शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा दिलेल्या प्रकरणी सेवापुस्तकात घेण्यात येणा-या नोंदीबाबत आदेश

 शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा दिलेल्या प्रकरणी सेवापुस्तकात घेण्यात येणा-या नोंदीबाबत शिक्षण आयुक्तालयांने दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

क्र.आस्था-अ-१०३/शिस्तभंगविषयक कार्यवाही/२०२६/

दिनांक: स्वाक्षरीखाली नमूद आहे

प्रति.

१. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

२. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ, पुणे

३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे

४. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सर्व

५. मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे-१

६. मा. शिक्षण संचालक, (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे-१

७. मा. शिक्षण संचालक, (योजना) संचालनालय, म.रा., पुणे-१

८. विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ, सर्व विभाग

९. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

१०. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), सर्व

११. अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक/माध्यमिक), सर्व

विषय : शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा दिलेल्या प्रकरणी सेवापुस्तकात घेण्यात येणा-या नोंदीबाबत.

उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की, शालेय शिक्षण विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचेविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये प्रकरणपरत्वे निलंबन/वेतनवाढ रोखणे/ठपका ठेवणे इ. विविध शिक्षा आदेशित करण्यात येतात. शिक्षा दिलेल्या प्रकरणी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तकात तशी नोंद घेऊन त्याबाबतचा अहवाल (सेवापुस्तकातील नोंदीच्या छायाप्रतीसह) शासन/शिक्षण आयुक्तालयास/नियुक्ती प्राधिका-यास विहीत वेळेत सादर करणे आवश्यक असते. तथापि काही प्रकरणी शासन आदेश/शिक्षा आदेश यांची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत होत नसल्याचे व त्यानुसार आवश्यक नोंदी सेवापुस्तकात वेळीच घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यानुसार सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा आदेशित केलेल्या प्रकरणी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तकात तशी नोंद घेऊन त्याबाबतचा अहवाल (सेवापुस्तकातील नोंदीच्या छायाप्रतीसह) शासन/शिक्षण आयुक्तालय/नियुक्ती प्राधिका-यास वेळोवेळी विहीत वेळेत सादर करण्याची दक्षता घ्यावी.


Digitally signed by Harun Ismail Atar Date: 29-09-2026 17:10)

शिक्षण सहसंचालक 

(प्रशासन, अंदाज व नियोजन) 

शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१

प्रत - मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सादर.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.