नवोदय, स्कॉलरशिप, एन एम एम एस चा अभ्यास करणाऱ्या वर्ग पाचवी व वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

नवोदय, स्कॉलरशिप, एन एम एम एस चा अभ्यास करणाऱ्या वर्ग पाचवी व वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 

ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION (AISSEE)-2023

अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा 2023
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात वर्ग सहावी व वर्ग नववी मध्ये भारतभरातील 33 सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी द्वारा प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

सध्या वर्ग पाचवी व वर्ग आठवीत शिकत असणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.

या सैनिकी शाळा इंग्रजी माध्यमांच्या निवासी सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शाळा आहेत. नॅशनल डिफेन्स अकॅडमी इंडियन नेवल अकॅडमी आणि इतर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये अधिकारी म्हणून जाण्यासाठी विद्यार्थी तयार करण्याचे काम हे सैनिकी विद्यालय करतात.

भारतीय सुरक्षा मंत्रालयाने 18 नवीन सैनिकी शाळा मंजूर केले आहेत ह्या नवीन मंजूर झालेल्या शाळांमध्ये देखील यावर्षी म्हणजेच शैक्षणिक सत्र 2023 24 मध्ये वर्ग सहावी साठी प्रवेश दिला जाणार आहे आणि तो देखील राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेमार्फत होणार आहे.

प्रवेश परीक्षेची तारीख - 
दिनांक 8 जानेवारी 2023 वार रविवार

परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल.
भारतातील एकूण 180 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाईल.
दिनांक 31 मार्च 2023 रोजी विद्यार्थी हा दहा ते बारा वर्षाचा पूर्ण असावा. मुलींसाठी देखील सहाव्या वर्गामध्ये सर्व सैनिकी शाळांमध्ये प्रवेश होणार आहे.

प्रवेश परीक्षा शुल्क

General/OBC(NCL)/Defence/Ex-servicemen-Rs 650/-

SC/ST-Rs 500/-

करण्याची शेवटची तारीख:-
30 नोव्हेंबर 2022

दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत प्रवेश परीक्षा फी आपण ऑनलाइन वेगवेगळ्या माध्यमातून भरू शकता.

प्रवेश परीक्षेचा अर्ज हा फक्त ऑनलाइन स्वरूपातच पुढील संकेतस्थळावर करायचा आहे.


परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप परीक्षा कोणत्या सेंटरवर देता येईल यासाठी आपण वरील वेबसाईटवरून अधिक ची माहिती मिळवू शकता.

किंवा सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा विषयी माहिती घेण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
 अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा विषय वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.