पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी TAIT-2025 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र (Self Certification) करण्याची सुविधा दिनांक १५/१२/२०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.
पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी TAIT-2025 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र (Self Certification) करण्यासाठी लिंक.
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/ शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणेसाठीच्या सूचना (TAIT-२०२५)
(दि. १५/१२/२०२५)
अ) सर्वसाधारण माहिती व सूचना :
१ महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तसेच महाराट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये "पवित्र" या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी शासनामार्फत "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
२ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ दिनांक २७ मे २०२५ ते ३० मे २०२५ व ०२ जून २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीसाठी २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
३ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी एकूण २०० गुणांची होती, त्यापैकी १२० प्रश्न अभियोग्यता व ८० प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर होते, प्रत्येक प्रश्नास १ गुण होता. चाचणीसाठी एकूण २ तासांचा कालावधी होता.
४ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील तसेच महाराट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेले इयत्तांचा गट, विषय, आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे.
५ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ साठी प्रविष्ट झालेल्यांपैकी २,०९,१०१ उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व-प्रमाणपत्र (Self Cerfificaiton) करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे, त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाण पत्र (Self Cerfificaiton) तयार करणे बंधनकारक आहे.
६ उमेदवारांना त्यांचे स्व-प्रमाणपत्र (Self Cerfificaiton) करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी TAIT-२०२५ चाचणी नोंदणी क्रमांक (Registration Number), बैठक क्रमांक (Roll Number), नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत असणे आवश्यक आहे.
७पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदांच्या इयत्तांचा गट, विषय व आरक्षणनिहाय, व्यवस्थापननिहाय रिक्त पदांची माहिती दर्शविणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.
८ स्थानिक स्वराज्य संस्थाकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात) नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल.
९ खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असतील. यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनास असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात) पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी तीन उमेदवारांची (१:३ या प्रमाणात) मुलाखतीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल.
१० शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक १४/०५/२०२५ असा होता, त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन शुद्धिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र क्र १०६/टीएनटी-१ दिनांक ०२/०५/२०२५ नुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारदेखील शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिनांक २५/०९/२०२५ पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात आलेले आहे.
११ उमेदवाराची दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक २५/०९/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉगीनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापननिहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवाराने निवडलेले प्राधान्यक्रम (Locked preferences) निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील.
१२ जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय, उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम (Locked preferences) यांचा गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.
१३ त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्यांची स्व-प्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करतील.
ब) स्व- प्रमाणपत्राबाबत सूचना :
अर्जात म्हणजेच स्व-प्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा पाठविलेल्या दाखल्याच्या प्रतीतील नोंदींमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैर वर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा इत्तर योग्य अशा शिक्षेस पात्र ठरेल.
१. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. ही नोंदणी (Registration) करण्यासाठी Register Here येथे क्लिक करून तेथे आपला टेट २०२५ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करावा. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा लॉग इन आयडी (log in ID) हा २५_XXXXXXXXXX (दहा अंकी टेट २०२५ चा रोल नंबर) याप्रमाणे असेल.
२. पवित्र पोर्टल वरील नोंदणी (Registration) व स्व-प्रमाणपत्र (Self Certification) भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे.
३. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवाराने नोंदणी (Registration) व स्व-प्रमाणपत्र (Self Certification) साठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये Capital Letters मध्ये भरावी. संक्षिप्त (Abbrivations) अथवा आद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे पतीचे नाव, आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावी तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव इत्यादींमध्ये एक स्पेस सोडावी.
४. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात स्व-प्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल.
५. संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक २५/०९/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाईल.
६. ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणांमुळे राखून ठेवला असेल आणि असा राखून ठेवलेला शैक्षणिक अर्हतेचा निकाल दिनांक १४/०५/२०२५ नंतर व व्यावसायिक अर्हतेचा निकाल दिनांक २५/०९/२०२५ नंतर जाहीर झाला असेल अशावेळी उमेदवाराने विहित मुदतीत अर्हता धारण केली, असे मानण्यात येणार नाही.
७. उमेदवाराने पत्रव्यवहाराचा स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा.
