वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत SCERT नवीन आदेश १३/०५/२०२६

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 13 मे 2020 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२६/

दिनांक : ०८/०५/२०२६

प्रति,

1. मा. आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे,

2. मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक

3. मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, संचलनालय, पुणे,

4. मा. संचालक, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे,

5. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

6. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

7. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

8. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

9. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)

10. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम / दक्षिण/उत्तर)

11. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

विषय :- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत....

संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि. १७/०४/२०२६.

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि. ०७/०५/२०२६.

महोदय,

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की, संदर्भीय पत्रानुसार दिनांक २०/०४/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक २ अन्वये नावनोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक १२/०५/२०२६ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली होती.

यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्याना दिनांक १४/०५/२०२६ ते १६/०५/२०२६ या कालावधीमध्ये आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर (https://www.maa.ac.in/) प्रशिक्षणे मेनूअंतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण tab मध्ये link द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी, ही विनंती.


Digitally signed by

KAMALADEVI SHRIDHAR AWATE

Date: 13-05-2026 12:37:06 

डॉ. कमलादेवी आवटे

सहसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रतः- माहितीस्तव सविनय सादर

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई

2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या संचालकांनी दि १२/०५/२०२६ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रका नुसार पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२६/ 50 

दिनांक : १२/०५/२०२६

प्रति,

1. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, संचलनालय, पुणे,

2. संचालक, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे,

3. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

4. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

5. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

6. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

7. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)

8. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम / दक्षिण / उत्तर)

9. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

विषय :- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाबाबत....

संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि. १७/०४/२०२६. २. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि.०७/०५/२०२६.

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की, संदर्भीय पत्र क्र. १ नुसार दि. २० एप्रिल २०२६ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्र शिक्षकांची नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. संदर्भ क्र. २ अन्वये या नावनोंदणी प्रक्रियेसाठी दि. १२ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

दरवर्षी सदरील प्रशिक्षणाचे नियोजन माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र भारताची जनगणना २०२७चा पहिला टप्पा दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालवधीत नियोजित आहे. या राष्ट्रीय कार्यासाठी (घरगणना) बहुतांश शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे सदरील प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ मध्ये दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरु आहे.

माहे जून २०२६ ते माहे ऑक्टो. २०२६ या कालावधीत सेवेची १२/२४ वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त होणाऱ्या व पोर्टलवर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत पडताळणी सुरु आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना आपल्या स्तरावरून ही बाब निदर्शनास आणून द्यावी.


डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रतः - माहितीस्तव सविनय सादर

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई

2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१

3. मा. आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे,

4. मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक



वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य च्या संचालकांनी दिनांक 7 मे 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२६/प्रति,

दिनांक : ०५/०५/२०२६

1. मा. आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे,

2. मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक

3. मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, संचलनालय, पुणे,

4. मा. संचालक, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे,

5. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

6. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

7. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

8. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

9. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)

10. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम / दक्षिण / उत्तर)

11. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

विषयः- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१

२. या कार्यालयाचे दिनांक १६/०४/२०२६ चे पत्र

३. या कार्यालयाचे दिनांक २८/०४/२०२६ चे पत्र

४. शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे पत्र सशि/२०२६-२७/ओडी/दिनांक ०४.०५.२०२६

उपरोक्त संदर्भा क्र. २ व ३ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक ०४.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु होते.

संदर्भ क्रमांक ४ नुसार व इतर काही विभागांनी नावनोंदणीस मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली आहे. त्यानुसार दिनांक ०८.०५.२०२६ सकाळी ११.०० वाजेपासून ते दिनांक १२.०५.२०२६ सायंकाळी ०६.०० पर्यंत वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी दिनांक १२.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत करता येईल. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.

शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी डायरेक्ट लिंक!

https://portal.maa.ac.in/

Digitally signed by HEMANT VASEKAR

Date: 07-05-2026

डॉ. हेमतं वसेकर (भा.प्र.से.) 

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रतः- माहितीस्तव सविनय सादर

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई

2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१



वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य च्या संचालकांनी दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.. 

शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी डायरेक्ट लिंक!

https://portal.maa.ac.in/

जा.क्र. राशेसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२६/

दिनांक: २७/०४/२०२६

प्रति,

1. मा. आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे,

2. मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, संचलनालय, पुणे,

3. मा. संचालक, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे,

4. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

5. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

6. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

7. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

8. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)

9. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम / दक्षिण/उत्तर)

10. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

विषयः- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत

संदर्भ: - 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१

2. या कार्यालयाचे दिनांक १६/०४/२०२६ चे पत्र

3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांचे पत्र

उपरोक्त संदर्भा क्र. २ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक २०,०४,२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहणार होते. परंतु काही प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी त्यांच्याकडे आलेल्या शिक्षकाच्या मागणी नुसार पोर्टलवर नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी पोर्टल दिनांक ०४.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत सुरु करता येईल.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.

Digitally signed by

Hemant Sharachchandra Vasekar 

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत:- माहितीस्तव सविनय सादर

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई

2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१



शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी डायरेक्ट लिंक!

https://portal.maa.ac.in/

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी बाबत

 शाळेतील सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की,

ज्या शिक्षकांची सेवा 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झाली आहे, त्या शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजुरीसाठी शासनाने निश्चित केलेल्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

सदर प्रशिक्षणाबाबत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार (दिनांक 16/04/2026) संबंधित पात्र शिक्षकांनी तात्काळ खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:

🔹 ज्यांची 12 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे – त्यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.

🔹 ज्यांची 24 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे – त्यांनी निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.

👉 नोंदणी करताना सर्व शिक्षकांनी आपली माहिती (नाव, शाळा, ई-मेल, मोबाईल क्रमांक इ.) अचूक भरावी.

👉 OTP verification पूर्ण करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

👉 प्रशिक्षणासाठी शासनाने निर्धारित केलेले शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.

👉 चुकीची/अपूर्ण माहिती भरल्यास नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही.

📌 शासन निर्देशानुसार हे प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय संबंधित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार नाही.

 संपूर्ण परिपत्रक व सूचना पुढील प्रमाणे.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत स्वराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या संचालकांनी दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे. 


जा.क्र. राशेसंप्रपम/सेवापूर्व/व.नि.प्र./२०२६/

प्रति,

1 विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

2 उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

4. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

5 शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)

6. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम दक्षिण (उत्तर)

7. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

विषयः- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत

संदर्भ:- 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१

2. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक राप्रधो २०२५ / प्र.क्र. २६ / प्रशिक्षण दि ०९.०४.२०२५

उपरोक्त संदर्भ दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्न) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीचाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)

१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.

२) बरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

तथापि काही शिक्षक, मुख्याध्यापक हे दिनांक ०१.०५.२०२६ ते ३०.०४.२०२७ या कालावधीत १२ वर्षे २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत फक्त असे शिक्षक/ मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात.

४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.

६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

गट क्र. १- प्राथमिक गट (इ.१ली ते ४ थी, इ.१ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ.१ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)

गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)

गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)

गट क्र. ४. अध्यापक विद्यालय गट

मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.

७) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी.

८) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.

९) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ IID. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांकडे शालार्थ आयडी उपलब्ध आहे. त्यांनी तो आयडी वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणाध्यर्थ्यांनी जो आयडी वापरून नोंदणी केली आहे त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणाच्यर्थ्यांना पात्र केले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत केलेला कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही व प्रशिक्षण शुल्क परत केले जाणार नाही.

१०) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्म OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी, ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.

११) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (बरिष्ठ व निवड) वास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.

१२) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

१३) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.

१४) इंटरनेट बैंकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड/UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे, जेणे करून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुबार शुल्क परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

१५) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card. Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.

१६) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भराबी, प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थीना लागू राहतील याची नोंद घ्यावी,

१७) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल.

१८) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१९) नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय.डी.वर संपर्क करावा.

२०) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेत स्थळ पाहावे.

२१) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.

२२) पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोर्टल दररोज रात्री ११.०० ते ०१.०० या कालवधीत बंद राहील.

२३) संदर्भ क्रमांक एक व दोनच्या शासन निर्णयानुसार सदर प्रशिक्षण हे शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये.

२४) आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक, ४२२००२, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे मनपा, बृहन्मुंबई मनपा, नागपूर मनपा या विभागांचा API / offline data उपलब्ध न झाल्याने या विभागांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा,

अभिनव भोसले - विषय सहाय्यक संपर्क क्रमांक ८२०८८७९१५९ (कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ पर्यंत) तांत्रिक सहाय्य (Trifrnd Pvt. Ltd.) - संपर्क क्रमांक- ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळेत - सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ पर्यंत)

Digitally signed by Nandkumar Chaitram Bedse Date: 17-04-2026,11:40:10 

डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे



राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी च्या आदेशानुसार 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 पर्यंत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. 



