पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०८ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना
शासनमान्य शाळांमधून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. २७/१०/२०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. व
उपरोक्त परीक्षा दि. ०८ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
सोबत :- अधिसूचना
स्वाक्षरीत /-
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
परीक्षेचे वेळापत्रक :-
१.१ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी)
रविवार दि. ०८ फेब्रुवारी, २०२६
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा : रविवार दि. ०८ फेब्रुवारी, २०२६
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक :-
कालावधी
नियमित शुल्कासह
२७ ऑक्टोवर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५
(With Regular Fee)
विलंच शुल्कासह
०१ डिसेंबर २०२५ ते १५ डिसेंबर २०२५
(With Late Fee)
अतिविलंब शुल्कासह
१६ डिसेंबर २०२५ ते २३ डिसेंबर २०२५
(With Super Late Fee)
अति विशेष विलंब शुल्कासह
२४ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५
(With Special Super Late Fee)
दि. ३१/१२/२०२५ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता
वेणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.
➤ पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.
२) शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :-
> प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
> पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याव नोंदविणे बंधनकारक असेल.
३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :-
१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२. विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित /
स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.
४) विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष :-
१) पुसेगाव, जि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.
> शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा:-
1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असाचा,
2. शाळा ग्रामीण भागातील असावी.
3. फक्त मुलगा असावा, (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)
4. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.
> आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-
सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.
1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा,
2. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)
3. अनुसूचित जमातीतील (एस. टी.) असावा.
4. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा.
5. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.
> विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-
वि.जा.भ.ज. विद्यानिकेतन हे कमळेवाडी, पो. शिरुर (दबडे), ता. जि. नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.
1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्याथी असावा.
2. आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा,
3. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "वि.जा.भ.ज. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.
५) परीक्षेचे माध्यम :-
५.१ परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.
१. मराठी ६. तेलुगु २. उर्दू ७. कन्नड ३. हिंदी ४. गुजराती ५. इंग्रजी
५.२ उपरोक्त सात माध्यमांशिवाय सेमी माध्यमांचे पुढील सहा पर्याय उपलब्ध आहेत.
१. मराठी इंग्रजी
२. उर्दू इंग्रजी
३. हिंदी + इंग्रजी
४. गुजराती + इंग्रजी
५. तेलुगु इंग्रजी
६. कन्नड + इंग्रजी
५.३ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी
पेपर १ मधील गणित या विषयाची व पेपर २ मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.
वयोमर्यादा :-
६.१ वा परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्याध्यर्थ्यांचे वय दि. ०१ जून २०२५ रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.
परीक्षेचे नाव
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी),
११ वर्षे
सर्व प्रवर्ग दिव्यांग
१५ वर्षे
शासकीय / आदिवासी/ वि. जा. भ. ज. विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
प्रवर्ग
१४ वर्षे १८ वर्षे
६.२ आवेदनपत्रात विद्याथ्यांची जन्मतारीख चुकीची नोंदविल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ
सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारीज रजिस्टरवरून खात्री करुनच जन्मतारीख अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.
६.३ चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरल्यास संबंधित मुख्याध्यापकांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
६.४ अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रजिस्टरमध्ये नोंदविलेली असल्यास (उदा. ३१ एप्रिल) तो ऑनलाईन आवेदनपत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपध्दतीनुसार दुरुस्त करून त्यानंतरच आवेदनपत्रात नोंदवावी.
६.५ उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची
ऑनलाईन आवेदनपत्रे भरल्यास स्क्रीनवर 'विद्यार्थ्यांचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे, तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.' असा संदेश दिसेल. अशा विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेस प्रवेश मिळेल परंतु त्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच सदर बाव संबंधित विद्यार्थी व पालक यांच्याही निदर्शनास आणून द्यावी.
परीक्षा शुल्क :-
७.१ शासन निर्णय क्र. प्राडशि/प्र.क्र.२३/२०२५ (ई-११४२१७०) / एसडी-५, १७/१०/२०२५ व कार्यकारी समिती सभा क्र. २९, दि. १२/०४/२०१८, ठराव क्र. ४७० नुसार दर पुढीलप्रमाणे आहेत.
