SHVR Competition 2025-26 Form link - स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ मध्ये सर्व व्यवस्थापन शाळा सहभाग घेणे लिंक MPSP सूचना

शाळांमध्ये स्वच्छता, हिरवळ आणि सर्व समावेशक आनंददायक शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकनासाठी (SHVR) Swachh Evam Harit Vidyalaya Rating २०२५-२६ मध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग घेणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या संचालकांनी दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्याधिकारी नगरपालिका नगरपरिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


आपणांस कळविताना खूप आनंद होत आहे की स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP- २०२० च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) २०२५ येथे मा. केंद्रीय शिक्षणमंत्री यांचेव्दारे उद्घाटन करण्यात आलेले आहे. स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ हा उपक्रम पूर्वीच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार (SVP) च्या धर्तीवर व्यापक व सार्वत्रिकपणे सर्व शाळांमध्ये राबविण्यासाठी नव्याने विस्तार करण्यात आलेला आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना ६ घटकांवर आधारित ६० सूचक प्रश्नावल्यांवर निर्देशकानुसार व्यापक सर्वेक्षणाच्या आधारे शाळेच्या प्रगतीबाबत स्वयंमूल्यांकनाव्दारे शाळांना माहिती होईल आणि त्या प्रगतीच्या टप्प्यानुसार नियमित सुधार व शाश्वत विकास निरंतर सुरू राहील. स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ चे रचनात्मक मापदंड हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-२०२० च्या दृष्टीक्षेपात आणि भारताच्या दृष्टीकोनानुसार स्वच्छता, हिरवळ आणि सर्व समावेशक शालेय वातावरण इत्यादिशी सुसंगत आहे. सदर उपक्रम संरचनात्मक संस्थात्मक चौकटीद्वारे शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदलाबाबतची लवचिकता इत्यादि बाबींवर उत्सफुर्तपणे अंमल करण्यास प्रोत्साहीत करतात.

२ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ बाबत भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाव्दारे शाळांमध्ये स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरण संरक्षण इत्यादि महत्त्वपूर्ण बाबींची सुलभ कार्यपध्दतीव्दारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-२०२० च्या दृष्टीक्षेपात घनिष्ठ स्वरूपात संबंधित आहे. ज्यामध्ये समग्र, समावेशीत आणि अनुभव आधारित शिक्षणाला प्रोत्साहीत करते. तसेच स्वास्थ्य, स्वच्छता आणि निरंतर शैक्षणिक प्रणाली एकीकृत करण्यास मदत करते.

३ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVFR) २०२५-२६ च्या सुलभ अंमलबजावणीसाठी SHVR पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे. परिणामी शाळांना डिजिटल कार्यपध्दतीव्दारे सुलभपणे सहभागी होता येईल, स्वयंमूल्यांकन आणि सनियंत्रण करण्यास मदत होईल अशा पध्दतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

४ सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा सहभाग अनिवार्यः स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ करिता देशातील सर्व शाळांनी सहभागी होणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय, खाजगी अनुदानित, खाजगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या (केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेव्दारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना सहभागी व्हावयाचे आहे.

५ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVA) २०२५-२६ साठी ६ प्रमुख घटकांवर मूल्यांकन करण्याकरिता ६० प्रश्नः स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ करिता पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या सहा प्रमुख विषयांवर आधारित बार्वीचे ६० प्रश्नांव्दारे स्वयं-मूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करावयाचे आहे.


७ जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय इत्यादि स्तरावर शाळांची निवडः-

१. शाळांचा सवर्ग (प्रकार) पूर्व प्राथमिक ते इ. ८ वी पर्यंत

२. शाळांचा सवर्ग (प्रकार ॥)-

माध्यमिक ते उच्च माध्यमिक (इ.९ वी ते १२ वी) 


८ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६-अंमलबजावणी वेळापत्रक:-


९ शाळा, जिल्हा व राज्य स्तरावरील भागधारक घटक व त्यांची भूमिका:-

९.१ शाळा स्तरावरील भागधारक घटक व त्यांची भूमिकाः मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, इको क्लब आणि बाल संसद, शाळा व्यवस्थापन समिती (SMC), शाळा विकास व्यवस्थापन समिती (SDMC), पंचायत/शहरी स्थानिक संस्था आणि समुदाय इत्यादि घटकांचा समावेश आहे. यांची भूमिका स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVF) २०२५-२६ बाबत जाणीव-जागृती करणे, सहभागी होण्याची कार्यपध्दती जाणून घेणे, प्रश्न समजून घेणे, अचूकपणाची खात्री करून घेणे, फोटो आणि वस्तूःस्थितीदर्शक माहिती उपलब्ध ठेवणे, वेळेत अर्ज सादर करणे, वस्तूःस्थिती नियोजन नियमित प्रगती आणि शाश्वत विकास टिकवून ठेवणे. उपरोक्त अंमलबजावणी दि.१/०८/२०२५ ते दि.३०/०९/२०२५ या कालावधीत शाळांनी ऑनलाईन अर्ज करणे,

९.२ जिल्हा स्तरावरील भागधारक घटकांची भूमिकाः जिल्हास्तरीय समिती, अध्यक्ष, जिल्हाधिकारी किवा यांचे व्दारे (नियुक्त अधिकारी) आणि इतर सदस्य हे जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांमधून शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), तीन उत्कृष्ट शिक्षक, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग आणि सिव्हील सोसायटी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांमधून जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले दोन प्रतिनिधी, जिल्हा नोडल अधिकारी आणि मूल्यांकन कर्ते इत्यादिचा सहभाग राहील, यांची भूमिका स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVA) २०२५-२६ च्या अंमलबजावणीबाबत समन्वयन करणे, जिल्हास्तरीय समितीच्या बैठका, SHVR उद्देश व कार्यपध्दतीबाबत तालुका, केंद्र आणि शाळा यांचे सक्षमीकरण करणे, उपक्रमांना प्रोत्साहीत करणे, नियमित आढावा घेऊन १००% शाळांना सहभागी करून घेणे, नोंदविलेल्या प्रांच्या उत्तरांचे मूल्यांकन करणे, मूल्यांकन कर्ते निवडणे, उद्बोधन आणि वेळेत प्रत्यक्ष पडताळणी करणे, कमिटीव्दारे शाळांची निवड अंतिम करणे, पात्र शाळांचे राज्य स्तरावर नामांकन करणे, शाळांची निवड करणेचा कालावधी दि.१/१०/२०२५ ते दि.३१/१०/२०२५ आहे. तसेच शाळांचे राज्य स्तरासाठी नामांकन करावयाचा दि.०७/११/२०२५ आहे.

९.३ जिल्हा स्तरावरील मूल्याकंन कर्त्यांची भूमिकाः जिल्हा स्तरीय मूल्यांकन कर्ते निवडीसाठी पुढीलप्रमाणे विभाग सूचविण्यात आलेले आहेत.

शासकीय अधिकारी (सार्वजनिक आरोग्य शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण विभाग, वन विभाग.

प्रशिक्षण संस्था आणि शैक्षणिक प्रशिक्षणार्थी मुख्य योजनेतंर्गत तज्ज्ञ जसे, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण/शहरी, मनेरेगा) इत्यादि शैक्षणिक आणि संशोधन संस्था सिव्हील सोसायटी संघटना, स्वयंसेवी संस्था, समुदाय आधारित संस्था/युवक मंडळे लोकप्रतिनिधी 

१० राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) आणि शालेय शिक्षा आणि साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या समन्वयाने दि.१३/०८/२०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVIR) २०२५-२६ बाबत राज्य स्तरीय कार्यशाळेत प्रशिक्षण समन्वयक म्हणून प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, अधिव्याख्याता किंवा वरिष्ठ अधिव्याख्याता आणि नोडल अधिकारी म्हणून, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्वे आणि जिल्हा नोडल अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची नियुक्ती करून त्यांना स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVFR) २०२५-२६ बाबत राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या समन्वयाने दि.२०/०८/२०२५ रोजी आयोजित कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

११ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ अंतर्गत उपरोक्त उपक्रमांची क्षेत्रीय यंत्रणेव्दारे व शाळांव्दारे यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी स्थानिक स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी (अधिव्याख्याता किंवा वरिष्ठ अधिव्याख्याता), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, जिल्हा नोडल अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी SHVR फ्रेमवर्क नुसार प्रत्येक टप्प्यांवरचे नियोजन, संबधित तालुका नोडल अधिकारी, केंद्रस्तरीय नोडल अधिकारी आणि शाळा स्तरावरील भागधारक घटकांची भूमिका आणि जबाबदारीबाबत संकल्पना स्पष्ट होणेसाठी उद्बोधन प्रशिक्षण कार्यशाळाव्दारे क्षमता सक्षमीकरण करावे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन ब प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संदर्भिय पत्र क्र., ३. दि.१९/०८/२०२५ रोजीच्या पत्रान्वये आपणांस प्रशिक्षण घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याप्रमाणे कालमर्यादेत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी.

१२ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ साठी अनिवार्यपणे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी दि.०४/०८/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधी दरम्यान मोबाईल अॅप किंवा वेब पोर्टलव्दारे आपल्या सोयीनुसार सहभागी व्हावे, स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ वेबसाइट https://shvr.education.gov.in मध्ये Android आणि IOS मोबाइल अॅप्स डाउनलोड करण्यासाठी QR कोड देखील प्रदान केले आहेत. वेब पोर्टलव्दारे सहभागी होणाऱ्या शाळा होमपेजवर उपलब्ध असलेल्या लॉगिन /साइनअप पर्यायाचा उपयोग करू शकतात. याबाबत सुलभ संदर्भासाठी https://shvr.education.gov.in/resources या लिंकवर SHVR मार्गदर्शक हस्तपुस्तिका (इंग्रजी व मराठी), वेब पोर्टलवर शाळांनी माहीती भरण्यासाठी मार्गदर्शक मॅन्यूअल (हिंदी व इंग्रजी) आणि अॅपवरून शाळांनी माहीती भरण्यासाठी मार्गदर्शक मॅन्यूअल (हिंदी व इंग्रजी) मध्ये उपलब्ध आहे. तसेच व्हिडीओज आणि PPT's उपलब्ध असून त्यावरून सदर सामग्री डाऊनलोड करून घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल असे पाहावे, सदर साहीत्य आपणांस यापूर्वीही पाठविण्यात आलेले आहेत. सदर उपक्रम केंद्रशासनाचा महत्त्वकांक्षी व कालमर्यादित उपक्रम आहे. त्यानुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी दि.३०/०९/२०२५ पूर्वी ऑनलाईन अॅप्लीकेशन सादर (सबमिट) करणे बंधनकारक आहे. त्यानंतर जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील छाननी करून अंतिम क्रमांक काढण्यात येणार आहे, त्यानुषंगाने विहित कालमर्यादेत अंमलबजावणी करण्यात यावी.

१३ देशातील सुमारे २४.८० कोटी विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या १४,७५ लाख शाळांसाठी वॉश आणि मिशन लाईफ डेटाबेस तयार करण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ महत्त्वपूर्ण ठरेल. हे पोर्टल शाश्वत पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित निर्देशकांशी संबंधित माहिती संकलित करेल. ही एक सार्वत्रिक माहिती असेल ती इतर विभाग आणि मंत्रालयीन विभागांच्या विविध विश्लेषणासाठी एक उपलब्ध माहितीचा स्रोत म्हणून उपयोग करेल. या माहितीच्या आधारे विविध निर्देशकांवर जिल्हा/राज्य अहवाल कार्ड तयार केले जातील तर त्याच डॅशबोर्डवर जिल्ह्यांचे अहवाल कार्ड प्राप्त होतील.

