शाळास्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
दि. 28 FEB 2026
प्रति.
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व
३. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी महानगरपालिका, सर्व
४. शिक्षण निरीक्षण दक्षिण, पश्चिम, उत्तर (बृहन्मुंबई)
विषयः - शाळास्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत.
संदर्भ:- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६-४-२०२५
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६-४-२०२५ नुसार शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करुन शाळास्तरावर पुढीलप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१. शाळा व्यवस्थापन समिती
२. सखी सावित्री समिती
३. महिला तक्रार निवारण समिती/ अंतर्गत तक्रार समिती
४. विदयार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती
शाळास्तरावरील उपरोक्त समिती अध्यक्षांची माहिती या कार्यालयामार्फत मागविण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त शाळा स्तरावरील समिती अध्यक्षांची नावे NIC मार्फत सरल पोर्टल अंतर्गत रकूल पोर्टलवर अदययावत करण्यात आलेली असून शाळांना शालेय समिती माहिती या मेनुअंतर्गत जिल्हा, तालुका निवडल्या नंतर शाळांची नावे दिसतील, त्यांनी शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर अपलोड केलेली यादी दिसेल. यादीत नावे योग्य असल्यास बदल करण्याची आवश्यकता नाही.
ज्या शाळांनी वरील माहिती सादर केलेली नाही त्यांना माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे. याच बरोबर शाळांना वरील माहितीत बदल करण्याची सुविधाही सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे.
तरी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना शाळास्तरावरील समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.
(शरद गोसावी)
शिक्षक संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य
२. मा. आयुक्त शिक्षण आयुक्त शिक्षण कार्यालय महाराष्ट्र राज्य, पुणे
लिंक
https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.




0 Comments