Shalarth Pending Bills Update - थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत शिक्षण संचालनालयाचे निर्देश

 शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य कार्यालयातील निर्गमित दिनांक 4 मे 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक यांनी श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


संदर्भ- १) वेतन पथक, माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिअवेपना/आस्था/२०२४-२५/१२७२ दि. ३/६/२०२४.

२) वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिक्षण/वेतन व भ.नि.नि. पथक/२०२४- २५/१२७३ दि. ३/६/२०२४.


उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सद्यस्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅब शालार्थमध्ये बंद आहे. संदर्भ क्र. १ अन्वये वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली आहे. २. त्याअनुषंगाने लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२१९४८ या लेखाशीर्षाची पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.


३. तसेच २२०२०४४२ व २२०२०४७८ ची वैद्यकीय देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचप्रमाणे थकीत देयके ही बाब सेवा हमी कायद्याअंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 



(संपत सुर्यवंशी) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२) रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२


प्रत- १) विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, संबंधित सर्व.

२) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) संबंधित सर्व.



सदर परिपत्रकानुसार शालार्थ सिस्टीम मध्ये दिनांक 18 जून 2024 पर्यंत थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 



 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. मेळघाट मध्ये सर्व शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली होणार का सर?

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.