७.२ महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम रावविणाऱ्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही.
७.३ सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुच्दा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.
७.४ उर्वरित्त SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागेल.
शुल्क भरण्याची पध्दत :-
८.१ शाळांसाठी सूचना उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करुन इयत्तानिहाय (इ. ५ वी व इ. ८ वी) स्वतंत्रपणे शक्यतो एकाचवेळी भरावे.
८.२ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शाळांसाठी सूचना ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थ्यांच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड / मनपा निधीमधून भरली जाते, अशा शाळांना सदर सुविधा केवळ नियमित मुदतीपर्यंत म्हणजे दि. ३०/११/२०२५ रोजीपर्यंतच उपलब्ध करुन देण्यात येईल. नियमित मुदतीनंतर आवेदनपत्र भरावयाचे असल्यास संबंधित शाळेला विलंब शुल्कासह शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यानुसार शाळांनी स्वतः विलंबासह शुल्क भरणे आवश्यक राहील.
८.३ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
यांच्यासाठी सूचना : ज्या जिल्ह्यांमध्ये सदर परीक्षेच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड / मनपा निधीमधून भरली जाते, त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशासन अधिकारी यांनी शासन निर्णय दि. ११/११/२०२१ नुसार सन २०२१ २२ च्या परीक्षेपासून शुल्क वाढ झाली असल्याची बाब जि. प. मनपाच्या संबंधित समितीच्या निदर्शनास आणावी.
आपल्या जिल्ह्यातील नियमित शुल्काच्या मुदतीत आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शुल्काची एकूण रक्कम तात्काळ उपलब्ध करुन घ्यावी व परिषदेच्या खात्यावर इयत्तानिहाय ऑनलाईन पेमेंटव्दारे दि. ३१ डिसेंबर, २०२५ रोजी अखेरपर्यंत भरावी. सदर शुल्क भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. उपरोक्तनुसार शुल्काचा भरणा विहित मुदतीत न केल्यास सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार नाहीत. तसेच जिल्हा परिषद / मनपा शाळांना नियमित शुल्काच्या मुदतीनंतरचे (दि. ३०/११/२०२५ नंतरचे) कोणतेही विलंब शुल्क माफ केले जाणार नाही, त्यामुळे आपल्या अधिनस्त सर्व शाळांना नियमित मुदतीत आवेदनपत्र भरण्याच्या लेखी सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.
९) परीक्षा परिषद शाळा सांकेतांक :-
शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व कामकाज युडायस कोडनुसार करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा परिषद शाळा सांकेतांक नोंदविण्याची आवश्यकता नाही.
परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती :-
१. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात देण्यात येतील.
२. उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पध्दतीने केली जाते.
३. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी (छायाप्रत) देण्यात येणार नाही.
४. उत्तरपत्रिकेत गिरवलेली खाडाखोड केलेली उत्तरे ग्राहय धरली जाणार नाहीत. एकदा नोंदविलेले उत्तर बदलता येणार नाही.
५. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. अशा उत्तरांना शून्य गुण दिले जातील.
६. शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी, शिष्यवृत्तीधारकांची निश्चिती, विद्यानिकेतन प्रवेश निवड याद्या, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका / प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते.
१५) शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी कागदपत्रे
खालीलप्रमाणे :-
१. विद्यार्थ्यांची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb
पेक्षा जास्त नसावी.)
उदा. :-
विद्यार्थ्यांचा फोटो
विद्यार्थ्यांची स्वाक्षरी
२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार/ प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वीसाठी)
३. विद्यार्थ्यांचे पालक रु.१,००,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास
भूमिहीन शेतमजूर व रू.१,००,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वीसाठी)
४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.
) विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बैंक खाते क्रमांकाबाबत :-
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या आधारकार्डशी संलग्न असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई, वडील किंवा पालक यांच्या सोबतच्या संयुक्त बैंक खात्याची माहिती (विद्यार्थ्यांशी नाते, बैंकेचे नाव, IFS Code व बैंक खाते क्रमांक), उपलब्ध असल्यास नमूद करावा. सदर बाब अनिवार्य नसल्याने बँक खात्याच्या तपशीलाबाबत विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणतीही एक माहिती अचूकपणे नमूद करावी.
१७) शिष्यवृत्ती रकमेतील वाढ :-
शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. ५ वीच्या सर्व संचांकरीता रु.५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु.५०००/- प्रतिवर्ष) व इ. ८ वीच्या सर्व संचांकरीता रु.७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु.७५००/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे.
१८) पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा :-
शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार इ. ५ वी
व इ. ८ वीच्या मागासवर्गीय मुले मुली (H) व मागासवर्गीय मुली (1) या शिष्यवृत्ती संचांकरीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात आलेली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२६ च्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविले जातील. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
स्वाक्षरीत/-
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ची अंतिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत रित्या जाहीर केली आहे.
अंतिम उत्तरसूची
प्रसिध्दीपत्रक
रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. ०४ मार्च, २०२५ रोजी परिषदेच्या https://puppssmsce.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या https://puppssmsce.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.
ठिकाण - पुणे
दिनांक - २१/०३/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०४
दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ची अंतरीम म्हणजेच तात्पुरती उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत रित्या जाहीर केली आहे.
प्रसिध्दीपत्रक
रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-
१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन करण्याकरीता दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दि. ११/०३/२०२५ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-
१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
ठिकाण - पुणे
दिनांक 04/03/2025
(संजयकुमार राठोड)
उपायुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पाचव्या वर्गाच्या संभाव्य उत्तर सूची पुढील प्रमाणे
दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या आठव्या वर्गाच्या संभाव्य उत्तर सूची पुढील प्रमाणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दि. 17/01/2025 रोजी स. 11-०० वाजता संबंधित शाळेच्या, लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04.
Hall Ticket download link
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2025 पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 17/10/2024 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ०७ डिसेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १५ डिसेंबर, २०२४ पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. सोबत :- प्रसिध्दीपत्रक आपली विश्वासू,
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व पाचवी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
प्रसिध्दीपत्रक
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२, दि. १७/१०/२०२४.
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना जाहीर.
शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
अर्ज पत्र भरण्यासाठी डायरेक्ट लिंक
उपरोक्त परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
सोबत :- अधिसूचना
स्वाक्षरीत /- (अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
१५) शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी / कागदपत्रे खालीलप्रमाणे :-
१. विद्यार्थ्यांची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)
उदा.:-
विद्यार्थ्यांचा फोटो
विद्यार्थ्याची स्वाक्षरी
२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)
३. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)
४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.
१६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत :-
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी संलग्न असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे आई, वडील किंवा पालक यांच्या सोबतच्या संयुक्त बँक खात्याची माहिती (विद्यार्थ्याशी नाते, बँकेचे नाव, IFS Code व बँक खाते क्रमांक), उपलब्ध असल्यास नमूद करावा. सदर बाब अनिवार्य नसल्याने बँक खात्याच्या तपशीलाबाबत विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये.
केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणतीही एक माहिती अचूकपणे नमूद करावी.
१७) शिष्यवृत्ती रकमेतील वाढ :-
शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. ५ वीच्या सर्व संचांकरीता रु.५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु.५०००/- प्रतिवर्ष) व इ. ८ वीच्या सर्व संचांकरीता रु.७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु.७५००/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे.
१८) पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा :-
शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार इ. ५ वी व इ. ८ वीच्या मागासवर्गीय मुले/मुली (H) व मागासवर्गीय मुली (1) या शिष्यवृत्ती संचांकरीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात आलेली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ च्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविले जातील.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
स्वाक्षरीत /-
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
















0 Comments