मागील आठवड्यातील शिक्षण विभागाने घेतलेले सर्व महत्त्वपूर्ण निर्णय - महाराष्ट्र राज्य

मागील आठवड्यातील शिक्षण विभागाने घेतलेले 

सर्व महत्त्वपूर्ण निर्णय - महाराष्ट्र राज्य. 


माहे एप्रिल मधील दिनांक १८ ते २४ या आठवड्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे ते पुढीलप्रमाणे. 

१) जिल्हा नियोजन समिती कडून किमान 5% निधी शाळां साठी राखीव ठेवण्या संदर्भात मंत्री मंडळ निर्णय

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक विकासासाठी जिल्हा नियोजन समिती किमान पाच टक्के निधी राखीव ठेवणार यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे. 


२) शिष्यवृत्ती परिक्षा अर्ज करण्यासाठी ३० एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ

वर्ग पाचवी वर्ग आठवी साठी दरवर्षी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी जुलै दोन हजार बावीस रोजी होणार असून त्यासाठी दुसऱ्यांदा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. 

३) पहिले पाऊल मिळाव यांची दमदार सुरुवात झाली असून येत्या सत्रात जून 2022 मध्ये शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांनी आनंदाने तयारीनिशी शाळेत यावे यासाठी राज्य शासन पहिले पाऊल शाळा पूर्वतयारी अभियान राबवित आहे या अंतर्गत दिनांक 18 ते 27 एप्रिल या कालावधीत राज्यभरातील शासकीय शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावे होत आहेत. 

४) या शाळापूर्व तयारी ला उत्सवाचे स्वरूप आले आहे लोकसहभागामुळे शाळा पूर्वतयारी अभियाना ला उत्सवाचे स्वरूप आले आहे यामध्ये पारंपरिक वेशभूषा प्रभात फेरी दिंडी भजन कीर्तन लेझीम नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गावात विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. या अभियानाला जनता रूप देण्याचे शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी आवाहन केले आहे. 


महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री यांचे tweet twitter वर पाहण्यासाठी. . . .   येथे क्लिक करा


५)अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ची पूर्वतयारी सुरु. .. 
सन 2022-23  इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 1 ते 14 मी या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे तसेच सतरा मी पासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. 

६) बाल भवनाचा वर्धापन दिन साजरा- आपल्या बालगोपाळांना कलागुणांना वाव देणाऱ्या आणि त्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्र राज्य बालभवनच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 
७) मालदीवचे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर अब्दुल्ला रशिद अहमद आणि ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्य दूत फिटर ट्रस्ट वेल यांनी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा एकनाथ गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली शिक्षण क्षेत्रातील संधी आणि परस्पर सहकार्याबद्दल दोन्ही बैठकांमध्ये हे सकारात्मक चर्चा करण्यात आली. 


८) साडेचार लाख माता गटांची स्थापना होणार... 
मुलांच्या भविष्यासाठी सतत घडणाऱ्या वर पहिले पाऊल अभियानाच्या केंद्रस्थानी असणार आहे राज्यात स्थापन होणार तब्बल साडेचार लाख मातांचे गट सहज उपलब्ध सामग्रीचा उपयोग करून माता गटांच्या मदतीने मुलांची शाळा पूर्ण तयारी केली जाणार आहे. 

दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.