विषय :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार बालकांचा शाळांमधील प्रवेशाच्या राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत.
संदर्भ: शासन निर्णय क्र. आरटीई २०२५/प्र.क्र.०८/ एसडी-१. दि. १२/२/२०२६
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयाव्दारे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम १२ (सी) (१) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबतची कार्यपध्दती विशद करण्यात आलेली असून संपूर्ण राज्यात सदरची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्याबाबतचे निर्देश सदर शासन निर्णयाव्दारे देण्यात आलेले आहेत.
सदर शासन प्राप्त निर्देशानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम १२ (सी) (१) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना ऑनलाईन लिंक दि.१७/२/२०२६ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी. शासन निर्णयातील तरतुदीनुसार बालकांच्या पालकांकडून RTE २५ टक्के ऑनलाईन फॉर्म भरतेवळी खालील कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात यावी.
१. बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य)
२. भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोदंणीकृत भाडे करारनाम्याची प्रत (आवश्यक) (सर्व घटकांना अनिवार्य)
३. सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य)
(परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही.)
४. आर्थिक दुर्बल घटकातील विदयार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रुपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न), तसेच पालकांना त्यांचे रहिवासाचे स्थान गुगल मॅप मध्ये दर्शविताना GPS मध्ये बलुन Land mark च्या १किमी. च्या मर्यादेत दाखविण्याची मुभा असेल, याबाबत व्यवस्था करावी.
आर.टी.ई. २५ टक्के अंतर्गत Online प्रवेश अर्ज भरत असतांना पालकांना पाल्याच्या प्रवेशाकरिता जास्तीत जास्त कोणत्याही १० शाळांचे पर्याय देता येतील. यामध्ये पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या पाल्याच्या निवास स्थानापासून १ किमी व त्याच्या आतील शाळा दर्शविण्याची व्यवस्थ्ज्ञा करावी.
शासन निर्णय दि.१८/९/२०२० नुसार RTE २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय पुढीलप्रमाणे असेल.
अ.क्र.
प्रवेशाचा वर्ग
किमान वय वर्ष
वयाबाबत मानीव दिनांक
१) प्ले ग्रुप/नर्सरी (इ.१ ली पूर्वीचा ३+ ३ रा वर्ग)
३१ डिसेंबर
२ इ.१ ली
६+
३१ डिसेंबर
शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ प्रक्रियेसाठी बुधवार, दि. १८-०३-२०२६ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक दहा मार्च 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
10 MAR 2026
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा / शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व
४. प्रशासन अधिकारी म.न.पा./ न.पा. सर्व
५. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व
विषय :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ प्रक्रियेसाठी बुधवार, दि. १८-०३-२०२६ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ :
- १. शासन निर्णय क्र. आरटीई-२०२५/प्र.क्र.०८/एसडी-१, दि. १२-०२-२०२६
२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई-२५टक्के/टे-८०१/२०२५/१७२३५१६, दि. १३-०२-२०२६
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे. शासन निर्णय दि. १२-०२-२०२६ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रिय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनी खालील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
बालकांच्या पालकांकडून आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १७-०२-२०२६ ते दि. १०-०३-२०२६ या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तरी आपणास कळविण्यात येते की, आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बुधवार, दि. १८-०३-२०२६ पर्यंत मुदतवाढ येत आहे. याबाबत आपल्यास्तरावरुन संबंधितांना कळविण्यात यावे.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 10-03-2026 17:17:15
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव :-
श्रीम. आदिती एकबोटे, वरिष्ठ तांत्रिक संचालक, एन.आय.सी., पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
पालकांकरीता सूचना (2026-2027)
1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !
4) सन २०२६-२७ साठी फक्त १ किमी अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील.
प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे.
5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
11) RTE २५ % प्रवेश 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्याची मुदत 10/03/2026 पर्यंत राहील.
12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
13) सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
14) सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून Google Map वर पत्ता टाकून मिळालेले Lattitude,Longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
image not found 16) बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com वर इमेल पाठवावा.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/loginदिनांक-१३/२/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा/शिक्षण निरिक्षक मुंबई उत्तर / दक्षिण / पश्चिम
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व
४. प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा. सर्व
५. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ प्रकियेबाबत सुधारित सूचना
संदर्भ:-शासन निर्णय क्र आरटीई-२०२५/प्र.क्र/०८/एसडी-१/दि.१२/२/२०२६
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. शासन निर्णय दि.१२/२/२०२६ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के प्रवेश प्रकिया राबविणेबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रिय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनी खालील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
बालकांच्या पालकांकडून आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.१७/२/२०२६ ते दि.१०/३/२०२६ या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
१. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी)
(१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थ सहाय्यित शाळा/विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm__portal या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.
२. वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.
१ अनुसूचित जाती (एस.सी)
इतर मागासवर्ग (ओ.बी.सी)
अनुसूचित जमाती (एस.टी)
विशेष मागासवर्ग (एस.बी.सी
३ विमुक्त जाती (अ)
भटक्या जमाती (ब)
१० एच.आय.व्ही बाधित किंवा एच. आय. व्ही.प्रभावित बालक
भटक्या जमाती (क)
अनाथ बालके
भटक्या जमाती (ड)
दिव्यांग बालके
कोव्हिड प्रभावित
आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक
३. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
४. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून ०१ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई पोर्टलवर दिसतील.
५. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.
६. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंवचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनव्दारे निवास्थनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
७. प्रवेशप्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी.
८. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी
९. प्रवेशप्रक्रियेबाबत आपणांस काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.
१०. पालकांना ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी (उदा. घरचा पत्ता, बालकांचा जन्मदिनांक, उत्पन्नचा प्रमाणपत्र, दिव्यांगाचा प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र इ.)
११. ज्या बालकांना यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
१२. यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश अर्ज रह करण्यात येईल तसेच पालकांना एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
१३. बालकांच्या पालकांनी आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
बालकांच्या पालकांचे आई किंवा वडीलांचे आधारकार्ड अनिवार्य (अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधारकार्ड अनिवार्य बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य)
भाडे तत्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक (सर्व घटकांना अनिवार्य)
सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही)
आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नचा दाखला रूपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न (सन २०२३-२४ किंवा २०२४-२५) या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राहय समजण्यात येईल.
२. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
निवासी पुरावा २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात ज्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / वीज देयक / टेलिफोन देयक /प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात येईल.
२५ टक्के प्रवेशप्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार ग्राहय धरण्यात येईल. सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्याठिकाणी बालक/पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या बालकांचा प्रवेश मिळाला असल्यास तो रह करण्यात येईल.
जन्म तारखेचा पुरावा रुग्णालयातील एएनएम रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी/ बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला. ग्रामपंचायत /मनपा/नपा यांचा दाखला / सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे/बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र तहसिलदार/उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा (वडीलांचा/बालकांचा) जातीचे प्रमाणपत्र, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राहय धरण्यात येणार नाही.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला - सन २०२६-२७ या वर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विदयार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष सन २०२३-२४ किंवा सन २०२४-२५ या वर्षाचा ०१ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला.
दिव्यांग मुलांसाठी वैदयकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हाशल्य चिकीत्सक /वैदयकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक (सिंगल पॅरेंट) (विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकांचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राहय धरण्यात येईल.
आरटीई २५ टक्के प्रवेश अर्ज भरतेवेळी बालकांच्या पालकांचे (आई किंवा वडील) यांचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. बालकांचे आधारकार्ड नसल्यास आधारकार्ड सादर करण्याच्या अटींच्या अधिन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत बालकांचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील. बालकांच्या आधारकार्डची विहीत कालावधीत पूर्तता न झाल्यास आरटीई २५ टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रह करण्यात येईल.
अनाथबालके (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे अ) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची/बालसुधारगृहाची कागदपत्र ग्राहय धरण्यात येतील. ब) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. का अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र-उदा वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.
एच.आय.व्ही बाधित/प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक / वैदयकिय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
घटस्फोटीत महिला पालक असल्यास १. न्यायालयाचा निर्णय २. घटस्फोटीत महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा. ३. बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
न्यायप्रवष्ठि असलेल्या घटस्फोट प्रकरणतील महिला- १. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा पुरावा २. घटस्फोट प्रकरण न्यायप्रवष्ठि असलेल्या महिलेचा अथवा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा. ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याचे वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकांच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदापत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
विधवा महिला- १. पतीचे मृत्युप्रमाणपत्र २. विधवा महिलेचा/बालकाच्या आईचा राहिवासी पुरावा ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकांतील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
३. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिध्दी देऊन ऑनलाईन सोडत (लॉटरी) काढण्याकरीता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल). सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलबध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विदयाथ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुस-या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसीव्दारे पाठविला जाईल. मगचा दुस-या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पध्दतीने आरटीई प्रवेशपात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिस-या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांना एन. आय. सी. कडून मेसेज पाठविले जातील.
४. सोडत (लॉटरी) झाल्यांनतर पडताळणी सामितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विदयार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील, विदयार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विदयार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून त्यांनी आरटीई २५ टक्के प्रवेशावेळी अपलोड केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विदयार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी, तसे पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे.
५. काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान स्थलांतर होण्याची शक्यता असते त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदापत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी. बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.
६. कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे-
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी
अध्यक्ष
केंद्र प्रमुख/वार्ड ऑफिसर
सदस्य
मुख्याध्यापक शासकीय शाळा
सदस्य
मुख्याध्यापक अनुदानित शाळा
सदस्य
मुख्याध्यापक विनाअनुदानित शाळा
सदस्य
शिक्षण संस्थेची प्रतिनिधी
सदस्य
पालक संस्थेचे प्रतिनिधी
सदस्य
शिक्षकांचे प्रतिनिधी
सदस्य
पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी
स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी
सदस्य
शिक्षण विस्तार अधिकारी
सदस्य सचिव
७. पडताळणी समितीने प्रवेशपत्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरिता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवाप्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approach करावे, पडताळणी समिती केद्रांवर गर्दी होणार नाही व बालके प्रवेशापासून वंचित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी.
८. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी.
९. समितीने संबंधित विदयार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर सदर विदयार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर.टी.ई. पोर्टलवर करण्यात येत आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी पत्र घेऊन शाळेत जातील शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. ज्या बालकंचा कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रह करण्यात यावी व अशा रह झालेल्या विदयार्थ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व विभागीय शिक्षण उपसंचालक यांचा निर्णय अंतिम राहील.
१०. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असे नाही.
११. पालकांना केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.
१२. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
१३. बालकांच्या पालकांनी खोटी/चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी/चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रह करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यईल याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.
Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 15-02-2026 13:18:58
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्रत :- माहितीस्तव सविनय सादर-
१. मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा.आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार बालकांचा शाळांमधील प्रवेशाच्या राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
प्रस्तावना :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम राज्यामध्ये दि. ०१.०४.२०१० पासून अंमलात आला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार राज्य शासनामार्फत अधिसूचना दि. ११.१०.२०११ अन्वये नियम तयार करण्यात आले आहेत.
२. केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मध्ये दि.२०.०६.२०१२ अन्वये केलेल्या सुधारणेनुसार राज्य शासनामार्फत दि. १५.०३.२०१३ रोजीच्या अधिसुचनेनुसार, इ. १ लीसाठी किंवा शाळेच्या प्रवेश स्तरावर पुर्वप्राथमिक शिक्षणासाठी २५ टक्के प्रवेशाबाबत सुधारित नियम व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना अधिसुचित करण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाने अधिनियमांत केलेल्या सुधारणांनुसार राज्य शासनामार्फत वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत. बालकांची २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबविताना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत कालानुरूप सुधारणा करणे आवश्यक असून बालकांच्या २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया पारदर्शक फदतीने राबविणे क्रमप्राप्त आहे. याकरिता बालकांच्या शाळांमधील प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता नवीन नियम व आवश्यक त्याबाबींचा समावेश करून शासनास शिफारस करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय, दि. २९.०१.२०२५ अन्वये समिती गठित करण्यात आली होती. त्यानुषंगाने सदर समितीचा अहवाल दि. १३.१०.२०२५ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केलेला आहे.
३. उपरोक्तप्रमाणे गठित करण्यात आलेल्या समितीची सभा वेळोवेळी समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे. सदर बैठकीला समितीतील सर्व सदस्य (ऑनलाईन / ऑफलाईन) उपस्थित असून बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने समाजातील नागरिकांचे अभिप्राय आरटीई पोर्टलवर घेण्याचे ठरले. त्यानुसार, आरटीई पोर्टलवर दि.११.०४.२०२५ ते दि. ३०.०४.२०२५ या कालावधीत सूचना / हरकतींसाठी आरटीई २५ टक्के पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना/ हरकतींचे विश्लेषण करण्यात आले असून गठित करण्यात आलेल्या समितीने याबाबत निरिक्षणे नोंदविलेली आहेत. तसेच, बालकांच्या शाळांमधील प्रवेशाच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींनुसार प्रवेशाची सुधारित कार्यपध्दती राबविण्यातची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबाबतचा दि. १६.०१.२०२५ रोजीचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.
२. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार बालकांचा शाळांमधील प्रवेशाच्या राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात यावी. याकरिता खालीलप्रमाणे नमूद कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.
अ) प्रवेशप्रक्रिया प्रसिध्द करण्याबाबत :-
(१) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र असणाऱ्या शाळांची यादी प्रथमतः निश्चित करावी.
(२) ऑनलाईन प्रवेशाकरिता पात्र शाळांची यादी व संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा कालावधीनिहाय तपशील स्थानिक वृत्तपत्रामध्ये बातमीद्वारे जाहीर करावा.
(३) बालकांच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य राहील.
(४) बालकांच्या प्रवेशाकरिता राखीव २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांनी २५ टक्के प्रवेशाबाबतच्या माहितीचा फलक शाळेच्या दर्शनी भागात नागरिकांना सहज दिसेल, अशा पध्दतीने लावावा. या माहितीच्या फलकावर (२५% प्रवेशाकरिता असणारी वेबसाईट) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा कालावधी, प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक माहितीचा समावेश असावा.
(५) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी त्यांच्या क्षेत्राखत्यारित येणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हापरिषदा, महानगरपालिका यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांना प्रवेश प्रक्रियेची संपुर्ण माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सूचना द्याव्यात.
(६) ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, महानगरपालिका यांच्या अधिकृत नोटीस बोर्डावर प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती प्रसिध्द होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच महत्वाच्या ठिकाणी २५ टक्के प्रवेशाबाबतची माहिती देणारे भित्तीपत्रके / बॅनर लावण्यात यावेत. त्यामध्ये प्रवेशासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे, प्रवेशाचे वेळापत्रक, मदत केंद्रांची नावे तसेच शाळानिहाय इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेश क्षमतेच्या राखीव २५ टक्के प्रवेशांतर्गत उपलब्ध होणाऱ्या जागासंदर्भात सविस्तर माहिती असावी.
(७) पालकांना सहजरित्या प्रवेशाबाबतची माहिती उपलब्ध होईल, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करावी, तसेच video clip तयार करुन पोर्टलवर/यु-ट्युबवर अपलोड करावी.
(८) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी या संदर्भात वेळोवेळी पत्रकार परिषदा घेवून आवश्यक माहिती सर्वांना द्यावी व याबद्दलची संबंधित घटकांमध्ये जागृती करावी..
आ) प्रवेश प्रक्रियेकरिता नियोजित कालावधी, शाळा नोंदणी व प्रशिक्षण :-
(१) बालकांच्या २५ टक्के राखीव जागांवरील ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सन २०२७-२०२८ या शैक्षणिक वर्षापासून माहे जानेवारी पासून सुरू करून एप्रिल अखेर पार पाडण्यात यावी.
(२) शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करिता व यापुढील शैक्षणिक वर्षांकरिता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्यास्तरावरून देण्यात यावे. तसेच, प्रवेश प्रक्रियेचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रवेश प्रक्रियेबाबतच्या सूचना प्रसिध्द करण्यात याव्यात.
(३) बालकांच्या राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. याकरिता शाळांना नोंदणी करण्यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी देण्यात यावा,
(४) या शाळानी अधिनियमातील १२ (1) (c) नुसार तसेच, दिनांक २१ जानेवारी, २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार संबंधित शाळेने २५ टक्के प्रवेशाकरिता प्रवेश स्तर (Entry Level) नोंदवावेत, प्रवेशस्तर (Entry Level) शाळेने ठरवावा. तथापि, पूर्व प्राथमिक वर्गातील २५ टक्के प्रवेशाकरिता आर्थिक परतावा शासनाकडून अनुज्ञेय असणार नाही.
(५) शाळा नोंदणीबाबत शाळा प्रमुख व संबंधित अधिकारी यांचे प्रशिक्षण, मदत केंद्रांमार्फत घेण्यात यावे. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी राज्यातील जिल्हानिहाय मदत केंद्रांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या स्तरावरुन जाहीर करावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी अधिनस्त क्षेत्रात पुरेशा मदत / सहाय्य केंद्रांची स्थापना करावी.
(५) पालकांना ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या समस्या तसेच शाळांना ऑनलाईन नोंदणी करताना येणाऱ्या समस्या विचारात घेवून त्यावर आधारित प्रशिक्षणाचे नियोजन करावे. या करिता छोटे व्हीडिओज किवा पोर्टलवर मराठीमध्ये सूचना उपलब्ध करुन द्याव्यात,
(६) ऑनलाईन प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी करावी, ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र आहेत परंतु नोंदणी करत नाहीत किंवा Entry Level स्तरावरील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करुन देत नाहीत, अशा शाळांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी तात्काळ नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याबाबत/शाळेची मान्यता काढण्याबाबत नोटीसा द्याव्यात.
