क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार (राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) अर्ज प्रक्रियेला सुरुवात.

 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 


राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार नव्हे तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार शासन आदेश


शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण
विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व
राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषांद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत आपण भरलेल्या माहितीचे मूल्यांकन करून गुणानुक्रमे शिक्षकांना प्रत्यक्ष मुलाखतीस बोलावले जाते . 

 प्रस्तावासाठी आवश्यक अटी: 
   1) शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.

   2) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी/प्रशासन  
         अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
   3) शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान 10 वर्षे आवश्यक.   4) शिक्षकाचे/मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.

   5) पोलिस खात्याचा चारित्र्य पडताळणी दाखला.

   6) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

   7) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या 5 वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकड गुणांकनाव्दारे करण्यात येईल.

   8) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.

   9) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
        राहील.


राज्य पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments