केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चा ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या महत्त्वपूर्ण अडचणी बाबत स्पष्टीकरण

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चा ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या महत्त्वपूर्ण अडचणी बाबत स्पष्टीकरण.


केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चे ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे.

यामध्ये आपल्या बरेचशा शिक्षक बांधवांनी नोकरीला लागल्यानंतर त्यांची पदवी पूर्ण केली आहे. अशावेळी जर सुरुवातीची रुजू दिनांक आपण पोर्टलवर नोंदवली तर खालील स्क्रीन शॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी एरर दाखवते आणि अर्ज सबमिट करता येत नाही.

अर्थात आपल्याला जर सुरुवातीचीच रुजू दिनांक टाकायची असेल तर सदर येणारी अडचण परीक्षा परिषदेच्या हेल्पलाइन नंबर वर व ईमेल आयडी वर कळवावी.

परंतु केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 साठी अर्ज करण्यासाठी शिक्षण सेवक वगळून एकूण तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यामुळे आपण पदवी केल्यानंतर बदली होऊन एखाद्या शाळेवर गेला असाल आणि त्या शाळेची रुजू दिनांक टाकून तीन वर्ष सेवा कालावधी पूर्ण होत असेल तर त्या एका शाळेची सेवा जरी आपण ऑनलाईन अर्ज करताना नोंदवली तरी पुरेशी आहे कारण केंद्रप्रमुखाची निवड ही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर होणार आहे तुमच्या एकूण सेवेची तिथे आवश्यकता नाही.

त्यामुळे पदवी पूर्ण झाल्यानंतर तीन वर्ष सेवा झालेल्या शाळेतील सेवा जरी आपण ऑनलाइन अर्जावर नोंदवली तरी चालेल. असे काही तज्ञ मंडळींचे मत आहे.


ज्यांना अर्ज भरताना अडचण येत आहे त्यांनी अर्ज भरण्याची घाई न करता सोमवार दिनांक 12 जून 2023 पर्यंत काही सुधारणा होते का याची वाट पहावी अर्ज भरण्याची घाई करू नये.

आपल्याला येत असलेली अडचण परीक्षा परिषदेच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर मेल करून कळवावे म्हणजे परीक्षा परिषद त्यावर निर्णय घेऊन आवश्यक त्या सुधारणा करू शकेल.

अर्ज भरण्याची वेबसाईट म्हणजेच संकेतस्थळ हे मोबाईल वर ओपन होत नाही त्यामुळे अर्ज हा लॅपटॉप किंवा कम्प्युटर वरच भरता येतो.


विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झाल्यानंतर जे उच्च श्रेणी मुख्याध्यापक व पदवीधर किंवा वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी लागू असलेले शिक्षक आहेत यांना वेतनामध्ये कोणतीही वेतन वाढ होणार नाही असे ग्रामविकास विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 च्या जाहिरातीमध्ये केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती ही प्रशासन प्रशासनाच्या सोयीने देणार आहे परीक्षेत मिळालेल्या गुणाानुसार पदस्थापना देण्याचा दावा उमेदवार करू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहिरातीत आहे.



केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती
१)पूर्ण नाव
२)शालार्थ आयडी
३)जात प्रवर्ग
४)दिव्यांग आहात का ?
५)असल्यास प्रकार
६)प्रमाणपत्र क्रमांक
७)धर्म
८)आधार क्रमांक
९)परीक्षा केंद्र
१०)जन्म दिनांक
११)एसएससी प्रमाणपत्र प्रमाणे नाव
१२)विवाहित आहात का
१३)वडिलांचे नाव
१४)आईचे नाव
१५)पती किंवा पत्नीचे नाव
१६)पूर्ण पत्ता पिनकोडसह
१७)मोबाईल क्रमांक
१८)ई-मेल आयडी
१९)शैक्षणिक माहिती
(अर्हता. विद्यापीठ.  उत्तीर्ण दिनांक. टक्केवारी.  श्रेणी)
१)एस एस सी
२)एच एस सी
३)डी एड
४)पदवी
५)पदव्युत्तर पदवी
६)बीएड
७)इतर
२०)आपण प्राथमिक पदवीधर शिक्षक आहात का ?
२१)आपण प्राथमिक शिक्षक आहात का ?
२२)सध्याच्या जिल्ह्यातील सेवा १)सध्याची शाळा
२)जिल्हा
३)पद
४)रुजू दिनांक
२३)अवगत भाषा
२४)फोटो
२५)स्वाक्षरी (काळया पेनने करावी)
२६)डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
२७) खालील प्रमाणपत्र स्व हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करावी.
I (Name of candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.