पदांची/अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी (असल्यास) यांची यादी विहीत नमुन्यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / उपसंचालक यांच्याकडे ३१ ऑक्टोबर पूर्वी सादर करावी.

३) शिक्षणाधिकारी (जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन १५ नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करावे.

४) वरील ३ नुसार समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा/अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी 

(असल्यास) यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करावी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त

 ५) पदावर अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावे व उर्वरित रिक्त पदांचा तपशील/अतिरिक्त कर्मचारी यांची यादी संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्याकडे १ डिसेंबर पूर्वी सादर करावी.

६) संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी संपूर्ण राज्यातील रिक्त पदांचा तपशील जिल्हा निहाय/व्यवस्थापन/शाळानिहाय संकेत स्थळावर प्रकाशित करून तसेच अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती विहीत नमुन्यात संकेतस्थळावर दि.१५ डिसेंबर पूर्वी प्रकाशित करावी व अतिरिक्त ठरलेल्या कर्मचारी यांना रिक्त पदांचा तपशील (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापनाचा प्रकार इ.) संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावा व त्यानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्याचा विकल्प मागवावा)

७) २० डिसेंबर पर्यंत अतिरिक्त कर्मचारी स्वता कोणत्या जिल्ह्यात समायोजन करण्यात यावे याबाबतचा विकल्प संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्याकडे सादर करतील. यानुसार संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) हे संबंधितांना व संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांना व उपसंचालक संबंधित विभाग यांना तसे कळवतील, ही कार्यवाही संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी ३० डिसेंबर पूर्वी पूर्ण करावी.

८) अनुदानित खाजगी शाळा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, तंत्रशाळा यामधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन समान दर्जाच्या शाळेत/पद रिक्त नसल्यास अंतर्गत समायोजन व्यवस्थापनांतर्गत शैक्षणिक अर्हता व मूळ वेतनात फरक न करता करण्यात यावे. प्राथमिक शाळेत पद रिक्त नसल्यास, माध्यमिक शाळेत समान वेतन श्रेणीचे पद रिक्त असल्यास त्यावर समायोजन प्राधान्याने करावे. समान वेतन श्रेणीचे पद नसल्यास, अन्य पदावर तात्पुरते समायोजन करण्यात यावे. परंतु, अशा समायोजित कर्मचाऱ्याच्या मूळ वेतन श्रेणीत बदल करण्यात येऊ नये.

९) आरक्षण प्रवर्गानुसार जागा रिक्त असल्यास या पदावर समायोजनाने समान प्रवर्गाचा अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी देण्यात यावा.

१०) समान आरक्षण प्रवर्ग नसल्यास विषयानुसार प्रथम खुल्या प्रवर्गाच्या, ते ही नसल्यास इतर बिंदूवर तात्पुरते समायोजन करण्यात यावे. तद्नंतर ३ वर्षांनी पुनश्चा आढावा घेऊन वरीलप्रमाणे कार्यवाही करावी. ) पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन अधिक ११ पटसंख्या असणाऱ्या/वाढीव पद मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये पदासह शासनाच्या पूर्वसंमतीने समायोजन करण्यात यावे, समायोजित संस्थेत भविष्यात अन्य रिक्त होणाऱ्या पदामुळे तात्पुरते समायोजन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनामुळे आरक्षणास बाधा येत नसल्यास समायोजित कर्मचाऱ्यास सदर संस्थेत कायम स्वरुपी सामावून घेण्यात यावे. आरक्षणास बाधा येत असेल, तर कायमस्वरुपी समायोजन करु नये. १२) अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या मूळ संस्थेत नवीन पद निर्माण झाल्यास अथवा पद रिक्त झाल्यास सदर कर्मचाऱ्यास आरक्षण व विषयानुसार मुळ संस्थेत परत पाठविण्यात यावे. मुळ संस्थेत पद उपलब्ध नसल्यास अन्य संस्थांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या प्रवर्गाचे व विषयाचे पद रिक्त झाल्यानंतर त्यांना नियमित समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी. तथापि, समायोजन झाल्याच्या दिनांकापासून ३ वर्षापर्यंत असे पद निर्माण न झाल्यास अशा कर्मचान्यास ज्या आस्थापनेवर समायोजन झाले आहे, त्या आस्थापनेच्या सेवा शर्ती लागू राहतील (उदा. खाजगी शाळेमधून जिल्हा परिषदेमध्ये समायोजन झाले असल्यास ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवा शती लागू राहतील तसेच जिल्हा परिषदेमधून खाजगी शाळांमध्ये समायोजन झाले असल्यास ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) १३) नियमावली, १९८१ मधील तरतुदी लागू राहतील.)

अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्यांच्या मूळ वेतनास संरक्षण राहील. मात्र अन्य भत्त्यांच्या बाबतीत त्या त्या क्षेत्राकरीता राज्य शासनाने लागू केलेले मते त्यांना विहित अनुज्ञेय राहतील. १४) सर्वप्रथम समान अध्यापनाचे माध्यम व समान अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित) प्रकारानुसार आरक्षणाचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय यानुसार समायोजन करण्यात यावे. तद्नंतर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्यांच्या विकल्पानुसार समान अनुदान प्रकार परंतु त्यांच्या अध्यापनाच्या माध्यमात त्यांच्या विनंती प्रमाणे समायोजन करण्यात यावे.

१५) अध्यापक विद्यालय, उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक या सर्व शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समयोजन सर्वप्रथम वेतनश्रेणी व शैक्षणिक अर्हता यानुसार करण्यात यावे. तद्नंतर अतिरिक्त असल्यास अंतर्गत या चार प्रकारात रिक्त पदे विचारात घेता सरळ व उलट्या क्रमाने प्राथमिक विद्यालयामधून/माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालय या क्रमाने आणि अध्यापक विद्यालयामधून उच्च माध्यमिक/माध्यमिक/प्राथमिक या क्रमाने शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता यानुसार समायोजन करता येईल. अशा समायोजनानंतर त्यांच्या मूळ वेतनश्रेणी व भत्ते यावर कोणताही सकारात्मक/नकारात्मक परिणाम होणार नाही.

१६) टप्पा अनुदानावरील समान टप्यावर शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त असल्यास २० टक्के चे प्रथम ४० टक्के वर, ४० टक्के चे ६० टक्के वर ६० टक्के चे ८० टक्के वर, ८० टक्के चे १०० टक्के वर या क्रमाने समायोजन करता येईल. तथापि, या समायोजित कर्मचाऱ्यांच्या मूळ आस्थापनेला अनुज्ञेय होणारे अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी देय राहील. मात्र, ज्यावेळी मूळ आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देय होईल.

१७) अ.क्र.१६ प्रमाणे समायोजन शक्य नसल्यास, २० टक्के अतिरिक्त टप्यावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन ६० टक्के किंवा त्यापुढील टप्पा याप्रमाणे करता येईल. तथापि, या समायोजित कर्मचाऱ्यांच्या मूळ आस्थापनेला अनुज्ञेय होणारे अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्याच्या वेतनापोटी देय राहील. मात्र ज्यावेळी मूळ आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देय होईल.

१८) अ.क्र. १६ व १७ प्रमाणे उलट क्रमाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करता येईल. सदर समायोजित कर्मचाऱ्याच्या त्यांच्या मूळ शाळेचा देय टप्पा अनुदानास संरक्षण राहील.

३. वरील २ प्रमाणे समायोजन करताना खालील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असेल:-

१) सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी निहाय, व्यवस्थापन निहाय व अनुदान (अनुदानित/अर्शतः अनुदानित) प्रकारानुसार समान पदांवर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन त्यांचे स्तरावर करणे अनिवार्य असेल, २) वरील ३ (१) मधील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुढील प्रमाणे समायोजन करण्यात यावे.

