इयत्ता पाचवी ते दहावी अभ्यासक्रमात नवीन विषयाचा समावेश होणार...

 इयत्ता पाचवी ते दहावी अभ्यासक्रमात नवीन विषयाचा समावेश होणार... 


शालेय शिक्षण घेत असताना आपण इयत्ता पहिली ते दहावी मध्ये वेगवेगळे विषय शिकतो प्रत्येक विषयाचे वेगळे महत्त्व आहे, या विषयांमध्ये अजून एक विषय वाढणार आहे. पाहूया सविस्तर माहिती.. 


इयत्ता पाचवी ते दहावी साठी 'कला व संस्कृती' विषयाचा समावेश आता शालेय शिक्षणात करण्यात येणार आहे याबाबत संस्कृती कार्य संचालनालयाने पुढाकार घेतला आहे.

शालेय शिक्षणात कला व संस्कृती या विषयाचा समावेश करण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पुढाकार घेतला असून इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी कलेचा अभ्यासक्रम तयार करीत त्यासंबंधीचा प्रस्ताव संचालनालयाने संबंधित खात्याच्या मंत्र्यांसह विभागाकडे पाठविला आहे.
मुलांमध्ये बालवयापासूनच कलेचे संस्कार झाले तर त्यामधील सुप्त अविष्काराला संधी मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संगीत नृत्य नाट्य चित्र शिल्प वास्तू यासारख्या प्रायोगिक व दृश्य कलांचा आस्वाद आणि रसग्रहण करण्याची क्षमता वाढीस लागते परिणामी मुले सुसंस्कारित होतात असा एक मतप्रवाह कलाक्षेत्रातून व्यक्त होताना दिसतो मात्र शालेय शिक्षणातून जवळपास कला हा विषय हद्दपार झाला असून काही शाळांमध्ये कलेकडे पर्यायी विषय म्हणून पाहिले जाते शालेय जीवनात कला विषयाचा समावेश व्हावा यासाठी कैलासवासी पंडित शिवकुमार शर्मा ज्येष्ठ बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे कलावंत देखील पुढे सरसावले होते यासंबंधी त्यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावाही केला होता नव्या शैक्षणिक धोरणात तरी याची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.