(७) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत लॉटरीव्दारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी तपासणी करावी व शाळा प्रशासन हेतु पुरस्पर प्रवेश नाकारल्याचे आढळल्यास नियमाप्रमाणे शाळा मान्यता काढण्याची कार्यवाही करावी.
(८) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रतिवर्षी जानेवारीमध्ये सुरु करुन सर्व फेऱ्या एप्रिल अखेर पूर्ण कराव्यात. मुलांच्या ऑनलाईन प्रवेशाबाबतचे संदेश (निवड झालेल्या/निवड न झालेल्या मुलांबाबत) विहित वेळेत पालकांना दिले जातील, याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
३) २५ टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी:-
(१) दिनांक १५ मार्च २०१३ रोजीच्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे राहतील.
(१.१) बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य),
(१.२) भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक) (सर्व घटकांना अनिवार्य).
(१.३) सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.)
(१.४) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रुपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न).
(२) बालकांचा शाळांमधील राखीव २५ % जागांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत घटस्फोटित महिला/विधवा महिला यांबी बालके, अनाथ बालके व दिव्यांग बालके यांच्याबाबत पुढील कागदपत्रे आवश्यक राहतील.
(२.१) घटस्फोटित महिलाः-
(१) न्यायालयाचा निर्णय (२) घटस्फोटित महिलेचा/ बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा (३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
(२.२) न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला:-
(१) प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. (२) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा (३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
(२.३) विधवा महिलाः-
(१) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, (२) विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा (३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
(२.४) अनाथ बालक:-
अनाथ बालकांच्याबाबत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथलयात राहत नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहिल.
(२.५) दिव्यांग बालके:-
असावे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणाचे
(३) शाळांमधील प्रवेशाकरिता पोर्टलवरील ऑनलाईन माहिती भरताना झालेल्या चुका (जसे बालकाचे नावातील / आडनावातील किरकोळ चुका) गृहित धरुन शाळांना प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेशांकरिता सादर केलेली कागदपत्रे यांची तपासणी शाळांनी करावी व त्याची नोंद शाळेच्या अभिलेखात घ्यावी व तद्नंतर संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना अवगत करावे.
(४) उत्पन्नाचा दाखला प्रवेश प्रक्रिया सुरु होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा, उदा. सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन २०२३-२४ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात यावा, उत्पन्नाचे दाखले हे संबंधित प्राधिकरण (तहसिलदार कार्यालय) यांनी प्रमाणित केलेले असावेत. हे दाखले तपासण्याचे अधिकार शाळांना असणार नाहीत. आर्थिक दुर्बल घटकातील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी महाऑनलाईन च्या Portal व्दारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल. पालकांनी बनावट/बोगस उत्पन्नाच्या दाखल्यांचा वापर २५ टक्के प्रवेशा करिता करू नये. बनावट/बोगस उत्पन्नाच्या दाखल्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास, झालेले प्रवेश रद्द करण्यात येतील व संबंधित पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
(५) पालकांनी ऑनलाईन अर्ज करतांना अचूक व खरी माहिती भरावी. (उदा. घरचा पत्ता, जन्म दिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र इ.)
(६) शाळांमधील प्रवेशाकरिता बालकांचे प्रवेश घेण्यासाठी शाळा Allotment झालेल्या विद्यार्थ्यांना सबंधीत शाळांनी विहित मुदतीत प्रवेश देणे बंधनकारक आहे. याकरिता बालकांच्या प्रवेशाबाबत विहित मुदतीनंतर शाळेच्या/पालकांच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेण्यात येणार नाही.
(७) एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा HTE नियमानुसार परिसरात असल्यास इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच इयत्ता ५ वी ते १० वी पर्यन्त मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास Elementary Cycle नुसार इयत्ता १ ली ला २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील (एकाच आवारातील) इयत्ता ५ ते १० वी पर्यन्त असलेल्या शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वी करिता नियमित राहतील. त्याकरिता त्या शाळेत इयत्ता ५ वी करिता वेगळयाने प्रवेश प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता नाही. मात्र इयत्ता ५ वीतील उर्वरित सर्वसाधारण प्रवेश प्रक्रिया करताना २५ टक्केच्या प्रमाणात जागा रिक्त ठेवणे शाळेस बंधनकारक राहील.
(८) एखाद्या शिक्षण संस्थेची शाळा इतर शहरात असल्यास, त्या ठिकाणी बालकाचे प्रवेश बदलून देता येणार नाही.
(९) बालकांचे शाळांमधील २५ टक्के राखीव असणाऱ्या जागांवरील प्रवेश प्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी होण्याकरिता (प्रवेश स्तर Elementary Cycle ते इयत्ता ८ वी पर्यन्त) पात्र असलेल्या शाळांनी प्रत्येक वर्गामध्ये २५ टक्के प्रवेश हे या प्रक्रियेतील लाभार्थी विद्यार्थ्यांसाठीच राहतील, याची दक्षता शाळा प्रशासनाने घेणे आवश्यक राहील. या प्रवेश प्रक्रियेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती होणार नाही, तसेच ही मुले शिक्षणापासून वंचित होणार नाहीत, याचे सामाजिक दायित्व शाळा प्रशासनाचे राहील, राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे वेगळी/सापत्न वागणूक दिली जाणार नाही अथवा त्यांच्या बद्दल भेदभाव केला जाणार नाही, याची दक्षता शाळा प्रशासनाने घेणे अनिवार्य आहे.
