वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे अपडेट्स.

 ⭐ वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे अपडेट्स.⭐
वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण संदर्भात अनेक शिक्षकांच्या काही समस्या, शंका होत्या. यासंदर्भात बरेच फोन येत आहेत. त्या अनुषंगाने आज मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी scert प्रशिक्षण कामकाज हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. शिक्षकांना उद्भवलेल्या आणि आमच्या पर्यंत पोहचलेल्या सर्व समस्या, प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा अधिकाऱ्यांशी यावेळी करण्यात आली. सारांश आपल्यासमोर मांडत आहे.


प्रश्न 1 :- काही तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचे प्रशिक्षण वेळेत सुरू झाले नाही. किंवा प्रशिक्षण १ जुन ला सुरू केले, मात्र त्यानंतर प्रशिक्षण गट बदल्याने किंवा इतर कारणांमुळे प्रशिक्षण पुन्हा बंद झाले, अश्या शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे का?


समाधान :-

होय. ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण तांत्रिक अडचणींमुळे बंद होते, ज्या शिक्षकांनी यासंदर्भात ऑनलाईन तक्रार नोंदविली होती. अश्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. काळजी नसावी.


प्रश्न क्रमांक २:-

स्वाध्याय अपलोड केले, अभिप्राय ही दिला मात्र अभिप्राय समोर दोन हिरव्या टिक मार्क येत नाहीत.


समाधान:-

आपण स्वाध्याय अपलोड करून अभिप्राय द्यावा. दोन हिरव्या टिक झाल्या नाहीत, तरी काळजी नसावी. Scert कडे आपला अभिप्राय नोंदविला गेला आहे.


प्रश्न क्रमांक ३:-

सर्व व्हिडिओ पाहिले, pdf वाचल्या, मात्र प्रशिक्षणाचा कालावधी (LEARNING HOUR) खूप कमी दिसत आहे.


समाधान :-

आपल्या प्रोफाईल मध्ये जरी प्रशिक्षणाचा कालावधी कमी दिसत असेल, तरी काळजी नसावी. LEARNING PROGRESS STATUS COMPLETED असे दिसायला हवे.


प्रश्न क्रमांक ४:-

व्हिडिओ पाहून ही, pdf file वाचूनही हिरवी डबल टिक येत नाही.


समाधान:-

Recalculate progress या पर्यायावर क्लिक करावा. हिरवी डबल टिक येऊन जाईल.


प्रश्न क्रमांक ५

प्रशिक्षण पुर्ण झाले, स्वाध्याय अपलोड केले, परीक्षाही दिली, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही?


समाधान :-

ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण, चाचणी पुर्ण केली आहे. स्वाध्याय अपलोड केले आहेत, अश्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र मिळण्याची सुरुवात या आठवड्याच्या शेवटपर्यंत व्हावी, यासाठी scert अधिकारी प्रयत्नशील आहेत. काही अडचण निर्माण न झाल्यास याच आठवड्यापासून प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होईल, अन्यथा पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळतील, अशी माहिती scert अधिकाऱ्यांनी संघटनेला दिली आहे.


प्रश्न ६:- ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुवातीपासून व्यवस्थित सुरू आहे, प्रशिक्षणात कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, अश्या शिक्षकांना वाढीव वेळ मिळणार आहे का?


समाधान:-

तूर्तास तरी नाही. ज्या शिक्षकांनी कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही प्रशिक्षण अद्याप पूर्ण केले नाही, अश्या शिक्षकांना तूर्तास तरी वेळ वाढवून दिली जाणार नाही.

------------------------------------------------------नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.