जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विशेष संवर्ग भाग तीन साठी शासन आदेशानुसार प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण व स्पष्टीकरण..

 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विशेष संवर्ग भाग तीन साठी शासन आदेशानुसार प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण व स्पष्टीकरण.. 


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हा अंतर्गत बदली साठी दिनांक 7 एप्रिल 20021 रोजी शासन निर्णय निर्गमित करून नवीन धोरण जाहीर केले आहे त्यानुसार.. 

अअवघड क्षेत्रात सलग तीन वर्ष काम केलेल्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त विशेष संवर्ग तीन मध्ये स्थान दिले आहे.

पाहूया शासन आदेशातील प्रत्येक मुद्द्यानुसार सविस्तर माहिती व स्पष्टीकरण.

4.4.1 टप्पा क्रमांक ३ प्रमाणे संवर्ग २ च्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल, व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 3 दिवसांचा अवधी देण्यात येईल, नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.


4.4.2 यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची तीन वर्षांची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झालेली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र २ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.


4.4.3 सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.


4.4.4 सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली अनुज्ञेय राहील.


4.4.5 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या या बदलीपात्र शिक्षकांचा जागेवर त्यांच्या विनंती प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.


4.4.6 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.


बदली अधिकार पात्र शिक्षक (संवर्ग ३ ) बदली प्रक्रिया शंका समाधान


संवर्ग 3 च्या शिक्षकांच्या मनात असलेले काही प्रश्न ...


1) मला बदली नको तरीही फाॅर्म भरावा लागेल काय?


स्पष्टीकरण 

जर तुम्हाला सध्याच्या अवघड क्षेत्र असणाऱ्या शाळेत 5 वर्ष व अवघड क्षेत्रात सलग 10 वर्षे झाले नसेल तर तुम्हाला फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. 


2) संवर्ग 3 आहे,बदली हवी आहे, माझी बदली होईल का?


स्पष्टीकरण

तुम्ही संवर्ग 3 - बदली अधिकार प्राप्त आहात त्यामुळे तुम्ही बदली फाॅर्म भरू शकता , शाळांचा पर्याय अचूक व अभ्यासपूर्ण भरल्यास बदली मिळेल.


 3) मी मागीतलेले गाव मिळाले नाही तर विस्थापित होईल का?


स्पष्टीकरण- 

तुम्ही संवर्ग 3 आहात त्यामुळे तुम्ही भरलेली गावे मिळाली नाही आणि आपण जर बदली पात्र असाल तर क्वचितच विस्थापित होऊ शकता. ( याबाबत अधिकचे मार्गदर्शन आवश्यक)



4) पूर्ण 30 गावे भरणे आवश्यक आहे का?


स्पष्टीकरण- 

पूर्ण 30 गावे भरण्याचे बंधन नाही तुमच्या आवडीची जेवढी गावे भरायची आहेत तेवढी सुद्धा टाकून फाॅर्म सबमीट करू शकता. पण आपण बदली पात्र यादीत असाल तर गावे विचारपूर्वक भरावीत.( याबाबत अधिकचे मार्गदर्शन आवश्यक)


5) शाळेत 3 वर्ष झाले नाही तर बदली मागता येईल का?


स्पष्टीकरण-

होय, जर आपली यापूर्वीची शाळा अवघड क्षेत्रातील असेल व आपली अवघड क्षेत्रातील सलग सेवा 3 वर्षे होत असेल तर आपण बदली मागू शकता. 

पण आपली अवघड क्षेत्रातील सलग सेवा ३ वर्षे होत नसेल तर आपणास बदली मागता येणार नाही. 



 6) बदली अधिकार पात्र शिक्षकांना (संवर्ग ३) पुन्हा अवघड क्षेत्रातील शाळा निवडता येतील काय?


स्पष्टीकरण-

 होय , बदली अधिकार पात्र शिक्षकांना जर पुन्हा अवघड क्षेत्रात सेवा द्यायची असल्यास त्यांना बदली अधिकार पात्र शिक्षकांनी भरलेल्या पसंती क्रमातील संभाव्य जागांवर, निव्वळ रिक्त जागांवर बदली मागता येईल.


7) बदली अधिकार पात्र शिक्षक नकार देऊ शकतात काय?


स्पष्टीकरण- 

बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये स्पष्ट सांगितले आहे की जर बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंती क्रम दिला नाही आणि हे शिक्षक बदली पात्र शिक्षक नसतील तर त्यांची बदली होणार नाही

म्हणजेच ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये ३ वर्षापासून ते १० वर्षेपर्यंत सेवा झालेली असेल त्यांनी ऑनलाइन पसंती क्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही.

परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांसंदर्भात येथे एक संभ्रमाचा मुद्दा आहे बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये कोठेही बदली पात्र शिक्षक असा उल्लेख केलेला नाही म्हणजेच बदली अधिकार पात्र शिक्षक हे बदली पात्र शिक्षक ठरू शकत नाही शेवटी निर्णय शासनाच्या अधीन.


 शिक्षकांकडून विचारले जाणारे प्रश्न व त्यांचे 7/4/2021 च्या जी आर नुसार स्पष्टीकरण... अधिक माहितीसाठी शासन निर्णय व परिपत्रके यांचा अभ्यास करावा.



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



               

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.