॥ खाजगी अनुदानित १०० टक्के शाळांमधील विभिन्न नियुक्ती प्राधिकारी असणा-या अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन अन्य नियुक्ती प्राधिकारी यांच्या १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेत करण्यात यावे.
३) २ () मधील प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करतांना रिक्त जागा समान अनुदान प्रकारावरील शाळेत नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेत जिल्हा परिषद / महानगरपालिका/नगरपालिका/ कटक मंडळे या क्रमाने करण्यात यावे.
ii) प्रथम जिल्हातंर्गत समायोजन झाल्यानंतर जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी असल्यास आणि आदिवासी विकास विभाग/समाज कल्याण विभागाच्या शाळेवर शिक्षक/शिक्षकेतर यांची मागणी आहे काय याची खात्री करावी, असल्यास, त्यांच्या मागणी प्रमाणे अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी,
iv) स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर परिषद, महानगरपालिका) मधील प्राथमिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर समायोजन प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांतील रिक्त पदांवर करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजनाकरीता जागा रिक्त नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेतर समायोजन अनुदानित खाजगी प्राथमिक/ उच्च प्राथमिक / माध्यमिक शाळांमध्ये करण्यात यावे,
३) जिल्हातंर्गत समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त कर्मचारी यांचे विभागांतर्गत व राज्यांतर्गत समायोजन वरील (२) (). (ii) (i) व (iv) प्रमाणे करण्यात यावे.
४) जिल्ह्यांतर्गत समायोजन संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांचेमार्फत व जिल्हांतर्गत समायोजन करणे शक्य नसल्यास लगतच्या जिल्ह्यात विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत वरील पध्दतीनुसार समायोजन करण्यात यावे. ५) समायोजन करताना बालकांचा मोफत व हक्काचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील निकषांची पूर्तता होत असल्याची दक्षता घेण्यात यावी. 
६) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांच्या शिक्षण मंडळ / शिक्षण समिती यांनी ठराव मंजूर करण्याची आवश्यकता राहणार नाही. 
७) ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या बदल्या/समायोजनाचे नियम खाजगी अनुदानित/अंशत अनुदानित 
शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करु नये. 
८) ऑनलाईन समायोजन करतांना सदर शिक्षकांचे सेवा ज्येष्ठतेनुसार उपलब्ध रिक्त जागांवर समायोजन करावे.
०९) समायोजन ज्या दिनांकापासून होईल त्या दिनांकापासून संबंधित कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता ठरविण्यात यावी. १०) वरील कार्यपध्दतीनुसार अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे समायोजन झाल्यानंतर जे कर्मचारी समायोजित ठिकाणी हजर होणार नाहीत, अशा हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन अदा करण्यात येऊ नये, त्यांचे विरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच, ज्या शाळांनी अशा समायोजनानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्याचे हजर करून घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली असल्यास त्या शाळेचे सदर पद व्यपगत करावे व शालार्थ प्रणालीमधून असे पद काढून टाकावे. असे पद शासनाच्या मान्यतेशिवाय पुनर्जिवित करु नये.

  ११) अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन योग्य पध्दतीने व विहित कालमर्यादेत करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील.

१२) अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मासिक आढावा वेळोवेळी शिक्षण संचालक (प्राथमिक)/माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी घ्यावा व तशा सूचना सर्व संबंधितांना द्याव्यात व अहवाल आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत दरमहा शासनास सादर करण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून यातील तरतुदी लागू राहतील व समायोजनासंदर्भात अस्तित्वात असलेले यापूर्वीचे संदर्भाधीन सर्व शासन निर्णय अधिक्रमित होतील. तसेच, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झाली नसल्याने, या शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या कालमर्यादेत फक्त शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता शिथिलता देवुन सदरची कार्यवाही करण्यास १० जून २०२४ पर्यंत करण्याची मुभा देण्यात येत आहे. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून समायोजनाची कार्यवाही विहीत कालमर्यादेत पार पाडणे बंधनकारक असेल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३१५१७२५२३७१२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(तुषार महाजन)

 उप सचिव, महाराष्ट्र शासन.


संपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.