शाळांची माहिती सन 2022-23 यु-डायस प्लस (U-Diseplus)ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना

 शाळांची माहिती सन 2022-23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना.


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे राज्य प्रकल्प संचालक यांनी दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती सन 2022 23 यु डायस प्लस प्रणाली द्वारे ऑनलाईन संगणकीकृत करणे बाबत मार्गदर्शक सूचना दिले आहेत.

https://udiseplus.gov.in

भारत सरकारकडून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणाली मार्फत संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे. यु-डायस प्लस प्रणाली मधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेची वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक PGI, नॅशनल अचीवमेंट सर्वे NAS, स्कूल एज्युकेशन कॉलिटी इंडेक्स SEQI निर्देशांकाची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे.

यु-डायस प्लस प्रणाली मध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यांमध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकीय माहिती ज्यामध्ये शाळेचे ठिकाण व्यवस्थापन माध्यम इत्यादी शाळा सुरक्षा अनुदान व खर्च व्यावसायिक प्रशिक्षण भौतिक सुविधा साहित्य उपक्रम संगणक आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादी माहिती संगणकी कृत करण्यात येणार आहे याकरिता सर्व शाळांना तालुका स्तरावरून युजरनेम व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 

दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, घरचा पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर क्रमांक, जन्मदिनांक, जात, बीपीएल, दिव्यांगाचा प्रकार, शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधी माहिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, आरटीई प्रवेश सहाय्यभूत सुविधा इत्यादी यु-डायस प्लस सॉफ्टवेअर मध्ये शाळा स्तरावरून अद्यावत करण्यात येणार आहे. 

दिनांक 17 ऑक्टोबर 2022 पासून यु-डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती संगणकीत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना केंद्र शालेय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे कडून प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सन 2022 23 मध्ये यु डॅश प्रपत्र बाबत झालेले बदल याबाबत जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामवर यांनी यु-डायस प्लस प्रणालीचे काम करणाऱ्या अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील यु-डायस संबंधित काम करणारे संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एम आय एस कॉर्डिनेटर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, दिव्यांग विद्यार्थ्यांकरता काम करणाऱ्या अधिकारी, मोबाईल शिक्षक इत्यादी अधिकाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरावर याच प्रमाणे तालुक्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणाली बाबत प्रशिक्षण देण्यात यावे.  प्रशिक्षणामध्ये माहिती संकलना बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. सदरची माहिती भारत सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी करणार असल्याने सदरची माहिती अचूक असणे आवश्यक आहे. 

भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सर्वांना कळविण्यात येते की सन 2022 23 या वर्षातील सर्व शाळांची माहिती दिनांक 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने संगणकीकृत करून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत सादर करण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे. सन 2023 24 समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे व याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो. 

माहिती संकलनासाठी सन 2022 23 चे यु-डायस प्रपत्र भरण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना पत्र जोडले आहे. 

यु-डायस प्लस भरण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना

वरील प्रमाणे सविस्तर अशा सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना देण्यात आल्या आहे. 

Deta Capture Format मराठी
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.