शाळा व्यवस्थापन समिती/शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे पुनर्गठन प्रक्रिया संपूर्ण माहिती.

 शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया करतानाचे टप्पे


RTE कलम २१ नुसार पुनर्गठन करताना पुनर्गठन मधील बारकावे समजून घ्यावीत.


१. एकूण समितीच्या ५० % महिला सदस्य घेणे, फक्त पालक सद्स्यातून ५० % महिला घेतल्या प्रमाण चुकते व RtE नुसार महिला प्रमाण होत नाही.


२. एकूण समितीच्या ७५ % पालक सदस्य घेताना प्रत्येक वर्गातून घ्यावे तसेच उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातील माता पित्यांना प्रमाणशीर सदस्यत्व देण्यात येईल. म्हणजे ज्या वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत अधिक पालक असतील


तर जास्त सदस्य त्या वर्गातून घेणे. ३. २५ % इतर सदस्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण प्रेमी यांचा समावेश


होतो.


४. दोन विद्यार्थी स्वीकृत सदस्य असल्याने एकूण समितीमध्ये त्यांचा समावेश होते नाही. जर एकूण समिती १६ असेल तर २ विद्यार्थी प्रतिनिधी मिळून १८ अशी संख्या होते...


पूर्वतयारी


१. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान आठ दिवस अगोदर लेखी सूचना द्यावी. ज्या मध्ये पुनर्गठन दिनांक, वेळ, स्थळ याचा समावेश असेल.


२. ग्रामपंचायतीस पत्र देऊन ग्रामपंचायत सदस्य यांची मागणी करावी. जेणेकरून ग्रामपंचायत कडून महिला किंवा


पुरुष सदस्य मिळाल्यास, पालकांमधून महिलांचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेता येईल. उदा. जर ग्रामपंचायत


सदस्य महिला असेल तर ५० % महिला प्रमाण राखताना अडचण येणार नाही. अन्यथा पुरुष सदस्य दिले तर


पालक सद्स्यातून महिलांचे प्रमाण वाढवावे लागेल.


३. सर्व शिक्षकांच्या मदतीने शिक्षक प्रतिनिधीची निवड करावी.


४. कोणत्या वर्गातून किती सदस्य घ्यावे हे निश्चित करताना उदा. १ली ते ८ वी मध्ये १२ पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलांच्या प्रमाणानुसार पालकांचे सदस्यत्व मिळेल हे निश्चित करावे लागते.


म्हणजे :- एकूण विद्यार्थी भागिले एकूण सदस्य संख्या


समजा वर्ग निहाय मुले १७८ आहेत





५. याच बरोबर इतर घटकांना प्रतिनिधित्व देतानाही असाच नियम लावला पाहिजे कि, ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या आहे तेथे प्रतिनिधित्व देणे. तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे तेथे महिला सदस्य देणे.


उदा. जात निहाय :- OPEN ८०/१५ = ५ प्रतिनिधी, OBC -५२/१५ = ४. ST १८/१५ = १ २ अश्या प्रमाणात निवड करावी.


SC २६/१५ =


६. वर्ग निहाय प्रतिनिधित्व संख्या व जात निहाय सदस्य संख्या यांची माहिती तयार करून पुनर्गठन करण्यापूर्वी फलकावर लावून घ्यावी.


शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दरम्यान :-


१. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याच्या दिवशी सर्व पालक वर्ग निहाय बसतील यासाठी व्यवस्था करावी. २. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यापूर्वी सर्व उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे कर्तव्य, जबाबदारीची माहिती दयावी.


३. वर्ग निहाय किती सदस्य निवडणार आहोत हे फलकावर मांडून ठेवावे व त्यानुसार सूचना देऊन इच्छुक सदस्यांची नावे फळ्यावर अनुक्रमे लिहावीत.


४. वर्ग निहाय सदस्य निवडताना गोंधळ होण्याची शक्यता असेल तर गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे. अन्यथा खुले मते देखील स्वीकारू शकतो.


५. गुप्त मतदान घेताना शाळेच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून सर्व पालकांना वाटाव्यात व त्यावरती सदस्यांचे


नाव किंवा अनुक्रमांक लिहून घ्यावा.


६. एका वर्गातून एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार असेल तर एक एक सदस्यांची निवड प्रक्रिया राबवावी, ७. जास्त मते मिळालेल्या सदस्यांना विजयी घोषित करावे.


८. सर्व वर्गातील पालक सदस्यांची निवड झाल्यास सर्व पालकांमधून एका शिक्षण प्रेमी सदस्यांची निवड करून


घ्यावी.


९. शिक्षण प्रेमी सदस्य निवडल्यानंतर फक्त सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घ्यावी. इतर पालकांचा समावेश होणार नाही याची क्षमता घ्यावी.


१०. इतर पालकाचा हस्तक्षेप होणार असेल तर दोन दिवसांनी दिनांक, वेळ, स्थळ ठरून पालकांमधून अध्यक्ष,


उपाध्यक्ष यांची निवड करावी.


शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन नंतर :-


१. वर्ग निहाय निवडलेल्या सदस्यांची नावे सर्वाना सांगणे व इतिवृत्तावर सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे.


२. प्रत्येक महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठकीची एक तारीख निश्चित करणे. जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या बैठकीसाठी सदस्यांना पूर्व कल्पना येईल.


३. शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या गुणवत्ता बाबत वर्ग निहाय माहिती देणे.


४. शाळेच्या गुणवत्ता व भौतिक सुविधाच्या आराखड्याबाबत कल्पना देणे व आवश्यक त्या ठिकाणी सहभाग निश्चित करावा. ज्यामुळे नियमित वेळेत हे आपल्या कामाचा भागच आहे असे सर्व सदस्य निश्चित करतील..


५. शाळा व्यवस्थापन समिती बैठका नियमित होण्यासाठी, शाळेत पालकांचा नियमित सहभाग होण्यासाठी काही नियमावली बनविणे. उदा. एखादा सदस्य सलग तीन महिन्याच्या बैठकीस उपस्थित नसल्यास त्यांचे सभासदत्व रद्द करणे.


६. पालक शिक्षक संघ नुसार दोन महिन्यातून एकदा पालक सभेचे आयोजन करणे. ७. मुलांच्या शिकण्यात पालकांचा सहभाग वाढीसाठी वर्ग निहाय नवनिर्वाचित सदस्यांच्या जबाबदारीचे वाटप करणे.


८. RtE नुसार समिती सदस्यांच्या जबाबदारीची व अधिकारांची माहिती देणे.. 

3. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया राबविण्याच्या दिवशी किंवा आठ दिवस अगोदर शाळेच्या दर्शनी भागावर किंवा फलकावर वर्ग निहाय, जात निहाय आरक्षण यादी लावली जावी. जेणे करून सर्व पालकांना याबाबत पूर्व सूचना असेल.


ऊ. शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याअगोदर मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायत यांना पत्र देऊन ग्रामपंचायतकडून शाळा व्यवस्थापन समिती मध्ये स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी म्हणून एका ग्रामपंचायत सदस्याची मागणी करून घ्यावी.


ए. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करताना प्रत्येक पालक वर्गनिहाय वर्गात बसतील व वर्गनिहाय सदस्य निवडले जातील यासाठी इतर शिक्षकांसोबत मुख्याध्यापकांचे नियोजन असावे जेणे करून मोठ्या शाळेत अधिक लोकसंख्या असलेल्या शाळेत गोंधळ किंवा वाद निर्माण होणार नाहीत व सर्व प्रक्रियेत पारदर्शकता येईल याचे नियोजन करावे.


टप्पा दोन प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया :-


अ. पालकांना सूचना व वर्ग निहाय प्रतिनिधित्वाची माहिती देणे :- पालकांना शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठन प्रक्रिया दरम्यान एकत्र करून प्रथम एकत्र येण्याचा उद्देश व वर्गनिहाय, जातनिहाय, दुर्बल घटक व महिला प्रतिनिधी हे कोणत्या वर्गातून किती घेणे आहेत याबाबत माहिती द्यावी जेणे करून ज्या पालकांनी निमंत्रण पत्र वाचले नसेल त्यांना माहिती होईल.


ब. वर्ग निहाय बसण्याची व्यवस्था करणे व पालक सदस्यांची निवड करणे :- प्रत्येक पालकांना त्यांचा पाल्य ज्या वर्गात आहे त्या वर्गात जावून बसण्यासाठी सांगणे उदा. एक मुल २ री ला असेल व एक ५ वी ला असेल व सदर पुनर्गठन प्रक्रिया साठी आई वडील आले असतील तर एका एका वर्गात पाठविता येते. तसेच फक्त वडील आले असतील तर २ री च्या वर्गातून त्यांची निवड नाही झाली तर ५ वी च्या वर्गासाठी निवड प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. त्यानुसार प्रत्येक वर्गातील सदस्यांची निवड करण्यात यावी.


क. निवड करताना प्रक्रिया :-


१. प्रथमत वर्ग शिक्षकांनी प्रत्येक वर्गातून किती सदस्यांची निवड करायची आहे. यामध्ये महिला प्रतिनिधी, जातनिहाय प्रतिनिधी, दुर्बल घटक प्रतिनिधी याची माहिती जमलेल्या सर्व पालकांना द्यावी.


२. उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थांना शाळा व्यवस्थापन समितीचे RtE कायद्यानुसार महत्व स्पष्ट करावे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीची शाळा विकासात जबाबदारी स्पष्ट करावी. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या मासिक बैठकीस उपस्थित राहून शाळेच्या कामकाजात मदत करणे.


शाळा व्यवस्थापन समिती च्या जबाबदाऱ्या १. अध्यक्ष:- SMC च्या बैठका नियमित होण्यासाठी सदस्यांशी समन्वय साधने.


३. RtE कायद्यानुसार दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्याच पालकांनी सहभाग घ्यावा यासाठी सर्व जबाबदारीचे वाचन करून दाखविणे. जेणेकरून कामासाठी पुढाकार घेणारा योग्य व्यक्तीच समितीमध्ये येईल व राजकीय महत्वकांक्षा असणारे व्यक्ती देखील स्वतःची जबाबदारी समजून घेऊनच सहभाग घेतील.


