Vishay Shikshak Padavidhar Vetanshreni Update - विषय शिक्षक यांना पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनोत्तीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे महत्वपूर्ण परिपत्रक

विषय शिक्षक यांना पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनोत्तीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाला पुढील प्रमाणे मार्गदर्शन मागविले आहे.


शासन निर्णय दि.१४/११/१९७९ मधील तरतुदीनुसार इयत्ता ५ वी ते ७ वी या गटाकरिता निश्चित केलेल्या शिक्षकांच्या एक चतुर्थांश (२५ टक्के) पदावर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जात असे. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या वर्गाकरिता २५ टक्के पदावर नियुक्त पदवीधर शिक्षकांना गणित / विज्ञान व इंग्रजी हे कठीण समजले जाणारे विषय शिकविणे अपेक्षित होते. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ राज्याने स्विकारल्यानंतर सुधारित


इयत्ता ६ वी ते ८ वी या गटाकरिता शिक्षकांची किमान पात्रता पदवीधर अशी निश्चित करण्यात आलेली आहे. इयत्ता ६ वी ते ८ वी सुधारीत गट अस्तित्वात येऊन बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार या गटावर नियुक्त शिक्षकांची शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर असल्यामुळे तसेच राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE) अधिसूचना दि. २३/८/२०१० मधील तरतुदी नुसार इयत्ता ६ वी ते ८ वी पदवीधर (बी.एड) व TET उत्तीर्ण ही शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे.


राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE) अधिसूचना दि.१२/११/२०१४ नूसार शिक्षकांच्या पदोन्नती बेतनत्तीसाठी सुध्दा TET आवश्यक आहे असे नमूद आहे. तथापि, (NCTE) २०१० च्या अधिसूचनेतील मुद्दा क्र. नुसार या अधिसूचनेपूर्वी जर शिक्षकांची नियुक्ती झाली असेल तर TET च्या पात्रतेतून सूट देण्यात आली आहे. (NCTE) अधिसूचना २०१० व २०१४ मधील तरतुदीचा आधार घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या वेतनाची जिल्हा स्तरावर होत नसल्याने अनेक शिक्षक संघटनाना निर्देशनास आणून दिलेले आहे.


वास्तविक महाराष्ट्र राज्याने TET दि.१३/२/२०१३ पासून लागू केली आहे. व प्रशिक्षित पदवीधर वेतनोत्ती देण्यात येणारे शिक्षकांची नियुक्ती २०१३ पूर्वीची असल्यास सदरची वेतनोत्ती देताना TET ची अट शिथिल करावी अशी या कार्यालयाची धारणा आहे. कृपया याबाबत आपल्या स्तरावरून उचित आदेश व्हावेत ही विनंती.


आपला विश्वासू (शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.