१४ अपेक्षित फलनिष्पत्तीः

स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ साठी सर्व जिल्हा आणि महानगरपालिकांनी १००% शाळांचा सहभाग सुनिश्चित करणे.

सुलभ समन्वयांसाठी समन्वय यंत्रणा स्थापन करणे, सदर यंत्रणेव्दारे विहीत वेळेत नियोजन, प्रशिक्षण आणि मूल्यांकन करणे.

प्रत्येक स्तरावर क्षमता बांधणी करून विकेंद्रित नियोजनाला प्रोत्साहन देणे.

शालेय स्वच्छता आणि हरित शाळा करण्यासाठी नवोपक्रमांना प्रोत्साहीत करून स्वःची जाणीव करून शाश्वत विकासास प्रोत्साहन देणे,

समस्यानिवारण आणि मार्गदर्शनासाठी सक्रिय सहभाग घेणे. 

१५ शालेय नेतृत्व प्रमुखांसाठी विशेष प्रोत्साहनः

संयुक्त शाळा अनुदानातंर्गत रू.१ लाख राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापकांच्या शाळांना स्वच्छता आणि हरित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी रू.१ लाखाचे प्रोत्साहन संयुक्त अनुदान म्हणून दिले जाईल.

तीन दिवसीय शैक्षणिक अनुभवात्मक कृति कार्यबाबत सहल निवडलेल्या शाळा प्रमुखांना आपल्या देशातील प्रमुख संस्थांना तीन दिवसांचा शैक्षणिक अनुभवात्मक भेट दिली जाईल. शाश्वतत्ता, विज्ञान आणि पर्यावरणीय शिक्षणात नाविन्यपूर्ण नेतृत्त्वाला प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश असेल.

१६ इको-क्लब आणि प्रमुख मोहिमाः

शाळांना पुढील गोष्टी करण्यास प्रोत्साहित करण्यात येईल.

इको क्लबचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी सक्षमीकरण करणे.

पुढील उपक्रमांचे नेतृत्व करणेः) "एक पेड माँ के नाम माता आणि पृथ्वी मातेला समर्पित राष्ट्रव्यापी वृक्षारोपण मोहीमबाबत आपण अधिक माहिती या लिंकवरून जाणून घेऊ शकता:  https://usof.gov.in/en/ek-ped-maa-ke-naamNCERT या संकल्पनेवर एक विशेष मॉड्यूल देखील विकसित केलेले आहे. याचे मोडयुल्स आपणांस पाठविण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी आपण https://ncert.nic.in/specialmodules.php?ln=en या लिंकवर पाहावे.

मिशन लाईफ मोहिमा: ऊर्जा बचत, प्लास्टिकमुक्त कैम्पस, जलसंवर्धन इ.

१७ सुलभ मार्गदर्शनासाठी संपर्क करणे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश SHVR सैल, CIET-NCERT शी संपर्क साधू शकतात 

shvr support@ciet.nic.in

टोल फ्री क्रमांक - ८८००-४४०-५५९

१८ त्यानुषंगाने जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणि तालुका व केंद्र स्तरावर स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन SHVR २०२५-२६ बाबत जाणीव जागृतीसाठी व्यापक प्रसार आणि प्रचार करणे आणि १००% शाळा सहभागी होतील याची खात्री करणे,

१९ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ मध्ये सर्व शाळांना उत्सर्युतपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे. परिणामी शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्वसमावेश आनंददायक शालेय वातावरण नियमित टिकवून ठेवण्यास शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्याच्या दिशेने मार्गक्रमण होईल. 

(संजय यादव, भा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.