शिष्यवृत्ती अपडेट - शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्ज साठी मुदतवाढ.

शिष्यवृत्ती अपडेट - शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्ज साठी मुदतवाढ.

मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, 
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, 
आर्थिक दुर्बल घटकांसाठी NMMS शिष्यवृत्ती योजना, 
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, 


सन 2022-23 साठी धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती NMMS, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या सर्व योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे व पडताळणीची अंतिम मुदत खालील प्रमाणे वाढवली आहे. यासाठी केंद्र शासनाने ईमेल द्वारे सन 2022-23 साठी NSP 2.0 पोर्टल वरील सूचनेनुसार कळविले आहे. 

नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी ची वाढीव अंतिम मुदत - 31.10.2022
शाळा स्तरावर ऑनलाईन अर्ज पडताळणीची वाढीव अंतिम मुदत - 15.11.2022
जिल्हास्तरावर ऑनलाईन अर्ज पडताळणीची वाढीव अंतिम मुदत - 30.11.2022

संदर्भीय विषयांकित योजनांमध्ये डिफेक्ट केलेले अर्ज आवश्‍यक ती दुरुस्ती करून पुन्हा एनपीएस पोर्टलवर भरण्यात यावे व शाळा व जिल्हा स्तरावर पुन्हा पडताळणी करावी. संबंधित सर्व शाळांना एन एस पी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांमधील सर्व अर्जांची पडताळणी पूर्वक करावी. एकही अर्ज शाळा स्तरावर प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. 

NMMS योजनेतील गुणवत्ता यादी मधील सन 2022 23 साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज एन पी एस पोर्टलवर भरण्यात यावे. प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती NMMS, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या योजनांसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांची अर्ज पोर्टल वर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची आहे. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी आपणावर निश्चित करण्यात येईल. 
उपरोक्त विषयांकित शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे दिलेल्या मुदत वाढीचा फायदा घेऊन आपल्या जिल्ह्यातील प्रलंबित सर्व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावे. तसेच पात्र मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी अर्ज जास्तीत जास्त संख्येने पोर्टलवर भरण्यात यावे. लाभार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. 
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेसाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची नियुक्ती करण्यात येत आहे संबंधित जिल्ह्यांनी नूडल ऑफिसर यांची माहिती अद्यावत करण्यासाठी पुढील प्रमाणे माहिती ईमेल द्वारे पाठवण्यात यावी. 

1) Name as Per Adhaar
2) Designation
3) Date of Birth
4) Mobile (Aadhar link) 
5) Gender
6) अद्ययावत Aadhaar Copy


वरील शिष्यवृत्ती अर्ज मुदतवाढ बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.