८. उमेदवाराचे वय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, आरक्षित प्रवर्ग (असल्यास) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू तसेच अनाथ इत्यादी संदर्भात न चुकता निःसंदिग्धपणे / निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास सबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. तसेच उमेदवार एकापेक्षा जास्त दावे करू इच्छित असल्यास तसे स्पष्टपणे स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद करावे.
९. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण (दिव्यांग व अनाथ प्रवर्गासह) इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडील सदर चाचणीची अधिसूचना दिनांक २५/०४/२०२५ व सुधारित अधिसूचना दिनांक १३/०५/२०२५ अन्वये चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास शेवटचा दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक १४/०५/२०२५ पर्यंतची प्राप्त प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ च्या वेळी अर्जामध्ये दिव्यांगत्वाचा दावा केला आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या दाव्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल करता येणार नाही.
१०. आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer) प्राप्त असणे आवश्यक आहे.
११. प्रस्तुत पदभरतीकरिता सन २०२५-२६ या वित्तीय वर्षासाठी ग्राह्य असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer) उमेदवारांनी सादर करावे.
१२. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तथापि, या प्रवर्गातील उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले (केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले) आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र (केंद्रीय सेवांसाठी लागू असलेले) या शिक्षक पदभरतीसाठी लागू राहणार नाही.
१३. उमेदवारांनी वेळोवेळी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना निवडीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येईल, स्व-प्रमाणपत्रामध्ये पात्रतेविषयक माहिती मूळ कागदपत्र/प्रमाणपत्रांच्या आधारे संबंधित व्यवस्थापनाकडून तपासण्यात येईल व मूळ कागदपत्रांच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवाराची निवड निश्चित होईल. अन्यथा अपात्र उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व असा उमेदवार योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.
१४. नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणारा उमेदवार अध्यापन करण्यास शारीरिक व मानसिकदृष्ट्या पात्र असल्याचे सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.
१५. सदरहू शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अशासकीय व्यक्ती यांपैकी कोणाचीही अभिकर्ता/ माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही. नोकरी मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती / तोतया व्यक्तींपासून अर्जदारांनी सावध राहावे.
१६. उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्व-प्रमाणपत्रातील माहिती भरावी.
१७. पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवडप्रक्रियेसंदर्भातील पुढील कोणतीही कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहणे आवश्यक आहे. निवडप्रक्रियेसंबंधीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
क) मागासवर्गीय आरक्षण
शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीकरिता आरक्षणाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:-
1. उभे आरक्षण / सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण
॥. आडवे आरक्षण / समांतर आरक्षण
१. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या व त्याप्रमाणे अर्जात निरपवादपणे दावा करणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम २० नुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
२. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील/देशातील उमेदवार तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावातील उमेदवार केवळ 'अराखीव-सर्वसाधारण पदांवरील नेमणुकीसाठी पात्र असतील.
३. अर्जामध्ये महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असल्याचा व आरक्षित प्रवर्गाचा (लागू असल्यास) स्पष्टपणे दावा केल्याशिवाय व प्रस्तुत दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे / पुरावा अपलोड केल्याशिवाय संबंधित आरक्षित पदावरील नियुक्तीकरिता उमेदवाराचा कोणत्याही परिस्थितीत विचार करण्यात येणार नाही.
४. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक सर्व वैध कागदपत्रे / पुरावा अपलोड करू न शकलेल्या उमेदवाराचा विचार केवळ अराखीव सर्वसाधारण' पदांवरील निवडीकरिता होऊ शकेल.
५. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणासंदर्भातील राज्याच्या आर्थिक दुर्बल घटकातील ज्या व्यक्तीच्या जातींचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम, २००१ अन्वये विहित करण्यात आलेल्या मागासवर्गासाठी अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार घोषित मागासवर्गीयांमध्ये समावेश नसेल अशा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय आहे. याबाबतीत शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले निकष लागू राहतील.
६. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी सक्षम प्राधिकारी यांनी वितरित केलेले व राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाकरिता राज्य शासनाच्या प्रमाणपत्राचा नमुना वापरणे आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, शिक्षण सेवक / शिक्षक सेवांसाठीच्या पदभरतीकरिता वापरता येणार नाही.
