केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार 50% पदोन्नतीने व 50% विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारा शासन निर्णय

 केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार 50% पदोन्नतीने व 50% विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारा शासन निर्णय.


मा. महेश पालकर प्राथमिक शिक्षण संचालक यांचे कार्यालयातून दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित झालेल्या एका परिपत्रकानुसार केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळ सेवेने व मर्यादित विभागीय परिषद द्वारा भरण्याकरता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत माननीय मंत्री महोदयांनी केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे 50:50 भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. 

त्या अनुषंगाने कळविण्यात येते की संदर्भांकित केंद्रप्रमुखांची निर्गमित सर्व शासन निर्णय व दिनांक 10 जून 2014 ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संचालनालयास त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून केंद्रप्रमुखच्या रिक्त पदांचा तपशील उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना सादर करणे सुलभ होईल. असे निर्देश संचालकांनी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले आहे.


या अगोदरच निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

या परिपत्रकानुसार असे स्पष्ट होते की उर्वरित पन्नास टक्के विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी पदे देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना माहिती उपलब्ध करून देऊन परीक्षेद्वारे लवकरच भरण्यात येणार आहेत असे स्पष्ट होते.


वरील प्राथमिक शिक्षण संचालक यांचे परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

2 Comments

  1. फक्त जी. प. साठीच आहे का ....की खाजगी शाळांना पण लागू होणार

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.