जिल्हा अंतर्गत बदली महत्त्वपूर्ण अपडेट - जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह सुधारित विश्लेषण.

 जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह सुधारित विश्लेषण.


 ही पोस्ट बदली शासन आदेश 7 एप्रिल 2021 , बदली वेळापत्रक 21 ऑक्टोंबर 2022 , Vensys कंपनीने दिलेली उत्तरे व VC 31 ऑक्टोंबर 2022 यांचे आधारे तयार केलेली आहे


✳️ जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले असून.सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. 5 नोव्हेंबर पासून शिक्षकांकरिता लॉगिन सुरू होईल


➡️ आपला मोबाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे


https://ott.mahardd.in/

✳️ विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022


➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा

जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल➡️ व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल


➡️ तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल➡️ व ज्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल➡️ दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा अन्यथा आपण आहे त्या ठिकाणी सोयीने असल्यास व आपण बदली पात्र नसल्यास कोणताही तपशील नोंदवण्याची गरज नाही परंतु तशी सोय पोर्टलवर असल्यास शहानिशा करावी


➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग 10 वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंतीक्रम न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नकार देण्याची सुविधा असल्यास नकार नोंदवावा✳️ विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील प्रमाणे होकार दर्शविल्यास वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवावा


➡️ या शिक्षकांना आपल्या पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील


➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही


➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना व्याख्येमधील नमूद केलेल्या क्रमवारीनुसार प्राधान्यक्रम राहील➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्याच जागा मागता येतील

शासन निर्णय व VC नुसार✳️ विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)


➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा


➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांची बदली होणार नाही त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील

Vensys मार्गदर्शनानुसार


➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना त्यांच्या व्याख्येमधील क्रमवारीनुसार प्राधान्यक्रम लागू राहील


➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी


➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग 10 वर्षापेक्षा कमी असेल व दोघेही बदली पात्र नसतील व बदली नको असल्यास नकार देण्याची गरज नाही कोणताही तपशील न नोंदवणे म्हणजेच नकार समजल्या जातो तरीसुद्धा पोर्टलवर जाऊन शहानिशा करावी


➡️ विशेष संवर्ग भाग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येतील


✳️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा


➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास व ते शिक्षक बदली पात्र शिक्षक नसल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही


➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास त्यांना बदली हवी असल्यास त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील आणि बदली नको असल्यास आपला नकार ऑनलाईन नोंदवावा लागेल

GR नूसार व Vensys कंपनीच्या मार्गदर्शनावरून


➡️ अन्यथा या शिक्षकांची बदली पात्र शिक्षक समजून रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा पसंतीक्रम देऊ शकतात


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या बदल्यांसाठी पात्र धरावयाच्या सेवाजेष्ठतीने करण्यात येतील


➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील.


✳️ बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)


➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व शाळेवर सलग 5 वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे


➡️ बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील


➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल


➡️ बदली पात्र शिक्षकांना निवळ रिक्त, बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या रिक्त व बदली पात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील


✳️ विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि.22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)


➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल


➡️ या शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या बदली टप्पा संपल्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित रिक्त जागा (सामानीकरणाच्या रिक्त जागा सोडून) दाखवल्या जातील


➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पहिल्यांदाच शाळांचा पसंतीक्रम देताना संवर्गनिहाय यादीतील प्राधान्यक्रमाचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत


✳️ अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)


➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा


➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल


➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल


➡️ या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील समाणीकरणाच्या रिक्त ठेवायच्या जागा सोडून सर्वच अवघड क्षेत्रातील रिक्त जागा दाखवल्या जातील


✳️ बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)


➡️ बदलीचे आदेश बदली प्रक्रियेनंतर द्यावेत की नाहीत याबद्दल अद्याप कोणताही निर्णय शासन स्तरावरून झालेला नाही


➡️ बदली प्रक्रिया ही वेळापत्रकानुसार वेळेतच पूर्ण केली जाईलबदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏 Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.