परंतु तांत्रिक कारणास्तव वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दिनांक 21 एप्रिल पासून सुरू झाले त्यामुळे आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाईन नोंदणीसाठीची शेवटची मुदत वाढवून ती 2 मे 2025 पर्यंत केली आहे. 




दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी ज्या शिक्षकांना दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत वरिष्ठ वेतनश्रेणी साठी सेवेची बारा वर्षे पूर्ण झालेली आहे व निवड वेतनश्रेणीसाठी सेवेची 24 वर्षांपूर्वी झालेली आहे अशा शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुढील लिंक उपलब्ध करून दिली आहे.

https://training.maa.ac.in/

सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी शालार्थ सेवार्थ किंवा शिक्षकांचे इतर ज्या कोणत्या प्रणालीतून वेतन अदा केले जाते अशा प्रणाली शिक्षकांची माहिती अद्यावत करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निर्देश दिले होते.

नोंदणी सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या अडचणी सांगणारे मेसेज व कॉल येत आहेत म्हणून त्यावरील सर्व जणांसाठी उपाय.

ज्या शिक्षकांनी शालार्थ किंवा इतर वेतन देयक प्रणालीवर आपली माहिती जसे की स्वतःचा ई-मेल आयडी मोबाईल नंबर व देवनागरी लिपीतील म्हणजेच मराठीतील नाव अद्यावत केले आहे  अशा शिक्षकांना प्रशिक्षणासाठी नोंदणी करताना कोणतीही अडचणी येत नाही.

येणाऱ्या अडचणी व उपाय पुढील प्रमाणे.. 

1) शालार्थ आयडी टाईप केल्यानंतर तो invalid असल्याचा मेसेज येत असेल तर. 

शालार्थ आयडी पुन्हा एकदा तपासून पहा त्यातील सर्व अंक हे इंग्रजीत व सर्व अक्षर हे कॅपिटल लेटर आहेत की नाही याची खात्री करा.

टाईप करताना कीबोर्ड मराठीमध्ये तर टाईप करत नाही ना हे देखील पहा.

1)शालार्थ आयडी किंवा सेवार्थ आयडी टाईप केल्यानंतर सबमिट केल्यानंतर सेवेची बारा किंवा 24 वर्ष पूर्ण झालेली नसल्यामुळे आपल्याला नोंदणी करता येणार नाही.


अशी अडचण येत असेल तर आपण शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर आपली रुजू दिनांक तपासून घ्यावी गरज असल्यास त्यामध्ये मुख्याध्यापक लॉगिन मधून दुरुस्ती करावी व अधिकारी लॉगिन मधून त्याला अप्रू करावे.

2) पोर्टल लिंक ओपन केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी निवडल्यानंतर शालार्थ किंवा सेवा निवडल्यानंतर जेव्हा स्टाफ आयडी म्हणजेच शालार्थ किंवा सेवार्थ आयडी टाईप केल्यानंतर व एंटर वर क्लिक केल्यानंतर.

कृपया आपले नाव देवनागरी मध्ये शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करावे.

असा मेसेज दिसत असेल तर. . 


शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन मधून आपले देवनागरीतील म्हणजेच मराठीमधील नाव दुरुस्त किंवा अपडेट करून घ्यावे. सदर माहिती एप्रूव्हलसाठी पुढील लॉगीनला पाठवून एप्रिल करून घ्यावी.

अनेक शिक्षक बंधूंना वरील अडचणी येत आहे. कारण अपडेट करताना ईमेल आयडी व मोबाईल नंबर अपडेट करण्यावर भर देण्यात आला होता.


3) ईमेल आयडी वर ओटीपी येत नाही  पुढील प्रमाणे मेसेज दिसतो.


आपला ई-मेल आयडी शालार्थ सेवार्थ पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन मधून दुरुस्त करून घ्यावा त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अॅप्रोव्हल घ्यावे.

4)मोबाईल नंबर वर ओटीपी येत नाही पुढील प्रमाणे मेसेज दिसतो.


शालार्थ सेवार्थ किंवा इतर वेतन प्रणालीवर आपला मोबाईल नंबर मुख्याध्यापक लॉगिन मधून चेक करून घ्यावा तो अपडेट करून घ्यावा व वरिष्ठ स्तरावर साठी पाठवून अप्रू करून घ्यावा.

