शिष्यवृत्ती परीक्षेत बदल! पाचवीऐवजी चौथी व आठवीऐवजी सातवीसाठी होणार परीक्षा शासन निर्णय! १७/१०/२०२५

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी ऐवजी इ. ४ थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी मध्ये आयोजित करणे, परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) असे करणे, परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या, शिष्यवृत्तीचे दर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निवड व करणेबाबतचे सुधारीत निकष पुढील प्रमाणे निश्चित केले आहे.


प्रस्तावना :-

राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून संदर्भाधीन अनुक्रमांक २ मधील दिनांक २९/०६/२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८ वी असा करण्यात आला होता.

त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०१६-१७ पासून इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे करण्यात येत आहे. तथापि शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलानंतर एकूण प्रविष्ठ विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्याथ्यांचा सहभाग वाढावा, विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पुन्हा इ. ५ वी ऐवजी इ. ४ थी व इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुषंगाने संदर्भीय शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्तीत सुधारणा करून सर्वसमावेशक बाबींचा एकच शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता ५ वी ऐवजी इयत्ता ४ थी आणि इयत्ता ८ वी ऐवजी इयत्ता ७ वी असा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

* त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान "प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३) सदर बदलाची अंमलबजावणी सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी. त्यामुळे सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः साधारणतः फेब्रुवारी २०२६ घ्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल. तसेच इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे २०२६ च्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल. (सोबतच्या प्रपत्र अ नुसार इ. ४ थी व इ. ५ वी करीता प्रत्येकी १६६९३ व प्रपत्र व नुसार इ. ७ वी व इ. ८ वी करीता प्रत्येकी १६५८८ शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील)

ॐ सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०२६-२७ पासून पुढे इ. ४ थी व इ. ७ वी वर्गासाठी नियमितपणे करण्यात यावे.

५ प्रस्तुत बदलांमुळे अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आवश्यक ती कार्यवाही शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी.

सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे.

सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मुल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात / गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील.

4 पोलीस बंदोबस्त :- सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवण्याच्या जिल्हा / तालुका परिरक्षक केंद्रास परीक्षा साहित्य प्राप्त झाल्यापासून परीक्षेनंतर परीक्षा परिषदेस सुपूर्द करेपर्यंत, तसेच परीक्षेच्या दिवशी सर्व शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रांवर निःशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. सदर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांची राहील.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी स्तर) करीता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत :-

१) शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.

२) सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. व इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे :-

1. सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील.

॥. सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे विहीत शुल्क आकारण्यात येईल.

Ⅲ. सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

IV. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीकरीता संपूर्ण राज्यातील पहिल्या १०० विद्यार्थ्यांची व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल, मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.

V. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.

३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :-

१) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

२) विद्यार्थी शासनमान्य शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता ४ थी किंवा इयत्ता ७ वीत शिकत असावा..

४) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा :-

विद्यार्थ्यांचे वय संबंधित शैक्षणिक वर्षाच्या १ जून रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.

दि.१ जून रोजी कमाल वयोमर्यादा

५) सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये ४० % पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र राहतील. जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्तीच्या संचानुसार अशा पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र घोषित करण्यात येईल.

६) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परीक्षेच्या आधारे सदर शिष्यवृत्ती दिली जाईल.

(७) परीक्षेची तारीख व वार

क) सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल, त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुसन्या/तिसऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल.

ख) शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.

८) अर्ज:-

सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत.

९) परीक्षा शुल्क :-

बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी -

प्रवेश शुल्क रु. ०५०/-

परीक्षा शुल्क रु. १५०/-

एकूण

रु. २००/-

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी -

रु. ०५०/-

प्रवेश शुल्क

परीक्षा शुल्क रु. ०७५/-

एकूण

रु. १२५/-

याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रु. २००/- नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल.

१०) परीक्षेचे माध्यम :-

मराठी/उर्दू/हिंदी/गुजराती/इंग्रजी/तेलुगु/कन्नड असे असेल. इ. ४ थी व इ. ७ वीच्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरीता गणित या विषयाचा इंग्रजी माध्यमाकरीता जी प्रश्ननपत्रिका असेल तिच प्रश्ननपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल.

११) परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरुप :-

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार केलेल्या इ. १ ली ते इ. ४ थीच्या पाठ्यक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व इ. १ ली ते इ. ७ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) आयोजित करण्यात येईल.

पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील.

