GPF Update - शासनाचा नवीन नियम एवढीच रक्कम गुंतवूशकता जीपीएफ मध्ये!

GPF Update - शासनाचा नवीन नियम एवढीच रक्कम गुंतवूशकता जीपीएफ मध्ये! 


जीपीएफ म्हणजेच जनरल/गव्हर्मेंट प्रॉव्हिडंट फंड हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक गुंतवणुकीचा पर्याय आहे. शासकीय कर्मचारी पगाराच्या दहा टक्के अथवा जास्त रक्कम सदर फंडात गुंतवतो व त्यावर विशिष्ट व्याज त्याला दिले जाते. सदर गुंतवणुकीला आयकरातून सूट असते त्यामुळे ही गुंतवणूक महत्त्वाची मानली जाते. यावरील व्याजदर दरवर्षी निश्चित केला जातो. आतापर्यंत जीपीएफ मध्ये जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवली जावी याबद्दल कोणताही नियम नव्हता. परंतु केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार आता जीपीएफ मध्ये पाच लाखापेक्षा जास्त रक्कम गुंतवता येणार नाही.


या अगोदर महाराष्ट्र शासनाने जीपीएफ संदर्भात नियम करू जो व्याजदर केंद्र शासन जीपीएफ वर देईल तोच व्याजदर महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफ ला लागू असेल असा नियम केला आहे.

याच पद्धतीने महाराष्ट्र शासन देखील केंद्र शासनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शासकीय अथवा सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जीपीएफ गुंतवणुकीची मर्यादा पाच लाख एवढी करू शकते.
 हल्लीच्या काळात गुंतवणुकीस विविध पर्याय उपलब्ध असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शिवाय इतर देखील काही पर्यायांचा वापर गुंतवणूकदार करताना आढळून येतात. काही गुंतवणुकीचे पर्याय हे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असते याअंतर्गत जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हीडंट फंडचा समावेश होतो. जीपीएफ मध्ये केवळ सरकारी कर्मचारी गुंतवणूक करू शकतात ज्यामध्ये सरकारतर्फे कुठलाच आर्थिक वाटा दिल्या जात नाही, मात्र गुंतवणूक केलेल्या रकमेवर सरकार गुंतवणूकदाराला व्याज देते.


नव्याने सरकारने जीपीएफ नियमात बदल करण्याचा नुकताच निर्णय घेतला असून यामुळे वार्षिक ५ लाखांपर्यंतच जीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय राहणार आहे, यापेक्षा अधिक रक्कम गुंतवणुकीवर सरकारने मज्जाव घातला आहे. सध्याच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या तुलनेत कमान ६ टक्के इतकी रक्कम जीपीएफ खात्यात वर्ग करावी लागते ज्याचा परतावा त्यांना निवृत्तीनंतर देण्यात येतो.


नवीन नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी यावर्षी ५ लाखांहून अधिक रकमेची जीपीएफ खात्यात गुंतवणूक केली असेल त्यांचा पगार जीपीएफ खात्यात देणे बंद होणार आहे. कारण वार्षिक ५ लाखांची मर्यादा लावली असल्याने या नवीन बदलांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. एकंदरीतच नव्याने सरकारकडून करण्यात आलेल्या या नवीन बदलांची माहिती सरकारी कर्मचाऱ्यांना जाणून घेणे आवश्यक राहणार आहे.बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.