खाजगी शाळेतील कनिष्ठ/वरिष्ठ/मुख्य लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, शिपाई पदासाठी सुधारित अहर्ता अधिसूचना..
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष १२, अंक २५(३)]
बुधवार, फेब्रुवारी २५, २०२६/ फाल्गुन ६, शके १९४७
असाधारण क्रमांक ८८
[पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२६.
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), विनियमन अधिनियम, १९७७.
क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.६८५/टीएनटी-१. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ (१९७८ चा महा.३) याच्या कलम १६ ची पोट-कलमे (१) व (२) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याचाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला नियमाचा खालील मसुदा, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (३) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे; आणि याद्वारे असे सूचित करण्यात येत आहे की, उक्त मसुदा दिनांक १२ मार्च, २०२६ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल.
२. उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे प्राप्त होणारी हरकत किंवा सूचना शासनामार्फत विचारात घेतली जाईल.
नियमाचा मसुदा
१. या नियमांस, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६ असे संबोधण्यात यावे.
२. मुख्य नियमाच्या अनुसूची "ब" मध्ये नोंद चार ऐवजी पुढील नोंद समाविष्ट करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २५, २०२६/फाल्गुन ६, शके १९४७
(चार) शाळांतील शिक्षकेत्तर पदांसाठी अर्हता-
कनिष्ठ लिपिक
(एक) सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीती अर्हता;
आणि
(दोन) टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट ३० शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची प्रति मिनिट ४० शब्द या मतीचे प्रमाणपत्र.
वरिष्ठ लिपिक
नियमित वेतनश्रेणीसह कनिष्ठ लिपीक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर ३ वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता-नि-गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने.
प्रमुख लिपिक
वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर ३ वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता-नि-गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने,
ग्रंथपाल
(एक) सांविधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील (B.Lib. Sc. or B.Lib..Sc.) पदवी किंवा
(दोन) मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
प्रयोगशाळा सहायक
मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण
शिपाई
मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान १२ वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहीत केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती.
टीप.- ज्येष्ठता-नि-गुणवत्ता या कसोटीचे काटेकोररीतीने पालन करून कर्मचारीवर्गामधून पदोन्नतीची पदे भरण्याच्या प्रयोजनास्तव, अनुसूची "फ" मध्ये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे "ज्येष्ठता" निश्चित करण्यात येईल; आणि नियम ३ च्या पोट-नियम (६) खालील स्पष्टीकरणातील "गुणवत्ता" या शब्दाच्या अर्थातर्गत; सेवा अभिलेखानुसार ती निश्चित करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
आबासाहेब कवळे,
शासनाचे उप सचिव.
संपूर्ण अधिसूचना PDF स्वरूपात Download
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments