आता शिक्षकांचे पगार क्याफ़ोच्या खात्यातून सरळ शिक्षकांच्या खात्यात ZPFMS प्रणाली लागू

आता शिक्षकांचे पगार क्याफ़ोच्या खात्यातून सरळ शिक्षकांच्या खात्यात ZPFMS प्रणाली लागू

यासंदर्भातील माहिती शिक्षण आयुक्तालय आतून सर्व जिल्हा परिषदांकडून मागवण्यात आली होती त्यामध्ये मागील तीन महिन्यात शिक्षकांचे तेव्हा पगार झाले होते, एप्रिल 2022 च्या वेतनाची सद्यस्थिती काय व शिक्षकांची पगार वेळेवर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात या संदर्भात माहिती मागवली गेली होती. 
व या माहितीच्या आधारे आधारे आज दिनांक 15 मे 2022 रोजी माननीय प्रधान सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या मध्ये खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या. 
दिनांक 1 मे 2022 पासून खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियम मासिक वेतन देयक दरमहा दहा तारखेपर्यंत वेतन पदाचा सादर करणे ही बाब लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सेवा म्हणून अधिसूचित करण्यात आलेली आहे त्यानुसार सेवावी कालावधीत देणे आवश्यक असून सदर सेवा विहित कालावधीत न दिल्यास अधिनियमात दंडात्मक कारवाईची तरतूद आहे याची नोंद घ्यावी. 
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देयक शालार्थ प्रणालीतून सादर करताना शिक्षण आयुक्तालयाची पत्र दिनांक 20 नोव्हेंबर 2014 मध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर केली जाईल याची दक्षता घ्यावी सदर वेळापत्रकानुसार कारवाही केले ची महिना निहाय अहवाल प्रपत्र अ मध्ये आयुक्तालयात ईमेलवर न चुकता सादर करण्यात यावी. 
जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शिक्षकांचे वेतन देयक कोषागार कार्यालयातून पारित झाल्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा होते तद्नंतर सदर रक्कम गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर जमा केली जाते व त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा केले जाते सदर प्रक्रियेस लढणाऱ्या कालावधीमुळे वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे सद्यस्थितीत जालना जिल्हा परिषदेमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून झेडपी एफ एम एस प्रणालीद्वारे शिक्षकांच्या खात्यावर थेट वेतनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली आहे या बाबत माननीय प्रधान सचिव वित्त विभाग यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी देखील शिक्षकांचे वेतन याच धर्तीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून झेडपी एफ एम एस ऑनलाइन प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खातरजमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे भारतीय प्रशासकीय सेवा यांनी दिले आहेत. 
अधिक माहितीसाठी आपण पुढे दिलेले परिपत्रक अभ्यासू शकता. 

वरील पत्रात उल्लेख केलेले दिनांक 20 नोव्हेंबर 2014 रोजी चे शिक्षण आयुक्त यांचे कार्यालयाचे पत्र पुढील प्रमाणे. 
या पत्रानुसार शाळांनी DDO 2 कडे ऑनलाइन वेतन देयके दरमहा सात तारखेपर्यंत सादर करावी. 
DDO 2 ने देयके कन्सोलिडेशन दरमहा दहा तारखेपर्यंत करावे. 
DDO 2 ने DDO 3 कडे देयके दरमहा 14 तारखेपर्यंत सादर करावी. 
DDO 3 ने DDO 4 कडे देयके दरमहा सादर 18 तारखेपर्यंत करावी. 
DDO 4 ने कोषागार कार्यालयाकडे दरमहा 20 तारखेपर्यंत वेतन देयके सादर करावी. 
वरील सर्व प्रक्रिया पार करू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधितांना धर्मा एक तर हेच मिळेल याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. 
असे स्पष्ट निर्देश या अगोदरच दिनांक 20 नोव्हेंबर 2014 रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेले आहे आहेत ते पत्र पुढील प्रमाणे. 

वरील दोन्ही पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.