७. विविध सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठींच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम, २००१ व महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम-२०२४ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील.
८. जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम-२००० आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) नियम-२०१२ मधील तरतुदी आणि यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या नमुन्यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रदान करण्यात आलेले जात पडताळणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
९. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नाहीत, असे स्व-प्रमाणपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतच्या वैध प्रमाणपत्राच्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
१०. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ज्या व्यक्तींच्या नावे जातीचे प्रमाणपत्र असेल ती व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंब क्रिमी लेअरमध्ये मोडत नसल्याचे व धारकाच्या नावाने सर्वसाधारण रहिवास प्रमाणपत्रात प्रमाणित असणे आवश्यक आहे.
११. महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असलेल्या स्थलांतरित मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आलेल्या तरतुदी लागू राहतील.
ड) समांतर आरक्षण
समांतर आरक्षणांतर्गत समांतर आरक्षणाचा प्रकार महिला ३०%, माजी सैनिक १५%, अंशकालीन १०%, प्रकल्पग्रस्त ५%, भूकंपग्रस्त २%, खेळाडू ५%, अनाथ १ % याप्रमाणे आरक्षण राहील.
१. महिलांसाठीचे आरक्षण :
महिलांसाठी समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महिलांना त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गाच्या तरतुदीव्यतिरिक्त सदरच्या तरतुदी या अतिरिक्त आहेत.
अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील महिलांना, महिलांकरिताचे समांतर आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. थोडक्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव प्रवर्ग वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र लागू राहील.
मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसार सवलती देय असतील.
महिलांसाठी आरक्षित पदांवर दावा करणाऱ्या / करणारा संबंधित उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला व अमागास महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड). विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील महिलांनी त्यांच्या संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाकरिता आवश्यक असलेले त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाकरिता नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
२. माजी सैनिकांसाठीचे आरक्षण :-
माजी सैनिक उमेदवारांना शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट-क संवर्गातील पदांकरीता १५% समांतर आरक्षण लागू आहे.
माजी सैनिकांसाठी आरक्षित पदावर राज्य शासनाच्या सेवेमध्ये गट-क मध्ये एकदा नियुक्ती झाल्यानंतर गट-क मध्ये तो धारण करीत असलेल्या पदापेक्षा उच्च श्रेणी वा अन्य संवर्ग यातील नियुक्तीसाठी माजी सैनिक म्हणून राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.
याशिवाय शासनाच्या माजी सैनिक आरक्षण व नियुक्ती संदर्भातील सर्व तरतुदीही लागू राहतील
३. पदवीधर अंशकालीन कर्मचारी
सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक पअंक-१००९/ प्रक्र २००/२००९/१६-अ दिनांक २७/१०/२००९, क्रमांक अशंका-१९१८/प्रक्र ५०७/१६-अ दिनांक २/१/२०१९, विकाक-२२१५/प्र क्र ३३७/१६-अ दिनांक ४/११/२०१६ व रोजगार व स्वयंरोजगार विभाग शासन परिपत्रक इएसइ २००३/प्र क्र ४८/रोस्वरो-१ दिनांक ०७/०३/२००३ मधील तरतुदींनुसार उमेदवारांसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठीचे आरक्षण लागू आहे.
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याकरिता शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट-क संवर्गातील पदांकरीता १०% समांतर आरक्षण लागू आहे. सदर आरक्षण सामाजिक प्रवर्गांतर्गत कप्पीकृत आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना अर्थ साहाय्य या योजनेंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांना आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक ०२.०१.२०१९ नुसार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादा वयाच्या ५५ वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील.
४. प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण
प्रकल्पग्रस्तांकरिता शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट क संवर्गातील पदांकरिता ५% समांतर आरक्षण लागू आहे. सदर आरक्षण सामाजिक प्रवर्गातर्गत कप्पीकृत आहे.
सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक एइएम-१०८०/३५/१६-अ दिनांक २०/०१/१९८०, क्रमांक प्रकल्प-१००६/मूस-२९६/प्रक्र ५६ / ०६/१६-अ दिनांक ०३/०२/२००७ व अन्य शासन निर्णयातील / शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी आरक्षण लागू आहे.
