दहावी व बारावीचे फेब्रुवारी/मार्च(HSC/SSC) 2023 चे अंतिम वेळापत्रक आजचे बोर्डाचे जाहीर प्रकटन.

 दहावी व बारावीचे फेब्रुवारी/मार्च(HSC/SSC) 2023 चे अंतिम वेळापत्रक आजचे बोर्डाचे जाहीर प्रकटन. 


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेच्या अंतिम वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाच्या सचिव माननीय अनुराधा ओक यांनी पुढील प्रमाणे प्रकटन जाहीर केले आहे. 

फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोंकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक की मंडळाच्या अधिकृत स्थळावर दिनांक 19 सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली असून सदर वेळा पत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे पंधरा दिवसाच्या आत लेखी स्वरूपात मागवण्यात आलेल्या होत्या त्यानुसार संघटना पालक शिक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इयत्ता बारावी व इयत्ता दहावीची वेळापत्रक करण्यात आलेली आहेत अंतिम वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा पुढील कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. 


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजेच इयत्ता बारावीची 2023 मधील परीक्षा. . 

मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. 


माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीची 2023 मधील परीक्षा गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. 

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांक निहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत. 

www.mahahsscboard.in  

या संकेतस्थळावर दिनांक 30 डिसेंबर 2022 उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचे कडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. 





वरील संपूर्ण वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.