Sanch Manyata 2022-23 Update - शून्य किंवा एक पद मंजूर झालेल्या शाळांची संचमान्यता दुरुस्त करणे बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक

 प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक प्रचार ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित दिलेल्या परिपत्रकानुसार सन 2022 2023 मध्ये पद शिफ्टींग केल्यामुळे शून्य (0) किंवा एक (1) पद मंजूर झालेल्या शाळांची संचमान्यता दुरुस्त करावयाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


सन 2021-2022 मध्ये पदे मंजूर असून सन 2022-23 मध्ये पद शिफ्टींग केल्यामुळे सन 2022 2023 च्या संचमान्यता मध्ये शून्य (0) किंवा एक (1) पद मंजूर झालेल्या शाळाबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.


1. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी सदर शाळांचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांना पद शिफ्टींग बाबत सादर करावा.


2. शिक्षण उपसंचालक यांनी सदर शाळेची संचमान्यता नल (Null) करण्यासाठी प्रस्तुत संचालनालयास पत्र द्यावे.


3. सन 2022 2023 ची संचमान्यता नल (Null) झाल्यावर शिफ्टींग पोस्टची कार्यवाही नियमाप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करावी.


4. सदर कार्यवाही पूर्ण झाल्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत संचालनालयास अवगत करावे. त्यानंतर संचालनालयाच्या स्तरावरुन सर्व संबंधीत शाळांच्या संचमान्यता जनरेट करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.


(शरद गोसावी)


शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर प्रत मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.