मेडिकल बिल सादर करण्यासाठी कोरा प्रस्ताव, आजारांच्या यादी बाबत शासन निर्णय, आवश्यक कागदपत्रांची यादी व चेक लिस्ट सर्व एकाच ठिकाणी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

दिनांक : २७ फेब्रुवारी, २०२६.

क्रमांक : संकीर्ण-१६२६/प्र.क्र.०१/टीएनटी-५

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर.

विषय : वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत.

राज्यातील मान्यताप्राप्त व १०० % अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक शाळा आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरुन शासनास सादर केले जातात.

२. शासनस्तरावर प्रस्ताव सादर केल्यानंतर असे निदेर्शनास येत आहे की, उपसंचालक स्तरावरुन प्रस्तावाची तपासणी न करता अपूर्ण प्रस्ताव / तपासणी सुचीनूसार कागदपत्रे नसलेली प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्यात येत आहेत. शासन स्तरावर प्रस्ताव सादर झाल्यानंतर प्रस्तावामध्ये त्रूटी असल्यामूळे प्रस्तावांना विलंब होत आहे.

३. तसेच, शासनस्तराव प्राप्त प्रस्तावामध्ये समितीचे इतिवृत्त, वैयक्तिक मान्यता शासन आदेश, १०० % अनुदानित पदाचे वेतन घेत असल्याचे भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाचे प्रमाणपत्र शिक्यासंहित, शाळा मान्यतेचे शासन आदेश, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी असल्यास शाळा १००% अनुदानित असल्याबाबतचे शासन आदेश व रुग्णालयीन कालावधीतील शाळेची संच मान्यता इ. कागदपत्रे उपलब्ध करण्यात यावीत. सदर कागदपत्रे आपण प्रमाणित करुन सही व शिक्यासंहित शासनास सादर करावी.

३. वारंवार सुचना देऊनही त्रुटी असलेले प्रस्ताव प्राप्त होत आहेत. शासनस्तरावर प्राप्त त्रुटी असलेले प्रस्ताव मजूर झाल्यास व प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही बाब निदेर्शनास आल्यास तसेच न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची राहील.


(सिध्देश्वर सपकाळ) 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


मेडिकल बिल सादर करण्यासाठी कोरा प्रस्ताव, आजारांच्या यादी बाबत शासन निर्णय, आवश्यक कागदपत्रांची यादी व चेक लिस्ट सर्व एकाच ठिकाणी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा.


मित्रहो आपल्याला जेव्हा वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल म्हणजेच मेडिकल बिल आपल्या कार्यालयाकडे सादर करायचे असते त्या वेळेला कोरे मेडिकल बिलाचा प्रस्ताव सापडत नाही सदर प्रस्ताव आपण आपल्या ब्लॉग वर नेहमी साठी उपलब्ध ठेवणार आहोत सोबतच त्यासाठी आवश्यक असलेली चेकलिस्ट देखील उपलब्ध करून देत आहे. 

तसेच आजारांची यादी असलेला संबंधित शासन निर्णय आदेश देखील आपण डाऊनलोड करू शकता.


मेडिकल बिल चा संपूर्ण कोरा प्रस्ताव पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.

Download



वरील वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव तपासणी सूची चेक लिस्ट पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती च्या मंजुरी बाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 21 मार्च 2005 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


अवयव प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय बिल प्रस्ताव व अग्रिम मंजूर करणेबाबत शासन निर्णय.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


 




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.