५. भूकंपग्रस्तांचे आरक्षण :-
भूकंपग्रस्तांकरिता शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट क संवर्गातील पदांकरिता २% समांतर आरक्षण लागू आहे. सदर आरक्षण सामाजिक प्रवर्गांतर्गत कप्पीकृत आहे.
सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक भूकंप-१००९/प्रक्र-२०७/२००९/१६-अ दिनांक २७/०८/२००९, महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक-इक्यूआर-१०९४/प्र क्र ७६८/भूकूप-१ दिनांक ०९/८/१९९५, महसूल व वन विभागाचा मदत व पुनर्वसन क्रमांक आव्यप्र-२०२०/प्र क्र ४३/आव्याप्र-२ दिनांक २४/११/२०२२ व सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक प्रकल्प-१००६/मूस-२९६/प्रा क्र ५६/०६/१६-अ दिनांक ०३/०२/२००७ व अन्य शासन निर्णयातील / शासन परिपत्रकातील तरतुदींनुसार भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी आरक्षण लागू आहे.
सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक विकाक-२२१५/प्र क्र ३३७/१६-अ दिनांक ४/११/२०१६ मधील तरतुदींनुसार भूकंपग्रस्तांकरिता आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र उमेदवार न मिळाल्यास सदर पदावर प्रकल्पग्रस्त व्यक्तींची शासन मान्यतेने गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
६. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचे आरक्षण :
खेळाडूंच्या आरक्षित पदांकरिता उमेदवार हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची प्रमाणपत्रे ते गट-क संवर्गातील दर्जासाठीची आहेत काय तसेच खेळाचा कालावधी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचा आहे काय, याची अर्ज सादर करतानाच खातरजमा करावी. अशी प्रमाणपत्रे उमेदवार, ज्या विभागातील आहे, त्या विभागातील उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रमाणित केलेली असावीत.
गट-क संवर्गातील पदासाठी शासन शुद्धिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग-राक्रीघो-२००२/प्र क्र ६८/ क्रीयुसे-२ दिनांक १/७/२०१६, दिनांक १८/०८/२०१६, दिनांक १०/१०/२०१७ दिनांक १५/११/२०१७ व अन्य शासन निर्णयातील / शासन परिपत्रकातील तरतुदींनुसार उमेदवार शिक्षक संवर्गातील पदासाठी पात्र ठरतील.
मुलाखत अथवा प्रमाणपत्र पडताळणीच्या कोणत्याही टप्प्यावर क्रीडा प्रमाणपत्राचा पडताळणी अहवाल अथवा प्रमाणपत्र पडताळणीकरिता केलेल्या अर्जाची पोचपावती सादर न केल्यास संबंधित उमेदवार खेळाडूंकरिताच्या आरक्षणासाठी अपात्र ठरेल.
७. अनाथ व्यक्तींचे आरक्षण :
अनाथ व्यक्तींसाठीच्या आरक्षणाबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक अमुजा-२०११/प्र क्र २१२/का-३ दिनांक २/४/२०१८, शासन परिपत्रक क्रमांक अनाथ-२०२२/प्रक्र १२२/का.०३/ दिनांक १०/०५/२०२३, क्र अनाथ-२०१८/प्रक्र ८२/ का-३ दिनांक २०/८/२०१९, क्रमांक संकीर्ण-२०१३/ प्र क्र १०९/का-३ दिनांक ०६/०६/२०१६, क्रमांक अनाथ २०२२/ प्र क्र १२२/का.०३/ दिनांक ०६/०४/२०२३ व अन्य आनुषंगिक शासन निर्णयाच्या तरतुदी लागू राहतील.
13
अनाथांच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरीता उमेदवार महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी (डोमिसाईल) असणे आवश्यक आहे. महिला व बाल विकास विभागाकडून ज्या अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत, अशी बालके आरक्षणासाठी पात्र राहतील. तथापि, ज्या मुलांच्या आई-वडिलांचे निधन त्याच्या मुलाच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी झाले असेल, अशाच अनाथ बालकांना आरक्षण अनुज्ञेय राहील.
८. दिव्यांग व्यक्तीसाठीचे आरक्षण :
दिव्यांग व्यक्तींकरिता एकूण पदांच्या ४% इतकी पदे खालीलप्रमाणे आरक्षित आहेत.
