दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व शाळामध्ये मातांचा सन्मान सोहळा आयोजित करणे बाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 6 मार्च 2026 रोजी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
संदर्भ
: १) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय, क्र. संकीर्ण- २०२१/ प्र.क्र.१७९/एसडी-६, दि. २९ जून २०२२.
२)या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्रशिप/सशि/FLN/कास/२०२५-२६/२०५६, दिनांक १४ जुलै २०२५.
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या अनुषंगाने मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये मातांचा सहभाग केल्यामुळे राज्यात निपुण माता-पालक गट कार्यक्रम यशस्वीरित्या सुरु आहे. मुलांच्या शिक्षणात मातांचा सहभागाने शाळा, माता गट व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या पुढाकाराने गावात शैक्षणिक वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. या करीता प्रत्येक शाळेने इयत्ता १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांच्या मातांचे वाडी-वस्ती निहाय माता-पालक गट बांधणी करून शिक्षणात सक्रीय सहभाग होण्यास सदर गटांचे कार्य सुरु आहे.
सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करीता प्रत्येक शाळेअंतर्गत वाडी-वस्ती निहाय असलेल्या निपुण माता गटाचा अधिक सक्रीय सहभाग होण्यासाठी सर्व शाळांमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळा स्तरावर माता गटांना एकत्र करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव ग्रामस्थांसमोर करावयाचा आहे. माता गटांना सन्मानित करून त्यांच्या कल्पना व त्यांनी मुलांच्या शिक्षणात वाढविलेल्या सक्रीय सहभागाबद्दल गावातील नागरिकांना माहिती देणे, जेणेकरून प्रत्येक मूल निपुण होण्यासाठी मदत होईल, महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपुण करण्यास महिला दिनानिमित्त माता-पालक गटाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन प्रत्येक शाळा स्तरावर करावे.
शाळा स्तरावर जागतिक महिला दिनानिमित्त मातांचा सन्मान सोहळा व उपक्रमाचे आयोजन पुढील प्रमाणे करावे.
१. गावातील सर्व मातांना व ग्रामस्थांना शाळा स्तरावर निमंत्रित करावे,
२. सदर कार्यक्रमात प्रत्येक गटाच्या लीडर मातांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात यावी.
३. आदर्श माता-पालक गट संकल्पना व्हिडिओ दाखवणे व आदर्श गटा बाबत गटचर्चा करणे,
४. शाळेत शिक्षक/मुख्याध्यापक माता-पालक गटांना, जागतिक महिला दिनानिमित्त थोर महिलांच्या कार्याची यशोगाथा सांगतील. (उदा. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इ.)
५. मुलांच्या शिक्षणात मातांचा महत्वपूर्ण सहभाग याबाबत मार्गदर्शन करणे.
६. भाषण - निवडक विद्यार्थ्यांकडून आई बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे,
७. यशोगाथा - गावातील मातांच्या सहभागामुळे मुलांच्या शिक्षणात झालेले बदल याबाबत एका मातेची यशोगाथा सादर करणे व लिहून पाठवणे.
८. निपुण सखी प्रमाणपत्र निपुण कार्यक्रमात मातांचा उत्कृष्ट सहभागा बद्दल मातांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावे.
सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या स्तरावर विभाग/जिल्हा/तालुका स्तरावर सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करावे व दिनांक ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शाळास्तरावर माता गटांना निमंत्रित करून शाळा स्तरावर माता-पालक गट सन्मान सोहळ्याचे आयोजन करणेबाबत सूचना देण्यात याव्या. तसेच माता पालक सन्मान सोहळ्याची माहिती निवडक बोलक्या फोटोसहीत व सन्मान सोहळा संबंधित अहवाल या कार्यलयास सादर करावा. कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी निवडक बोलके फोटो व लिखित अनुभव या कार्यालयाच्या सोशल मिडिया हँडलला Tag करून प्रसारित करण्यात यावे.
(गोविंद कांबळे) 6/3/2026
राज्य प्रकल्प समन्वयक मप्राशिप मुंबई
माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करणे बाबत शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 6 मार्च 2023 रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्रानुसार 8 मार्च हा जागतिक स्तरावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा केला जातो आणि लिंग समानतेसाठी कृती अहवाल केले जाते या दिवसाचा उद्देश महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणे आणि महिलांच्या मुक्तीसाठी कार्य करणे व शिक्षणाच्या माध्यमातून त्याचे क्षमी करून त्यांना दर्जेदार जीवनाकडे नेणारे आहे.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळा स्तरावर मुला मुलींसाठी खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत
लिंग समानता स्त्री हक्क यासारख्या स्त्रीकेंद्रित विषयांवर चर्चासत्रे आयोजित करणे. उदाहरणार्थ महिला सक्षमीकरणावर कथा भाषेच्या वर्गात सांगितल्या जाऊ शकतात तसेच सामाजिक अभ्यासामध्ये स्त्रियांच्या सामाजिक समस्या आणि स्त्रियांना समान हक्कासाठी झटणाऱ्या प्रतिष्ठित लोकांवर चर्चा केली जाऊ शकते.
महिला सक्षमीकरणावर आधारित विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात यावे यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या भूमिकांवर चर्चा केली जाऊ शकेल तसेच महिला सक्षमीकरणावरील सामूहिक नृत्य नाटक संगीत यासारख्या उपक्रमांची आयोजन करून त्यात विद्यार्थिनींना भाग घेण्यास प्रोत्साहित करावे.
कला सामाजिक सेवा आणि इतर नवीन क्षेत्रातील स्थानिक स्त्रिया ओळखल्या जाऊ शकतात ज्यांनी संघर्ष करून यश मिळवले आणि शाळेतील मुला मुलींशी त्यांचा संवाद आयोजित केला जाऊ शकतो
सशस्त्र दल पोलीस विमान वैमानिक लोकोमेटिव्ह पायलट एरोस्पेस अभियंता इत्यादी शास्त्रज्ञ महिला व व्यावसायिकांद्वारे चर्चा देखील आयोजित केली जाऊ शकते व मुलींना खेळात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.
महिला शिक्षक सदस्य आणि कर्मचारी यांचा शाळा आणि समाजासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सत्कार केला जाऊ शकतो.
महिला विद्यार्थिनींना शाळेत येताना कोणत्याही समस्या समस्यांबाबत शालेय स्तरावर चर्चा करून त्यांचे उपाय योजिले जाऊ शकतात लहानपणापासूनच समानता आणि परस्पर आदराची संकल्पना आणण्यासाठी मुलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.
मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करून माध्यमिक वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील मुलींची गळती कशी कमी करता येईल या विषयावर चर्चा आयोजित करावी.
या अनुषंगाने संदर्भातील पत्रात दिलेल्या सूचनानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये 08 मार्च रोजी महिला दिनानिमित्त वरील प्रमाणे कार्यक्रम साजरी करणे बाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नाही आयुक्त शिक्षण, शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना दिले आहेत.
वरील पत्र संदर्भ घेऊन शिक्षण संचालकांनी देखील विभागीय शिक्षण उपसंचालक, व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना निर्देश दिले आहेत.
केंद्र शासनाचे निर्देश महाराष्ट्र शासनाचा शासन आदेश व शिक्षण संचालक प्राथमिक यांचे महिला दिनानिमित्त निर्देश पर पत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏





0 Comments