(१०) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थी संख्या विचारात घेवून त्या शाळेस शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार करावयाच्या रक्कमेच्या प्रतिपूर्तीची गणनादेखील सिस्टिम मध्ये करण्यात यावी. जेणे करुन शाळांना प्रतिपूर्तीसाठी पुन्हा वेगळयाने तपशीलवार प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करण्याची आवश्यकता असू नये. शासनाने शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार अथवा शाळेने निश्चित केलेले दर यापैकी जे कमी असेल त्या दराने शाळांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील, बालकांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शाळांना केल्यानंतर पालकांना SMS द्वारे कळविण्यात यावे,
(११) बालकांसाठी शाळांमधील राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशांतर्गत भरलेल्या प्रवेशित जागांची वर्षनिहाय माहिती शाळांनी Portal वर भरावी व ती प्रत्येक वर्षी Update करावी, मा, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालके उपलब्ध न झाल्यास त्याप्रमाणात २५ टक्के प्रवेशातील जागा रिक्त ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, या जागा सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यावर्तीत /वर्ग करता येणार नाहीत.
ई) बालकांच्या ऑनलाईन २५ टक्के प्रवेशप्रक्रियेची संगणकीय प्रणाली (पोर्टल) व्यवस्था विचारात घेता, पालकांसाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
(१) पालकांनी आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरत असताना परिच्छेद "इ" मध्ये नमूद सर्व कागदपत्र तसेच, शासनाने वेळोवेळी अनिवार्य केलेली कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत.
(२) निर्धारित नजीकच्या क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या शाळा निवडाव्यात.
(३) सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी शासन निर्णय दि. १८.०९.२०२० मधील तरतुदीनुसार शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करावे.
(४) पालकांनी ऑनलाईन अर्ज करतांना अचुक व खरी माहिती भरावी. (उदा. घरचा पत्ता, जन्म दिनांक,
उत्पन्नाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ.)
(५) बालकांना प्रवेश देण्यात आलेल्या (Allotment) शाळेमध्येच पालकांनी विहित मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश देण्यात आलेली शाळा कोणत्याही परिस्थितीत बदलून देता येणार नाही. विहित मुदतीनंतर शाळेच्या पालकांच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेण्यात येणार नाही.
(६) शाळेमध्ये प्रवेश घेत असतांना पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व त्याच्या २ साक्षांकित प्रत्ती सोबत ठेवाव्यात.
(७) पालकांनी बनावट / बोगस कागदपत्रांचा/ दाखल्यांचा वापर बालकांच्या २५ टक्के प्रवेशाकरिता राखीव असलेल्या जागांकरिता करू नये, बनावट / बोगस कागदपत्रांचा/ दाखल्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास, झालेले प्रवेश रद्द करण्यात येतील व संबंधित पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
उ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत एनआयसीकरिता सूचना:-
(१) प्रवेश प्रक्रियेकरिता Mobile App विकसित करावे.
(२) बालकांच्या प्रवेशाठी निश्चित करण्यात आलेल्या वयाच्या आधीच्या बालकांची नोंद ऑनलाईन पोर्टलवर नोंदविली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच याप्रमाणे पालकांना अर्ज करताना Popup message System वर दाखविण्याची व्यवस्था करावी.
(३) पालकांना त्यांचे रहिवासाचे स्थान गुगल मॅप मध्ये दर्शविताना GPS मध्ये बलून Land mark च्या १ किमी. च्या मर्यादेत दाखविण्याची मुभा असेल, याबाबत व्यवस्था करावी.
(४) उत्पनाचा दाखला maha.online महाऑनलाईनशी लिंक करण्याची व्यवस्था करावी.
(५) पालकांना अर्ज भरताना संगणकीय प्रणालीमध्ये खालीलप्रमाणे नमूद बाबी उपलब्ध करुन द्याव्यात.
५.१) पालकांना पाल्याच्या Online प्रवेश अर्जावर जन्म दिनांक आणि नाव पुन्हा बदलता येणार नाही, अशी व्यवस्था करावी.
५.२) आर.टी.ई. २५ टक्के अंतर्गत Online प्रवेश अर्ज भरत असताना पालकांना पाल्याच्या प्रवेशाकरिता जास्तीत-जास्त कोणत्याही १० शाळांचे पर्याय देता येतील. यामध्ये पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या पाल्याच्या निवास स्थानापासून १ किमी व त्याच्या आतील शाळा दर्शविण्याची व्यवस्था करावी.
५.३) संगणकीय प्रणालीव्दारे लॉटरी काढताना १ किमी व त्यापेक्षा कमी अंतरातील शाळांसाठी २५ टक्के अंतर्गत एका शाळेत उपलब्ध असलेल्या प्रवेशाच्या रिक्त जागांपेक्षा पालकांकडून अधिक प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यास, प्रवेशाच्या प्रथम फेरीतच त्या शाळेची लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईल.
५.४) लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता एकाच शाळेचे Allotment (वाटप) होईल.
५.५) शाळा प्रवेशासाठी जी शाळा विद्यार्थ्यांला Allot होईल त्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश घेणे अनिवार्य राहील, जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना या प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी होता येणार नाही.
५.६) विद्यार्थ्याला लॉटरी लागल्यानंतर अलॉटमेंट लेटरवर शाळेचा पूर्ण पत्ता दिसण्याची व्यवस्था असावी.
५.७) विद्यार्थ्यांला प्रवेश Allot केल्यावर तसा SMS शाळांना व पालकांना पाठविण्याची व्यवस्था असावी, तसेच ही यादी Portal वर उपलब्ध असावी.
५.८) पालकांनी प्रवेशाच्या वेळी दर्शविलेला निवासाचा पत्ता व त्यांच्या आधार ओळखपत्रावरील निवासाचा पत्ता एकच आहे, याची खात्री करण्यात यावी. निवासाच्या पत्त्यामध्ये बदल दिसून आल्यास यासंदर्भात प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी.
५.९) शाळा Allot झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक Allotment letter सह व आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश घेण्यासाठी संबंधित शाळेला भेट देवून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्याशी संपर्क करतील.
५.१०) शाळा खालील कारणांमुळे प्रवेश नाकारु शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती Portal वर उपलब्ध असावी.
१. अवैध निवासाचा पत्ता
२. अवैध जन्मतारखेचा दाखला
३. अवैध जातीचे प्रमाणपत्र
४. अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र
५. अवैध ओळखपत्र
६. अवैध दिव्यांग प्रमाणपत्र
५.११) शाळेने विद्यार्थ्यांला प्रवेशित केल्यास अथवा प्रवेश नाकारल्यास (Admitted /Rejected/Parents do not Approach) त्या बद्दलची प्रिंट पावती पालकांना देण्यात यावी. तसेच System मधून शासनाला सुध्दा ते दिसण्याची व्यवस्था असावी.
५.१२) शाळेनी प्रवेश नाकारल्यास (Rejected / Parents do not Approach) या संदर्भात पालकांना Online Grievance करता येईल. तसेच ज्या शाळांनी प्रवेश नाकारलेला आहे, अशा तक्रारींवर निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार संबंधित पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी व मनपा/ नपा स्तरावरील क्षेत्रिय अधिकारी यांना रहातील.
५.१३) प्रत्येक लॉटरी फेरी नंतर शाळांमध्ये २५ टक्के अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या रिक्त जागांची माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन द्यावी.
(६) वेबसाईट वर Power Point Presentation व Videos दर्शविण्यात यावेत. (व्हेरिफिकेशन करणे / पालकांनी अर्ज भरणे / शाळांनी नोंदणी करणे इ.)
(७) शाळा लॉगीन मध्ये खालील व्यवस्था करण्यात यावी.
७.१) फी प्रतिपूर्ती मध्ये प्रत्येक शाळेला आतापर्यंत मूलनिहाय किती फी प्रतिपूर्ती मिळाली याबाबत शाळालॉगीन मध्ये नोंद दिसणे.
७.२) त्याचप्रमाणे मुलांची की प्रतिपूर्ती झाल्यावर मुलांच्या पालकांना SMS जाणे.
७.३) शाळेच्या लॉगीनमध्ये फक्त ADMIT, REJECT व PARENTS DO NOT APPROACH हे पर्याय (Tab) ठेवण्यात यावे.
७.४) दिनांक १५ मार्च, २०१३ रोजीच्या अधिसूचनेसोबतची परिशिष्टे १ ते ६ शाळांना त्यांच्या लॉगीन मध्ये Online दिसणे.
७.५) २५ टक्के प्रवेशाकरिता शाळा नोंदणी करताना शाळा आकारत असलेल्या शुल्काबद्दलची माहिती नोंदविण्याची व्यवस्था असावी.
७.६) शाळेने प्रवेशाची ऑनलाईन नोंद केल्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती आणि प्रवेश रद्द केल्यास त्याची कारणासहीत पावती देण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी.
उ) बालकांचा शाळांमधील राखीव २५ टक्के जागांवरील Online प्रवेश प्रक्रियेत लॉटरीव्दारे प्रवेशित बालकाच्या फी प्रतिपूर्तीची गणना करताना बालकांच्या आधारकार्डावरील आवश्यक तपशील संबंधित शाळांनी RTE Portal आणि सरल प्रणालीत नोंदविणे आवश्यक राहील. शाळेत प्रवेशित होत असताना संबंधित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसेल, तर ते काढून घेण्याची जबाबदारी संबंधित पालकाची व शाळेची राहील.
ऊ) दंडात्मक कारवाई :-
१) RTE २५ % Online प्रवेशपात्र शाळा असेल आणि त्या शाळेने RTE Portal वर रजिस्ट्रेशन न केल्यास.
२) RTE २५ % Online अंतर्गत विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या शाळेत प्रवेशाकरिता गेल्यावर शाळेने त्यांना जाणुनबुजून कोणतेही कारण नसतांना प्रवेश नाकारल्यास.
३) शाळा प्रवेश देत नाही अशी पालकांनी तक्रार नोंदविल्यास आणि अशी तक्रार योग्य आहे, असे सक्षम अधिकाऱ्यांस आढळून आल्यास.
४) FITE २५% Online प्रवेश प्रकिये अंतर्गत वरील बाबीमध्ये शाळा दोषी आढळल्यास संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कायद्यातील तरतूदीनसार शाळा मान्यता काढण्याची कारवाई करील,
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०२१२१५५२४८१८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
TUSHAR VASANT MAHAJAN
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- १. शासन पत्र क्र. आरटीई २०२६/प्र.क्र. ०१/एसडी-१, दि. ०५-०१-२०२६
२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई ८०१/२०२६/४३५२, दि. ०६-०१-२०२६
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने दि. ०९-०१-२०२६ पासून विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे. शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशन असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा आरटीई २५ टक्के प्रवेश सन २०२६-२७ मध्ये प्रविष्ट होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) तरी उपरोक्त सूचनांचे पालन करुन दिलेल्या कालावधीमध्ये दि. ०९-०१-२०२६ ते दि. १९-०१-२०२६ या कालावधीत विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
प्रति,
श्रीम. आदिती एकबोटे, वरिष्ठ तांत्रिक संचालक, एन.आय.सी., पुणे
विषय :- आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत.
संदर्भ :- शासनपत्र क्र. आरटीई २०२६/प्र.क्र. ०१/एसडी-१, दि. ०५-०१-२०२६
उपरोक्त विषयी संदर्भाधीन शासनाच्या पत्रान्वये आपणास कळविण्यात येत आहे की, सन २०२६-२७या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळांमधील प्रवेशाच्या राखीव जागांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे.
तसेच शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुधारित सूचनांचा समावेश करुन प्रवेश प्रक्रिया अंतिम करण्यात येणार आहे. तसेच सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे अनुषंगाने दि. ०९-०१-२०२६ पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव :-
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प., सर्व
३. प्रशासन अधिकारी म.न.पा./ न.पा. सर्व
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 24 मार्च 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र.१ मधील प्रवेशासाठी मुदतवाढीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षाची RTE २५ टक्के प्रवेशाची प्रतिक्षाधिन यादीचा पहिल्या टप्प्याची मुदत दि.१८-३-२०२५ ते दि.२४/३/२०२५ पर्यंत देण्यात आली होती. RTE २५ टक्के प्रवेश प्रतिक्षाधिन यादी पहिला टप्पा दि.२५/३/२०२५ ते दि.१/४/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे.
प्रत आवश्यक त्या कार्यवाहीस्तव
श्रीम आदिती एकबोटे, एन.आय.सी. पुणे
/-यांना प्रत देऊन कळविण्यात येते की, आरटीई २५ टक्के प्रक्रियेची उपरोक्त प्रमाणे लिंक उपलब्ध करून देण्यात यावी.
प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 17 मार्च 2025 रोजी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०१ मधील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) दि. १०-०२-२०२५ रोजी काढण्यात आली असून निवड यादीतील बालकांचे प्रवेश निश्चित करण्याची मुदत दि. १०-०३-२०२५ पर्यंत होती.
सर्व जिल्हयांतील निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व जिल्हयांमध्ये उद्या मंगळवार, दि. १८-०३-२०२५ रोजी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०१ मधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे याची सर्व जिल्हयांनी नोंद घ्यावी. तसेच दि. १८-०३-२०२५ पासून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठविण्यात येणार आहेत. प्रतिक्षा यादीतील बालकांचे पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसारच SMS पाठविण्यात येणार आहेत.
पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे.
प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. सदर अॅलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दि. १८-०३-२०२५ ते २४-०३-२०२५ या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित कराया. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा.
तसेच पालकांना व शाळा / शैक्षणिक संस्था यांना प्रतिक्षा यादीतील प्रवेश उद्या दि. १८-०३-२०२५ रोजी सुरु होत असल्याची नोंद घेण्याबाबत व वरील सूचनांना आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत आवश्यक त्या कार्यवाहीस्तव :-
श्रीम. आदिती एकबोटे, वरिष्ठ तांत्रिक संचालक, एन.आय.सी., पुणे
/- प्रतिक्षा यादीतील टप्पा क्र. ०१ मधील विद्यार्थ्यांना SMS पाठविण्यात यावेत.
सन २०२५-२६ यावर्षाचे RTE २५% प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी दि.१४-२-२०२५ ते २८-२-२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
तरी याद्वारे कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या वर्षाची आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ दि.१-३-२०२५ ते १०-३-२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी सर्व संबंधितांनी देण्यात आलेल्या मुदतवाढ कालावधीत प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही करावी,
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे
प्रत- श्रीम आदिती एकबोटे, एन. आय. सी. पुणे
/-यांना प्रत देऊन कळविण्यात येते की, आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेची अशी लिंक उपलब्ध करून देण्यात यावी.
RTE Admission : आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी शुक्रवारी जाहीर होणार
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी शुक्रवारी (ता. १४) जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या बालकांचे प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असून २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन सोडतीतील निवड झालेल्या बालकांच्या पालकांची कागदपत्रे पडताळणीसाठी तालुका, वॉर्ड स्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे. समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक दिले जातील.
कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करण्यात येईल. पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला, असे नोंद करण्यात येईल. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सुविधा आरटीई पोर्टलवर करण्यात येईल.
पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेऊन शाळेत जातील. शाळा स्तरावर कागदपत्रांची कोणतीही तपासणी करण्यात येणार नाही. दरम्यान, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दिशाभूल केल्यास प्रवेश होणार रद्द
बालकांची खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केल्याचे निदर्शनास आल्यास दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
RTE प्रवेश अपडेट
* 2025-26 च्या आरटीई प्रवेश साठी ऑनलाईन सोडत सोमवारी काढण्यात आली.
* दि. 14 फेब्रुवारी पासून लॉटरीचे SMS पालकांना येणार.
* RTE मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळावर कारवाई होणार.
* या वर्षी RTE अंतर्गत 1 लाख 9 हजार 87 जागावर मोफत प्रवेश दिला जाणार.
* पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 61 हजार 673 फॉर्म नोंदणी झाली.
* एका शाळेतील 71 जागेसाठी 3 हजार 376 फॉर्म आले.
RTE २५% प्रवेश प्रक्रिया फेरीच्या मुदतवाढीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दि 27/01/2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे!
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी दि.१४-१-२०२५ ते २७-१-२०२५ पर्यंत प्रवेश मुदत देण्यात आलेली होती.
तरी याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या वर्षाची आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ दि.२८-१-२०२५ ते २-२-२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी यानुसार सर्व पालकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, देण्यात आलेल्या मुदतीत आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म ऑनलाईन भरून घ्यावेत. ही अंतिम मुदत असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व संबंधितांची नोंद घ्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा.आयुक्त (शिक्षण) आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे
प्रत- श्रीम आदिती एकबोटे, एन.आय.सी.पुणे
/-यांना प्रत देऊन कळविण्यात येते की, आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ दि.२८-१-२०२५ ते २-२-२०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली असून त्यानुसार लिंक उपलब्ध करून देण्यात यावी.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारीत सूचना.
सन २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे.
शासन संदर्भ क्र.७ नुसार प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया दि. १४-०१-२०२५ ते दि. २७-०१-२०२५ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल, बंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये इयत्ता १ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.
वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.
आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
२५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरीता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.
पालकानी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनव्दारे निवास्थनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
प्रवेशप्रक्रीयेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी.
अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमूळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब, शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
प्रवेशप्रक्रीयेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करण्यात यावे.
पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. (उदा. घरचा पता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ.)
ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पून्हा अर्ज करता येणार नाही.
यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल, तसेध पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा, एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु नयेत.
२. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
निवासी पुरावा २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वताच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्या करिता रेशनिंग कार्ड.
३. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिध्दी देऊन ऑनलाईन सोडत (लॉटरी) काढण्याकरिता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल, तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (बेटींग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसीव्दारे पाठविला जाईल. मगच दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पदधतीने आरटीई प्रवेशपात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विदयाच्यर्थ्यांना एन.आय.सी. कडून मेसेज पाठविले जातील.
४. सोडत (लॉटरी) झाल्यांनतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विदयार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील, विदयार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विदयार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करुन घ्यावी.
कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असलयास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरबर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरुन घ्यावे.
५. काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.
६. कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी, पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे-
७. पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरीता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करावे, पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
८. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी.
९. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेवून पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गटशिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावेत.
१०. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यांनतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर.टी.ई. पोर्टलवर करण्यात येत आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अंपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्याथ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील. शासन निर्णय दिनांक २१.०४.२०१४ नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा, तालुका व न.पा./म.न.पा. स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी.
आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (वर्ष:२०२५-२६
प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे.
११. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही.
१२. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.
१३. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
१४. विद्यार्थ्यांनी खोटी / चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी / चुकीची माहिती भरुन दिशाभूल केल्या प्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
संपूर्ण परिपत्रक PDF Download
पालकांकरीता सूचना (2025-2026)
1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !
4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
11) RTE २५ % प्रवेश 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/01/2025 पर्यंत राहील.
12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
13) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
14) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
16) बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com वर इमेल पाठवावा.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-१६ बाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दि २०/१२/२०२४ रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दि. १३-१२-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या V.C. तील निर्देशानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ ते दि. ३१-१२-२०२४ या कालावधीत शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे. शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशन असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा व्हेरिफिकेशन करताना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) तरी उपरोक्त सूचनांचे पालन करुन दिलेल्या कालावधीमध्ये शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी.
(शरदै गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्व तयारी कार्यशाळा दि. १५ जानेवारी ऐवजी दि. १५ डिसेंबर व अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. १० एप्रिल ऐवजी दि. १० मार्च असा बदल करण्यास शासनाची मान्यता निकाली आहे.
तरी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव :-
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प., सर्व
३. प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा. सर्व
प्रत माहितीस्तव सविनय सादर -
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
RTE २५ टक्के प्रतिक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी १. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व), २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व), ३. प्रशासन अधिकारी म.न.पा. (सर्व) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ RTE २५ टक्के प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे.
RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील सोडतीनुसार प्रतिक्षाधिन यादीतील असलेल्या मुलांची प्रवेश प्रक्रिया दि.१६/८/२०२४ पासून दि.२६/८/२०२४ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. याअनुषंगाने प्रतिक्षायादीतील RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रिया दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याची कार्यवाही सर्व संबंधितांनी करावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि. ७ जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आरटीईची निवड यादी
https://student.maharashtra.gov.in/admportal
या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारपासून एसएमएस येण्यास सुरुवात होणार आहे.
झालेल्या पालकांना दि. २३ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेता येणार आहे.
प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. - शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 19 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत १) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व २) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, म.न.पा./ शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम ३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व. ४) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा. सर्व. यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :
- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ २. मा. उच्च न्यायालय मुंबई, जनहित याचिका क्र.६१/२०२४, क्र. ८७/२०२४, व क्र. १४८८७/२०२४, क्र.१५५२०/२०२४ तसेच रिट याचिका क्र. ३३१७/२०२४.
उपरोक्त विषयी शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ यास मा. उच्च न्यायालय मुंबई, यांची अंतरिम स्थगिती असल्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती.
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जन हित याचिका व रिट याचिकेवर दिनांक १९/०७/२०२४ रोजी अंतिम निर्णय दिला आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ०७/०६/२०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक २०/०७/२०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal
या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक २२/०७/२०२४ पासून SMS जाण्यास सुरुवात होईल.
प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक २३/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.
तरी आपणांस कळविण्यात येते की, सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची तपासणी करुन पडताळणी केंद्र अपडेट करण्यात यावी, पालकांना अडचण होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील सूचनांचे पालन करावे अशा सूचनांना आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
शिक्षण संचालनालय, पुणे १.
RTE previous अपडेट
* आरटीई 25 टक्के प्रवेशासंदर्भात मा. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दि. 11 जुलै 2024 रोजी सुनावणी झाली. या सूनवणीत सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मा. न्यायलयासमोर मांडली, आता सदर सुनावणी पूर्ण झाली असून, याबाबतचा अंतिम निकाल न्यायलयाने राखून ठेवला असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच RTE प्रवेश प्रक्रियेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरटीई' प्रवेशप्रक्रिया लांबणीवर...
पालक निवड यादीच्या प्रतीक्षेत..
विदर्भ वगळता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजपासून शाळा सुरू होत आहे. परंतु आरटीई 25% मोफत प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली आहे.
RTE बाबत आज कोर्टामध्ये सुनावणी झाली.
कल्याण सिटीझन्स एज्युकेशन सोसायटी , मुंबई, असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स, मुंबई व श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी, पिंपरी चिंचवड यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
अंतिम सुनावणी 11जुलै रोजी होणार आहे.
* न्यायलायच्या अंतिम सुनावणी नंतरच RTE प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे 11 जुलै नंतरच प्रवेश प्रक्रियेला गती येणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागेवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून सोडत काढण्यात आली. मात्र, न्यायालयीन प्रकरणामुळे प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होण्यासाठी पालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असून, परिणामी प्रवेश प्रक्रियेला फटका बसून, ती आणखी लांबणीवर पडणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार २०८ शाळांमध्ये १ लाख ८ हजार २१६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४३ हजार १०४ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत फेब्रुवारीमध्ये केलेल्या बदलांविरोधात दाखल याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवावी लागत आहे. मात्र, दरम्यानच्या काळात खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता २५ टक्के जागांवरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विषय आता न्यायालयात गेला आहे. शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशांसाठीची सोडत ७ जूनला काढण्यात आली. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली नाही. न्यायालयीन याचिकेवरील १२ जूनला होणारी सुनावणी आता १८ जूनला होणार आहे. त्यामुळे सोडत काढूनही निवड यादी जाहीर झालेली नाही. परिणामी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. शाळांनी आरटीई प्रवेशांचे उद्देश लक्षात घेऊन या प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा करणे थांबवावे. त्यांच्या चुकीच्या प्रवेश पद्धतीमुळे महाराष्ट्रातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे आप पालक युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
आरटीई पोर्टल अधिकृत लींक
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/maintenance
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


























0 Comments