अक्र दिव्यांग गट प्रकार
१
आरक्षणाचे प्रमाण
अ (a)
अस्थिव्यंगता / मेंदूचा पक्षघात (Cerebral १% Palsy) / कुष्ठरोग मुक्त (Leprosy Cured)/ शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism)/आम्ल हल्लाग्रस्त (Acid attack victims) / स्नायू विकृती (Muscular Dystrophy)
अंघ/अल्पदृष्टी
२
ब (b)
9%
३
क (c)
कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील १% दुर्बलता
४ ड (d)
स्वमग्नता (Autism) / मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता (Intellectual Disability) / विशिष्ट शिक्षण अक्षमता (Specific learning disablity) / मानसिक आजार (Mental Illness)
L
१%
वरील अतेड मधील बहिरेपणा व अंधत्वासह एका पेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यासाठी त्यांचेसाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदावर
दिव्यांग अधिकार अधिनियम, २०१६ नुसार केवळ उपरोक्त दिव्यांग प्रकारांकरिता आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. दिव्यांग आरक्षणाच्या पात्रतेकरिता दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० % असणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तींकरिताचे आरक्षण हे समांतर आरक्षण आहे.
दिव्यांगासाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश, उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या सामाजिक प्रवर्गातून करण्यात येतो. दिव्यांग उमेदवारांना त्यांच्याकरिता असलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणे बंधनकारक आहे.
दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in संकेतस्थळावरून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले प्रमाणपत्र व UDID कार्ड सादर करणे आवश्यक राहील.
इ) महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांसदर्भातील तरतुदी-
सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक मकसी-१००७/प्रक्र ३६/का-३६ दिनांक १०/०७/२००८ मधील तरतुदींनुसार उमेदवारांसाठी सवलती लागू राहतील.
महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावातील मराठी भाषक उमेदवार संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास, ते महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास व गुणानुक्रमे निवड होत असल्यास सदर पदांवर नेमणुकीसाठी पात्र असतील.
ज्या पदांकरिता महाराष्ट्रातील किमान १५ वर्षे वास्तव्याची अट विहित करण्यात आली असेल, त्या पदांसाठी महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील वास्तव्यही विचारात घेण्यात येईल. तथापि, उमेदवार सदर ८६५ गावांमध्ये वास्तव्यास असल्याबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याने विहित नमुन्यात दिलेला दाखला सादर करणे अनिवार्य राहील.
सदर उमेदवार अराखीव सर्वसाधारण पदावरील निवडीकरिता पात्र असतील. अराखीव-सर्वसाधारण पदे सोडून इतर कोणत्याही आरक्षित पदावरील निवडीकरिता सदर उमेदवार पात्र ठरत नाहीत.
फ) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र -
उमेदवारांच्या हयात अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर दि. २८ मार्च, २००६ व तदनंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
ग) संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान-
महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम १९९९ मधील तरतुदीनुसार शासनाने वेळावेळी आवश्यक ठरविलेली संगणक अर्हता विहित कालावधीत धारण करणे आवश्यक राहील.
ह) प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात सादर करावयाची कागदपत्रे-
ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करताना ज्या बाबींपुढे प्रमाणपत्रे अपलोड करण्याचे सूचित केले आहे, त्या बाबींची प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. स्वप्रमाणपत्रात केलेल्या दाव्यानुसार विहित टप्प्यावर संबंधित कागदपत्रांच्या आधारे पात्रता तपासण्याच्या अधीन राहून आणि उमेदवाराची गुणवत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पसंतीक्रम व अन्य पात्रतेच्या अटींच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल.
दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम-२०२४ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील.
८. जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम-२००० आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) नियम-२०१२ मधील तरतुदी आणि यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या नमुन्यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रदान करण्यात आलेले जात पडताळणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
९. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नाहीत, असे स्व-प्रमाणपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतच्या वैध प्रमाणपत्राच्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
१०. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ज्या व्यक्तींच्या नावे जातीचे प्रमाणपत्र असेल ती व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंब क्रिमी लेअरमध्ये मोडत नसल्याचे व धारकाच्या नावाने सर्वसाधारण रहिवास प्रमाणपत्रात प्रमाणित असणे आवश्यक आहे.
११. महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असलेल्या स्थलांतरित मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आलेल्या तरतुदी लागू राहतील.
ड) समांतर आरक्षण
समांतर आरक्षणांतर्गत समांतर आरक्षणाचा प्रकार महिला ३०%, माजी सैनिक १५%, अंशकालीन १०%, प्रकल्पग्रस्त ५%, भूकंपग्रस्त २%, खेळाडू ५%, अनाथ १ % याप्रमाणे आरक्षण राहील.
१. महिलांसाठीचे आरक्षण :
महिलांसाठी समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महिलांना त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गाच्या तरतुदीव्यतिरिक्त सदरच्या तरतुदी या अतिरिक्त आहेत.
अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील महिलांना, महिलांकरिताचे समांतर आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. थोडक्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव प्रवर्ग वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र लागू राहील.
मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसार सवलती देय असतील.
महिलांसाठी आरक्षित पदांवर दावा करणाऱ्या / करणारा संबंधित उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला व अमागास महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड). विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील महिलांनी त्यांच्या संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाकरिता आवश्यक असलेले त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाकरिता नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
उमेदवारांनी केलेल्या विविध दाव्यांच्या पुष्ट्यर्थ विविध टप्प्यांवर प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी पात्रतेसंदर्भात खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
१) वयाचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक पुरावा)
(अ) मॅट्रीकचे प्रमाणपत्र / माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र.
(आ) सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वयाचे प्रमाणपत्र.
(इ) जन्मदिनांक नमूद असलेला शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला.
(ई) नगरपालिका / महानगरपालिका / ग्रामपंचायतीचा जन्म दाखला.
२) शैक्षणिक / व्यावसायिक अर्हता इत्यादींचा पुरावा
(अ) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेच्या किंवा एखाद्या तत्सम परीक्षेच्या बाबतीत, संबंधित मंडळाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र. अशा प्रमाणपत्राऐवजी शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार नाही.
(ब) उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (HSC) किंवा तत्सम समकक्ष परीक्षेचे उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.
(क) उत्तीर्ण केलेल्या पदवी परीक्षांच्या किंवा पदविका परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेचे विद्यापीठाने / सक्षम प्राधिकाऱ्याने औपचारिकरीत्या प्रदान केलेले गुणपत्रक व प्रमाणपत्र.
(ड) उत्तीर्ण केलेल्या पदव्युत्तर परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेचे विद्यापीठाने /सक्षम प्राधिकाऱ्याने औपचारिकरीत्या प्रदान केलेले गुणपत्रक व प्रमाणपत्र.
(इ) इयत्ता १ ते ५. इयत्ता ६ ते ८, इयत्ता ९ ते १०, व इयत्ता ११ ते१२ या अध्यापनातील विषयगटातील पदांसाठी आवश्यक असलेल्या किमान अर्हतेची प्रमाणपत्रे.
(फ) जेथे पदवीकरिता CGPA / OGPA or Letter grade देण्यात येते, तेथे संबंधित विद्यापीठ / संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावेत. इयत्ता १० वी,
इयत्ता १२ वी, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA / OGPA or Letter grade इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात. या श्रेणीचे प्रत्यक्ष गुणांमध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड / विद्यापीठ / संस्थांचे सूत्र वेगवेगळे व स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टलवर वेगवेगळे सूत्र देणे शक्य नाही. यास्तव ज्या उमेदवारांचे शैक्षणिक / व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA / OGPA or Letter grade इत्यादी श्रेणी नमूद आहेत त्यांनी त्या त्या बोर्ड / विद्यापीठ / संस्थांचे असलेले गुण रूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण व प्रमाण या माहितीची नोंद करावी.
(ग) राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET किंवा CTET) पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र (इयत्ता १ ते ८ करिता) उमेदवाराने सादर करणे आवश्यक आहे.
(ह) अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (TAIT) गुणपत्रक / उमेदवाराचे नाव असलेल्या निकाल यादीतील संबंधित पृष्ठांची प्रत उमेदवाराने सादर करणे आवश्यक आहे.
३) उमेदवार मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा :
(अ) राज्य शासनाने भरती करण्याच्या प्रयोजनार्थ अनुसूचित जमाती म्हणून मान्यता दिलेल्या जमातींपैकी असल्याचा दावा करणाऱ्या अथवा अनुसूचित जातींमधील धर्मांतरित बौद्ध असल्याचा दावा केलेल्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
(ब) विमुक्त जाती (अ) भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क) भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून मान्यता दिलेल्या जाती / जमातींपैकी एखाद्या गटाचा असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी शासनाकडून वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्राची प्रत उमेदवाराने सादर करणे आवश्यक राहील.
४) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र :
(अ) राज्य शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
ब) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व अराखीव महिला उमेदवारांनी नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
५) दिव्यांग असल्याबाबतचा पुरावा :
दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा वयोमर्यादेतील सवलतींच्या लाभासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय क्र. अप्रवि २०१५/प्रक्र ४६/आरोग्य-६ दिनांक १४.०९.२०१८ अन्वये विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार www.swavalambancard.gov.in या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले किमान ४० % कायमस्वरूपी दिव्यांगत्व असल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे.
६) माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा :
माजी सैनिकांसाठी असलेल्या सवलतींचा वयोमर्यादेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात (लागू असेल त्या प्रमाणे) सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
७) महिला आरक्षणासाठी पात्र असल्याबाबतचा पुरावाः
मागासप्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी स्वप्रमाणपत्रात न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domocile) असल्याबाबत तसेच नॉन क्रिमीलेअर मध्ये मोडत असल्याबाबत (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अराखीव महिला, खुल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वगळता) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
८) खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावाः-
प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी आरक्षित पदांवर दावा करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्रधिकाऱ्यांनी प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा अर्जाची पोच सादर करणे आवश्यक राहील.
९) अनाथ असल्याचा पुरावा :
विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास यांचेकडून वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
१०) प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचा पुरावा :
संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांच्यावतीने संबंधित पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नोकरीविषयक सवलतींच्या संदर्भात दिलेला दाखला सादर करणे आवश्यक आहे.
११) भूकंपग्रस्त असल्याबाबतचा पुरावा :
संबधित जिल्हाधिकारी यांनी वितरित केलेला भूकंपग्रस्त असल्याबाबतचा दाखला /प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
१२) पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याबाबतचा पुरावाः
संबंधित तहसीलदार यांनी वितरित केलेला अनुभवाचा दाखला/प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
१३) विवाहित महिलांच्या नावांत बदल झाल्याबाबतचा पुरावाः-
विवाहित महिलांना विवाह-निबंधक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र सादर करणे आवश्यक आहे.
१४) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र :
(अ) नियुक्तीच्या वेळी विहित नमुन्यानुसार साध्या कागदावर टंकलिखित करून उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे.
(ब) प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक २८.०३.२००६ व तदनंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
१५) संगणक हाताळणी व वापराबाबतचे ज्ञान :
महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी / वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम १९९९ मधील तरतुदींनुसार शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरविलेली संगणक हाताळणीविषयक अर्हता उमेदवाराने विहित कालावधीत धारण करणे आवश्यक आहे.
ज) गैरप्रकार / गैरप्रकाराचे प्रयत्न :
शिक्षक / शिक्षण सेवक पदभरती अनुषंगाने उमेदवार अथवा उमेदवार नसलेल्या व्यक्तींनी केलेल्या खालील कृतींना गैरप्रकार / गैरकृत्य समजण्यात येईल.
स्वप्रमाणपत्रामध्ये हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे बदल करणे किंवा दाखल्याच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट अथवा विहित पद्धतीने वितरित न करण्यात आलेले दाखले / कागदपत्रे सादर करणे.
स्वतःच्या उमेदवारीच्या अनुषंगाने स्वतः अथवा इतर व्यक्तींकडून अवैध मार्गाने निवडप्रक्रियेवर प्रभाव टाकणे अथवा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे.
तोतयागिरी करणे अथवा करण्याचा प्रयत्न करणे आणि अथवा कोणत्याही तोतया व्यक्तीची मदत घेणे अथवा मदत घेण्याचा प्रयत्न करणे.
