लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आचारसंहिता लागल्यामुळे काय सुरू राहणार आणि काय होणार बंद?

लोकसभा निवडणुक जवळ आली असून सध्या देशात याची रणधुमाळी सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. दिनांक 16 मार्च 2024 3 वाजता लोकसभा निवडणुकीचं वेळापत्र जाहीर झाले आहे. कोणाची कुठे सत्ता असेल याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच लोकसभा निवडणूक योग्य प्रकारे पार पडण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते. ज्यामुळे निवडणुकांमध्ये काही अडचण येणार नाही.

    येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असून यामध्ये काय सुरु राहणार आणि बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.



आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार


1. पेंशनचं काम

2. आधारकार्ड बनवणं

3. जाती प्रमाण पत्र बनवणं

4. वीज आणि पाण्यासंबंधी काम

5. साफसफाई संबंधी काम

6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं

7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम

8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही

9. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत

10. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.


आचारसंहितेमुळे या गोष्टींवर बंदी


1. सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद

2. नव्या कामांचा स्वीकार बंद

3. सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत

4. मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत

5. सरकारी वाहनांना सायरन नाही

6. सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील

7. सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.

8. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत

9. कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.

10. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा. तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोचवू शकते. म्हणून कुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा. हे नियम सर्वसाधारण व्यक्तींनाही लागू होणार.


निवडणुकांची घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील आता निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

  1. जि.प.विनंती बदल्या होतील का

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.