प्रश्नांची काठिण्य पातळी : १) कठीण स्वरुपाचे प्रश्न ३०%

२) मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%

३) सोपे स्वरुपाचे प्रश्न ३०%

प्रश्नपत्रिकेचे स्वरुप :- प्रत्येक प्रश्ननपत्रिकेसाठी बहुसंच (A.B.C.D.) प्रश्नसंच पुरविण्यात येतील.

१) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७वी स्तर) या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल.

२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी स्तर) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी स्तर) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

१३) शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी :-

१) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने लगतच्या वर्षी मान्यता प्राप्त पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) / पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.

२) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) पास झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्ष व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल. यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.

३) विद्यार्थ्याने शाळा बदल केल्यास, संबंधित विद्यार्थ्याने / पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (योजना) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.

४) शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या परवानगी शिवाय कोणीही शिष्यवृत्ती गोठवू शकणार नाही.

१४) शिष्यवृत्तीचे वितरण :-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर करावी. शासनाकडून अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई वडील / पालक यांच्या संयुक्त बैंक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बैंक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात) शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत रक्कम वितरीत करण्यात यावी.

शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे बैंक खाते उघडण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांची राहील. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकालानंतर पुढील दोन महिन्यांच्या आत प्रत्येक तालुक्यात शिबीर आयोजित करुन चालू व गत वर्षाच्या लाभार्थ्यांची बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFS कोड इ.) व आधार क्रमांकाची अचूक माहिती तालुकानिहाय, शाळानिहाय संकलित करावी व सदर माहिती विहित वेळेत शिक्षणाधिकारी (योजना) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांनी शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे सादर करावी. 

१५) गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव :-

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.७ थी स्तर) या परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्हयाच्या मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन दि. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करुन करण्यात यावा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रत्येक वर्षी या परीक्षांच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना देण्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करुन ते संबंधित जिल्हयांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांचेकडे विहीत कालावधीत उपलब्ध करुन द्यावीत. सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्था शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांनी करावी.

१६) "ग्रामीण" या शिष्यवृत्ती प्रकाराबाबत विश्लेषण :-

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.७ वी स्तर) परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली सर्व गावे/वस्ती (लोकसंख्या विचारात न घेता) तसेच नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रात ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असल्यास सर्व गावांमधील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना "ग्रामीण" भागात करण्यात यावी.

तसेच शासन निर्णय दि. २ एप्रिल, १९५४ अन्वये No scholar can hold, at the same time, any other Government scholarship or a scholarship from an endowment fund vested in Government without the permission of the Director of Education असे नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयान्वये सदरची अट कायम ठेवण्यात येत आहे.

१७) विद्यानिकेतन प्रवेश :-

शासन निर्णय क्र. एसपीई २००२/(२६४/०२) साशी-१, दि. २४/०२/२००३ नुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश या परीक्षा पूर्वीप्रमाणे एकत्रितपणे घेण्यात येतील. विद्यानिकेतन प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष व अटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित करून आपल्या स्तरावरून निर्गमित कराव्यात.

१०) शिष्यवृत्ती दरात, संचात वाढ व सुधारणा करणेबाबत :-

१) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) साठी शिष्यवृत्ती संच सोबतच्या सहपत्रानुसार मंजूर राहतील.

२) सर्व शिष्यवृत्ती संचांकरीता खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार शिष्यवृत्तीची रक्कम निश्चित करण्यास मान्यता

देण्यात येत आहे.

इयत्ता

मंजूर शिष्यवृत्ती रक्कम

शिष्यवृत्ती कालावधी

इयत्ता ४ थी

रु. ५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु. ५०००/- प्रतिवर्ष)

३. वर्ष

इयत्ता ७ वी

रु. ७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु. ७५००/- प्रतिवर्ष)

३ वर्ष

३) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) करीता संदर्भ क्र. १ नुसार ठरवून दिलेल्या शिष्यवृत्तीचे संच १०,००० लोकसंख्येस ३ शिष्यवृत्ती संच याप्रमाणे निकष लावावा. लोकसंख्येचे प्रमाण सन २००१ च्या जनगणनेनुसार प्रमाणित मानून सोबतचे प्रपत्र "अ" "ब" "क" "ड" व "इ" नुसार जिल्हानिहाय, तालुकानिहाय, प्रकारनिहाय शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या व त्यांच्या प्रदान करण्याच्या निकषांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

॥ जिल्हास्तरीय व संचाकरीता त्या त्या जिल्ह्यातील मंजूर संच संख्येनुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सदरच्या शिल्लक संचाकरीता राज्यातून गुणानुक्रमे संबंधित संचाच्या निकषानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.