४. ज्या पालकांना शाळा व्यवस्थापन समितीचा भाग व्हायचा आहे इच्छुक सदस्य म्हणून त्यांनी आपली नावे वर्ग शिक्षकांना द्यावी. जेणे करून वर्ग शिक्षक इच्छुक सदस्यांची नावे फळ्यावर क्रमानुसार लिहतील.


५. निवड प्रक्रिया करताना कोणाची हरकत नसेल तर प्रत्येक सदस्यांचे नाव घेऊन इतर पालकांना खुले मतदान करण्यासाठी सांगावे पण एक व्यक्ती दोन वेळेस मतदान करणार नाही याची काळजी घ्यावी.


६. वर्ग निहाय सदस्य निवडताना गोंधळ होणार असेल तर प्रत्येक वर्गात पालकांना बसविणे व एक चिठ्ठी देऊन त्यावर शाळेचा शिक्का मारणे व प्रत्येक सदस्यांच्या नावाचा किंवा अनुक्रमांकाचा चिठ्ठीवर उल्लेख करून तो वर्ग शिक्षकांकडे जमा करावा किंवा मतदान पेटीत टाकावा.


७. सर्व पालकांचे मतदान झाले हे निश्चित करून वर्ग शिक्षकांनी सर्व चिठ्ठ्या किंवा मतपेटीतील चिठ्ठ्या एकत्र करून प्रत्येक चिठ्ठीवरील अनुक्रमांक किंवा नाव मोठ्याने वाचून दाखविणे व त्याचा एकत्रित संघ करणे. ज्या सदस्यांच्या क्रमांकाच्या किंवा नावाच्या चिठ्ठ्या अधिक आहेत त्यांना त्या वर्गाचा सदस्य घोषित करणे.


८. प्रत्येक वर्गातून मुलांच्या प्रमाणात पालकांची शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून निवड झाल्यास शिक्षण प्रेमी किंवा शिक्षण तज्ञ म्हणून एका उच्च शिक्षित तरुण, निवृत्त शिक्षक किंवा ज्यांना शिक्षणात आवड आहे याची एकमताने निवड करण्यात यावी.


९. सर्व शिक्षकांनी ही आपल्यातून एका शिक्षकाची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करून द्यावी. या प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालक सदस्य, शिक्षण प्रेमी, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक प्रतिनिधी यांची निवड झाल्याचे निश्चित केल्यानंतरच अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करावी. १०. लक्षात घ्या की, अध्यक्ष निवड ही शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीच करायची आहे, अध्यक्ष थेट साधारण पालक सभेतून निवडायचा नाही. त्यामुळे आधी समिती गठीत करून घ्यावी व नंतर त्या समितीने अध्यक्ष निवड करावी यामुळे अध्यक्षांची निवड करताना एक किंवा दोन दिवसाचा अवधी घेतल्यास शाळा व्यवस्थापन समिती निवडताना राजकीय रूप येत नाही. किंवा ग्रामस्थामध्ये शाळेबाबत नाराजीची भावना निर्माण होणार नाही.


टप्पा तीन - शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया नंतरची प्रक्रिया :- ९. वर्ग निहाय निवडलेल्या सदस्यांची नावे सर्वाना सांगणे व इतिवृत्तावर सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे.


२. प्रत्येक महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठकीची एक तारीख निश्चित करणे. जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या बैठकीसाठी सदस्यांना पूर्व कल्पना येईल.


३. शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या गुणवत्ता बाबत वर्ग निहाय माहिती देणे.


४. शाळेच्या गुणवत्ता व भौतिक सुविधाच्या आराखड्याबाबत कल्पना देणे व आवश्यक त्या ठिकाणी सहभाग निश्चित करावा. ज्यामुळे नियमित वेळेत हे आपल्या कामाचा भागच आहे असे सर्व सदस्य निश्चित करतील.


५. शाळा व्यवस्थापन समिती बैठका नियमित होण्यासाठी, शाळेत पालकांचा नियमित सहभाग होण्यासाठी काही नियमावली बनविणे. उदा. एखादा सदस्य सलग तीन महिन्याच्या बैठकीस उपस्थित नसल्यास त्यांचे सभासदत्व रद्द करणे. प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्यातून एकदा पालक सभा घेण्यासाठी सर्व सदस्यांची जबाबदारी निश्चित करणे, अध्यक्ष हे सर्वांच्या अनुमती आर्थिक व्यवहार करतात. परंतु निर्णय हे सर्व समिती सदस्यांना बैठकीतच घ्यावयाचा असतो.


६. मुलांच्या शिकण्यात पालकांचा सहभाग वाढीसाठी वर्ग निहाय नवनिर्वाचित सदस्यांच्या जबाबदारीचे वाटप करणे.


७. RtE नुसार समिती सदस्यांच्या जबाबदारीची व अधिकारांची माहिती देणे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.