वरील अडचणी या शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर शिक्षकांची माहिती अपडेट नसल्यामुळे येत आहेत.

5) संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन पेमेंटही झाले तरी नोंदणी पूर्ण झाल्याचे दिसत नाही 

असे होत असल्यास कृपया पुन्हा पेमेंट करू नये थोडा वेळ थांबून पुन्हा लॉगिन करून पहावे तरी देखील नोंदणी पूर्ण झाली नाही तर किंवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी संपर्क करावा.

या व्यतिरिक्त इतर कुठली अडचण उद्भवत असल्यास कृपया व्हाट्सअप मेसेज करावा व्हाट्सअप वरून कॉल करू नये! 


6) प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी मुदत कधीपर्यंत असेल? 

वरिष्ठ वेतनशनी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी बाबत परिपत्रकात दिनांक 15 एप्रिल 2025 पासून 24 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती.

परंतु प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी ही 21 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदत ही जवळपास पंधरा दिवस असेल असा फक्त अंदाज आहे! 

सध्यातरी परिपत्रकानुसार दिनांक 24 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.



 शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे बाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

शिक्षकांच्या वरिष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षणाकरीता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे. तथापि, शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की, मोबाईल नं., ई-मेल आयडी, शाळेचे नाव, पत्ता, इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदविलेल्या नाहीत. करीता आपणांस सूचित करण्यात येते की, आपले जिल्हयातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक ३१/०३/२०२५ रोजीपर्यंत अद्ययावत (Update) करणेबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. तसेच सदरील नोंदी शाळास्तरावरुन अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक, वेतन व भनिनि पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य (Approve) कराव्यात.

करीता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे.

(मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.)


(दिपक चवणे) 

शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन) 

शिक्षण संचालनालय, म.रा.. पुणे १.

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१) मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी-

विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.


वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणांतर्गत शालार्थमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणेबाबत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून दि.११/०३/२०२५ रोजी शालार्थ API प्राप्त झालेला आहे. या डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती (उदा. मराठीतून नाव, Email ID) अपूर्ण असल्याचे निर्देशास आले आहे. तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर, शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही माहिती शालार्थमध्ये update होणे गरजेचे आहे.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त आहे. अशा शिक्षकांची शालार्थ मधील माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास ती update करणेबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.

राहूल रेखावार 

 संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे





राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणि दिनांक 15 मार्च 2025 रोजी माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य केलेल्या विनंतीनुसार वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत पुढील प्रमाणे माहिती मागविली आहे.

शासन निर्णयान्वये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत नियोजन सुरू आहे,

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात येत आहे. सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विहित नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली API सेवापूर्व विभागाच्या preserviceedudept@maa.ac.in या email Id वर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. ही विनंती


आपला विश्वासू,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या कार्यालयातून दिनांक 3 मे 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांना वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे . 


संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. शिप्रधर्धा २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२३/१०/२०१७.

२) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२०/०७/२०२१.

३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचे दि.२१/०२/२०२४ चे निवेदन

४) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगांव यांचे पत्र क्र.जिशिप्रसं/जळगाव/ च.नि.श्रेणी प्र./२०२३-२४/६६,दि.२३/०२/२०२४.

५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) धुळे यांचे पत्र क्र. जिशिवप्रसंधु/ववेनिश्रेप/२०८. दि.२३/०२/२०२४.

६) विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांचे पत्र क्र.जा.क्र.जिशिपसं/अम/ ववेश्रेवनिश्रे प्रशिक्षण/१५३/२४, दि.०१/०३/२०२४.


उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.१ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जवाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सांर्पावण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घडयाळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करण आवश्यक करण्यात आले. यापूर्वी कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचेकडून तसंच संदर्भ पत्र क्र. ४ ते ६ अन्वये करष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाथीचे परस्यगमधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसंच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शर्भाणक सवत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचं आयोजन सन २०२८-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. यार्कारता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक/तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत preservicedept@maa ac in या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतोल र्वारष्ठ अधिव्याख्याता/आंधव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्हयातील इतर २ तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावश असावा.


(डॉ. माधुरी सावरकर)

उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण)

राज्य शैक्षणिक संशाधन व शिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे



वरील परिपत्रकानुसार आता वरिष्ठ वेतन श्रेणी पण निवड श्रेणी प्रशिक्षण हे ऑफलाइन पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज भासणार नाही व ऑनलाईन मोबाईलवर देखील प्रशिक्षण करण्याची गरज नाही.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.