ⅱ) विदर्भातील ११ जिल्ह्यांकरीता मंजूर असलेल्या F व G संचाकरीता पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असावे.

ii) सदर F व G संचाकरीता त्या त्या जिल्ह्यातील मंजूर संच संख्येनुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सदरचे शिल्लक संचासाठी विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी इतर जिल्ह्यातून गुणानुक्रमे संबंधित संचाच्या निकषानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.

iv) तालुकास्तरीय A, B, C व संचाकरीता मंजूर संच संख्येनुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सदरचे शिल्लक संच त्या त्या जिल्ह्यात व जिल्ह्यातही विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास राज्यातून गुणानुक्रमे संबंधित संचाच्या निकषानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.

५) शिष्यवृत्ती संच मर्यादित असल्याने किमान गुण (कट ऑफ़) शेकडा गुणांइतके एकुण शेकडा गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाले असल्यास शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निश्चित करण्यासाठी खालीलप्रमाणे निकष (प्राधान्यक्रम) विचारात घ्यावेत.

अ) एकूणात समान शेकडा गुण परंतु तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी (पेपर क्र. २) या पेपरमध्ये अधिक शेकडा गुण मिळविणारे परीक्षार्थी.

आ) एकूणात समान शेकडा गुण आणि पेपर क्र. २ मध्येही समान शेकडा गुण मिळाले असल्यास वयाने

मोठा असलेल्या परीक्षार्थ्यास (ज्याचे वय जास्त आहे) प्राधान्य.

४) राज्य गुणवत्ता यादी राज्यातील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ग्रामीण व शहरी विभागातील पहिल्या १००

इ) विद्यार्थ्यांच्या प्रथम नावाचे आद्याक्षर (A TO Z)

विद्यार्थ्यांची तसेच सीबीएसई, आयसीएसई व इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील पहिल्या १०० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात यावी.

५) सदर योजनेकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यास

तसेच लेखाधिकारी (लेखा), शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

६) या बाबींवर होणारा खर्च त्या त्या शिष्यवृत्त्यांखाली दर्शविण्यात आलेल्या लेखाशिर्षाखाली मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

॥ २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०१) माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या (०१) (०१) ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती (२२०२०३४२),

) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या (०३) शिष्यवृत्त्या, (०३) (०२) प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सहाय्य (२२०२०३८९),

ii) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०२) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने (उच्च माध्यमिक शाळा) (२२०२२३१८)

iv) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०१) माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या (०१) (०२) खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, (पूर्व माध्यमिक शाळा) (२२०२०३५१)

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५१०१७१९२१२३०८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. 


(तुषार महाजन) 

उप सचिव, महाराष्ट्र शासन

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


 पूर्वी चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येऊ लागली. आता पुन्हा त्यामध्ये बदल करुन चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा, यासाठी वर्षांनुवर्षे पाचवी आणि आठवीच्या वर्गामध्ये घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे अनुक्रमे चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे'ने या संदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. सरकारच्या मान्यतेनंतर हा बदल होणार आहे.

चौथी, सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, शासनाने अद्यापही मंजुरी दिली नाही. शासनाने मंजूरी दिल्यास पाचवी, आठवीऐवजी चौथी आणि सातवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल.

अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

मिळून तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात. त्यापैकी नऊ ते १० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीस पात्र होतात. त्यातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.

बदलाची माहिती लवकर मिळणार! 

सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर किमान वर्षभर अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा बदलाची माहिती मिळावी, यासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल लवकरच करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या बदलाची लवकर माहिती मिळणार आहे.

इतकी मिळते रक्कम

उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेंतर्गत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक शाळा (पाचवी) सर्व संचाकरीता ५०० रुपये प्रतिमाह, माध्यमिक शाळा (आठवी) सर्व संचाकरीता ७५० रुपये प्रतिमाह इतकी शिष्यवृत्ती मिळते.

जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी होणार बदल

राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी व पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आहेत. या शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही गोरगरीबांची असतात. त्यांना गलेलठ्ठ डोनेशन भरुन मोठ्या शाळेत प्रवेश घेणे शक्य नसते. त्यामुळे या गोरगरीबांच्या मुलांसाठी या परीक्षेमध्ये बदलाच्या हालचाली सुरु आहेत. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी हायस्कूलमध्ये गेल्यावर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.