जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी कार्यवाही बाबत ग्रामविकास विभागाचे पत्र

 जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी कार्यवाही बाबत ग्रामविकास विभागाचे पत्र.

आज दिनांक 26 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतन विहित कालावधीत होण्यासाठी कार्यवाही बाबत केलेल्या पत्रानुसार दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी माननीय प्रधान सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या V C द्वारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतन विहित कालावधीत घेण्यात येत असलेल्या अडचणी बाबत चर्चा झाली व त्यानुसार आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पूर्वीच आवश्यक त्या सूचना दिली आहे मात्र या सूचना सध्या जिल्हा परिषदांकडून काटेकोरपणे कार्यवाही केली जात नसल्याचे माननीय मंत्री ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली 18 मे दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीत निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतन वेळेवर होण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषदांना ग्रामविकास विभागाने सूचना द्याव्यात असे कळविले आहे.

वेतन देयके कोषागारातून पारित झाल्यानंतर शिक्षकांच्या बँक खात्यात जमा होण्याच्या प्रक्रियेस असलेल्या कपड्यांमुळे विहित वेतन कालावधीत संबंधित शिक्षकांना जमा होण्यास विलंब होत असल्याचे व सदर टप्पे कमी करण्याबाबत वरील बैठकीत चर्चा झाली सद्यस्थितीत जालना जिल्हा परिषदेद्वारे वर नमूद वेतन देयक सादरीकरणाच्या प्रवाहात देयके कोषागारात पारित झाल्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून झेडपी एम एस ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याच धर्तीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी झेडपी एफ एम एस द्वारे शिक्षकांच्या खात्यावर थेट वेतनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्याबाबत वरील बैठकीत ठरले. त्यानुसार यापुढे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून झेड पी एफ एम एस प्रणालीद्वारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सदर पत्रानुसार करण्यात आले आहे.

शिक्षकांचे वेतन विहित कालावधीत करण्यासाठी शालार्थ प्रनालीतून वेतन देयके सादर करताना सोबत जोडलेल्या प्रपत्र ब मध्ये नमूद वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक आहे तसेच सदर कारवाईचा सोबत जोडलेल्या प्रपत्र ब मध्ये अहवाल दरमहा शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथील कृती गटाच्या ईमेलवर विहित कालावधीत सादर करण्यात यावे असे देखील निर्देश पदर पत्रानुसार देण्यात आले आहे.

ग्रामविकास विभागाची दिनांक 26 मे 2022 रोजी पत्र पुढील प्रमाणे.

वरील प्रपत्र व ग्राम विकास विभागाचे आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
Download
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.