अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती आँनलाईन अर्ज मोबाईल वरुन कसा करायचा...?

 अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती आँनलाईन अर्ज मोबाईल वरुन कसा करायचा...?


अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढून १५/१२/२०२१ ही झाली आहे.  👇


नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया की नसो पोर्टल वर अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज कसा करावा..

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील google application ओपन करा व त्यामधे nps portal type करून सर्च करा.👇


👆 आपण या आगोदर अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्ज केलेला नसल्यास New Registration वर क्लिक करा या आधी अर्ज ज्यांनी केलेला आहे त्यांनी Renewal 2021-22 वर क्लिक करा.
New Registration वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडो ओपन होईल 👇

विंडो ओपन झाल्यावर ब्राऊझर च्या उजव्या बाजूस तीन डॉट दिसतील त्यावर क्लीक करून त्यामधील पर्याया पैकी Desktop site समोरील डब्यावर टिक करा. आता 👇 अशी विंडो ओपन होईल.

सर्वात खाली डाव्या बाजूला असलेल्या तीन सूचना आगोदर जे टिक बॉक्स आहे त्यावा टिक करा आणि शेवटी आसलेल्या हिरव्या continue बटणावर क्लिक करा त्यानंतर अशी विंडो ओपन होईल.👇

वरील विंडो मधील सर्व विद्यार्थी माहिती जसे तुमचे राज्य निवडा, Scholarship category मध्ये pre matric निवडा, विद्यार्थ्याचे पुर्ण नाव टाका, Scheme type मध्ये scholarship Scheme  निवडा, विद्यार्थ्याची जन्मतारीख नोंदवा, Gender निवडा, मोबाईल नंबर अचूक नोंदवा, असल्यास ईमेल आयडी नोंदवा, बँक खाते ज्या शाखेत आहे त्या बँकेचा IFSC CODE दोनदा नोंदवा, बँक अकाऊंट नंबर देखील दोनदा नोंदवा, Identification Details मध्ये आधार निवडा, आधार नोंदीसाठी टॅब ओपन होईल त्यात आधार अचूक नोंदवा, CAPTCHA code टॅब समोर पाहून अचूक नोंदवा.

वर दिलेल्या मधील सूचना वाचून त्याआगोदर  दिलेल्या टिक बॉक्स वर टिक करा आणि सगळ्यात शेवटी लाल रंगाच्या REGISTER बटणावर क्लिक करा. सर्व नोंदी अचूक असल्यास तुमचे REGISTRATION पूर्ण झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल नंबर वर येईल त्यामधे तुमचा REGISTRATION NUMBER व पासवर्ड असेल तो वापरून अर्ज कसा भरावा ह्या संबंधीची माहिती आपण भाग दोन यानंतरच्या पोस्ट मध्ये पाहू..

जर संपूर्ण सूचना वाचूनही काही अडचण आल्यास मला jadhaopg@gmail.com या ईमेल वर अथवा ९७६५४८६७३५ या नंबर वर आपली अडचण पाठवू शकता आपणास नक्कीच मदत केली जाईल..

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.