ZPFMS CMP प्रणालीने वेतन करण्यापूर्वी प्रत्येक शिक्षकाने/ मुख्याध्यापकाने घ्यावयाची काळजी

 ZPFMS CMP प्रणालीने वेतन करण्यापूर्वी प्रत्येक शिक्षकाने घ्यावयाची काळजी!. 


जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर त्यावर उपाययोजना म्हणून शिक्षकांचे पगार लवकर होण्यासाठी शिक्षण सचिव आयुक्त स्तरावरून ZPFMS CMP प्रणाली द्वारे जिल्हा परिषदांनी वेतन अदा करावे अशा सूचना देण्यात आल्या आहे.

काही जिल्हा परिषदांनी सदर प्रणाली या अगोदर सुरू केली असून काही जिल्हा परिषदांमध्ये याची कार्यवाही सुरू आहे. त्यांच्यासाठी शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना पुढीलप्रमाणे.


       ZPFMS CMP प्रणाली ने वेतन... 


CMP प्रणालीने वेतन करण्यापूर्वी प्रत्येकाने घ्यावयाची काळजी.


जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी ग्रामविकास विभागाचे पत्र.

              

 प्रत्येक शिक्षकांनी आपला वेतनाचा Account Number & IFSC code शालार्थ प्रणाली मधील Bank statement या पानावरून तपासून घ्यावे. यामध्ये दुरुस्ती असेल तर मुख्याध्यापक लॉगीन मधील update bank details या Tab चा उपयोग करून दुरुस्त करून घ्यावा.


 प्रत्येक शिक्षकांनी आपला वेतनाचे खातेची KYC update आहे किंवा नाही याची खात्री बँक मध्ये करावी. KYC Update नसेल तर Transaction होत नाहीत.


CMP ने वेतन करणे संदर्भात संमती पत्रभरून मुख्याध्यापकांना देणे.


मुख्याध्यापक


अधिनस्त प्रत्येक शिक्षक यांचे वेतनाचे खात्याची प्रत्यक्ष पासबुक / Bank statement या वरून पडताळणी करावी.


मुख्याध्यापकांनी ‌ शिक्षकांनी शालार्थ प्रणाली मधील Bank details या पेजवर दिलेल्या दुरुस्त्या तात्काळ करून दुरुस्ती केलेल्या  bank statement या पेजवर स्वाक्षरी घेणे.


 अधिनस्त सर्व शिक्षकांचे वेतनाचे account number & IFSC code ची पडताळणी केल्याचे प्रमाणपत्र पंचायत समितीस सादर करणे.


प्रत्येक शिक्षकाचे दरमहा जिल्हा स्तरावरून येणाऱ्या सुचनेनुसार  वेतन देयक तयार करणे तसेच सर्व लागू  असलेल्या गैरशासकीय कपाती ( co-op bank , credit society , Income tax , LIC , other deduction , other recovery ) नियमित करणे.


 दरमहा  देयकाचे change statement , outer ,inner , aquittance , bank statement याचे प्रिंट काढून त्यासोबत नियमित वेतन देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र जोडावे.


अचूक खाते क्रमांक व IFSC code हा CMP प्रणालीने अचूक वेतन होण्याचा आत्मा आहे. ही बाब लक्षात घेऊन काम करावे.





आता शिक्षकांचे पगार होणार कॅफेच्या खात्यातून सरळ शिक्षकांचे खात्यात जमा




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.