उमेदवाराची कोणतीही कृती जी शालेय शिक्षण विभागाच्या अथवा शासनाच्या मते भरतीप्रक्रियेच्या न्याय्य व निःपक्ष आयोजनावर प्रभाव पाडते.
एखाद्या विशिष्ट निर्णयासाठी संघटितपणे अथवा असंघटितपणे कोणत्याही माध्यमातून संबंधितांवर दबाव आणणे अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न करणे.
स्व-प्रमाणपत्रातील सर्व दावे माहितीची सत्यता तपासण्यासाठी संबंधितांनी मागणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांचा पुरावा संबंधितांच्या सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर सादर न करणे.
स्व-प्रमाणपत्रातील सर्व दावे माहिती आणि निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर सादर केलेल्या कागदपत्रांमधील दावा यांमध्ये फरक अथवा तफावत आढळून येणे.
शिक्षण सेवक / शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधितांशी पत्रव्यवहार करताना हेतुपुरस्सर वस्तुस्थितीदर्शक माहिती नमूद न करणे, वस्तुस्थिती दडविणे, पुराव्याविना माहिती देणे, पत्रव्यवहारामध्ये खोटे / दिशाभूल करणारे आरोप करणे.
स्व-प्रमाणपत्रामध्ये केलेला दावा अथवा नमूद केलेली कोणतीही माहिती व त्या संबंधीची कागदपत्रे / प्रमाणपत्रे निवडीच्या अथवा निवडीनंतरच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव खोटी, बनावट, खाडाखोड केलेली, अवैध, संबंधित शासन आदेश / नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केली नसल्याचे आढळून येणे.
ल) गैरप्रकार प्रकरणी कारवाई :
या विषयाबाबत वरील नमूद मुद्द्यांमधील एक किंवा एकापेक्षा जास्त कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर तसेच उमेदवार नसलेल्या परंतु गैरप्रकार करण्यास साहाय्यभूत ठरणाऱ्या व्यक्तींवर प्रचलित कायदा व नियमांनुसार फौजदारी अभियोग दाखल करून कारवाई करण्यात येईल. याशिवाय सदर उमेदवारास निवडप्रक्रियेसाठी अनर्ह (Disqualify) ठरविणे आणि / अथवा गैरप्रकार / गैरप्रकाराच्या प्रयत्नाच्या आधारे नोकरी मिळविलेल्या उमेदवाराची अथवा व्यक्तीची नियुक्तीची शिफारस रद्द करणे व संबंधित व्यवस्थापनाकडून सेवासमाप्तीची कार्यवाही करणेत येईल.
सन २०१८ व सन २०१९ या वर्षी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या आदेश क्रमांक मरापप/बापवि/२०२२/३८४४दि. ०३/०८/२०२२ व मरापप / बापवि/२०२२/४८३९ दि. १४.१०.२०२२ अन्वये शिक्षक पात्रता परीक्षां (TET) संपादणूक रद्द करून व शास्ती करून उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशा उमेदवारांबाबत मा. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही अनेक सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्या सत्रांपैकी ही चाचणी केवळ एकाच सत्रात देण्याची मुभा होती. तथापि, असे निदर्शनास आले की, काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक आवेदनपत्रे सादर केली होती. अशा परिस्थितीत उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक सत्रांसाठी प्रवेशपत्रे प्राप्त झाली असली तरी केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर सहभागी करून घेता येणार नाही. यामुळे अशा उमेदवारांनी निवडप्रक्रियेत सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
महत्त्वाचेः
१. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार संबंधित पदासाठी उमेदवारांनी अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्राधान्यक्रम भरणे, आवश्यक माहिती प्रणालीवर अद्ययावत करणे इत्यादी बाबतच्या सूचना पवित्र प्रणालीवर दर्शविण्यात येत आहेत. उमेदवारांनी नियमितपणे पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घ्याव्यात.
२. शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार वरील सूचना देण्यात आलेल्या आहेत, शासन निर्णय, मा. न्यायालयाचे आदेशानुसार बदल झाल्यास सुधारित सूचना प्रणालीवर उपलब्ध करण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
वरील संपूर्ण सूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments