बदली अपडेट - 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणारी पदे बदली प्रक्रियेसाठी ग्राह्य आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजीचा शासन आदेश

बदली अपडेट 

31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणारी पदे बदली प्रक्रियेसाठी ग्राह्य आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजीचा शासन आदेश.


आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

शासन निर्णय विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच त्याकरिता दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सेवानिवृत्त निधन अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे संभाव्य रिक्त पदे याबाबतची संपूर्ण तपशील ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर अद्यावत करण्याचे दिनांक 19 सप्टेंबर 2022 च्या पत्रानुसार कळविले होते.

आता दिनांक 21 ऑक्टोबर 2022 च्या पत्रांमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही माही जानेवारी 2023 पर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत सेवानिवृत्त/निधन/अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे अथवा रिक्त होणारी संभाव्य पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर अद्यावत करावा तसेच डिसेंबर 2022 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावी.

वरील प्रमाणे सुधारित निर्देश आजच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.






बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.