शाळांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद(MPSP), मुंबई चे निर्देश ०६/०७/२०२६ पुढील प्रमाणे.
क्र. मप्राशिप/बांधकाम/2026-27/2323
06 JUL 2026
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, सर्व जिल्हे.
विषयः शाळांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेणेबाबत.
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यात अतिवृष्टी होणार असल्याचे सुध्दा जाहीर केले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता (सशि) व कनिष्ठ अभियंता यांनी तात्काळ त्यांच्या अखत्यारित सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांसमवेत शाळेमधील इमारत/वर्ग खोल्यांचा आढावा घ्यावा. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे प्रथम प्राधान्याने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात यावी. शाळेच्या इमारती / वर्गखोल्या सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सदर इमारत परिसरात विद्यार्थ्यांना जाण्याची परवानगी देण्यात येवू नये. तसेच इमारत / वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे सूचना फलक लावण्यात यावे. धोकादायक असलेल्या इमारतीमुळे अप्रिय घटना घडल्यास संबंधीत कार्यकारी अभियंता (सशि), व कनिष्ठ अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे यासंदर्भात तात्काळ उपाय योजना करण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्वरीत आवश्यक कार्यवाही करावी.
यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.
(हेमंदकुमार सावंत)
मुख्य अभियंता (प्रकल्प)
मप्राशिप, मुंबई.
प्रत - कार्यकारी अभियंता (सशि), जिल्हा परिषद, सर्व यांनी तात्काळ संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्याशी समन्वय साधून शाळांच्या सुरक्षिततेबाबतचा आढावा घ्यावा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 टिप्पण्या