सातवा वेतन आयोग हप्ता अपडेट - सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहीला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता मिळण्याबाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक

 प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 8 जून 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता मिळण्याबाबत माननीय आमदार सुधाकर अडबाले यांना पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.


सन २०२३ २४ मध्ये लेखाशिर्ष २२०२०९७३ / ३६ अंतर्गत रक्कम रू. २१४८७,४३,०३,०००/- (अक्षरी रक्कम रू. एकवीस हजार चारशे सत्याऐशी कोटो बेचाळीस लाख तीन हजार फक्त) इतकी तरतूद नियमित शिक्षकांच्या वेतनासाठी मंजूर आहे.


राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय देयके अदा करणेसाठी रक्कम रू. २६०,५९,८८,०००/-, रजा प्रवास सवलत अदा करणेसाठी रक्कम रू. २३,७४,१६,०००/-, थकीत देयके अदा करणेसाठी रक्कम रू. १२८,२०,४५,०००/-, सातव्या वेतन आयोगाचा पहीला हप्ता अदा करणेसाठी रक्कम रू. ९६,९७,२६,०००/-, दुसरा हप्ता अदा करणेसाठी रक्कम रू. ८९३,७०,५९,०००/- तिसरा हप्ता अदा करणेसाठी ९६६,४५,६५,०००/- चौथा हप्ता अदा करणेसाठी रक्कम रु. ११५०,००,००,०००/- व इतर देयके अद करणेसाठी रक्कम रू. ८४,७०,७१,०००/- इतक्या जास्तीच्या तरतूदीची आवश्यकता आहे. येणान्या अधिवेशनामध्ये रक्कम रू. ३५०४,३८,७०,०००/- इतक्या तरतूदीची पुरवणी मागणी संचालनालयकडून शासनास करण्यात येणार असून पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर सोबतच्या विवरणपत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषदांना मंजूर तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी आपल्या माहितीस्तव सविनय सादर.


आपला विश्वासु,


(शरद गोसावी)


शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे- १.

प्रतः माहितीसाठी -

राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, देवरी, जि. गोंदीया




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏 




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.