NIPUN भारत अभियान, NIPUN BHARAT चा Full Form - NationaI Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy म्हणजेच बालकांमध्ये मुलभूत वाचन, समज आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे.

 NIPUN भारत अभियानNIPUN BHARAT चा Full Form ...NationaI Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy

म्हणजेच बालकांमध्ये मुलभूत वाचन , समज आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे.


 मुलांना साक्षर बनवणे. मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान हेच निपुण भारत मिशन कार्यक्रमाचे लक्ष आहे.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) लागू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची हमी RTE Act 2009 प्रमाणे समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना मिळत आहे. यामध्ये सर्व बालकांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यातील देशाची प्रगती ही आज ज्या पध्दतीचे शिक्षण आपण मुलांना देतो त्यावर उद्याचे भविष्य अवलंबून असते. नुकतेच केंद्र शासनाने NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केले. आणि शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा बदल आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दिसून येणार आहे. याच धर्तीवर केंद्र शासनाच्या शिक्षा मंत्रालयाने निपुण भारत मिशन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने 23 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयानुसार निपुण भारत अभियान सुरू झाले आहे. 


निपुण भारत मिशन प्रोग्राम अंतर्गत FLN वर लक्ष केंद्रित केले गेले आहे.

FLN म्हणजे काय तर मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान म्हणजेच FLN होय.

 FLN चा Full Form -Foundational Literacy And Numeracy असा आहे.

तर याचा मराठीत अर्थ मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान असा आहे.

मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान कार्यक्रमाची गरज का निर्माण झाली? 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा सन २०१५ मधील कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात आला. त्यांतर्गत प्रत्येक मुलाने मुलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करणे. कोणतेही मूल अभ्यासात मागे न राहणे हे मुख्य ध्येय सदर कार्यक्रमाचे होते.


सन २०१४, २०१६ व २०१८ च्या ASER अहवालानुसार या कार्यक्रमास प्रचंड यश मिळाले. तथापि, कोव्हीड १९ च्या महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. त्यामध्ये युनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार शालेय शिक्षणाचा विद्यार्थ्यांचा ६५ ते ७४% वेळ वाया गेल्याचे दिसून आले. 


अझिम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातून केवळ ४२% मुले, ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकली नाही. ऑनलाईन वर्गात देखील मुलांना शिक्षण परिणामकारक मिळाल्याचे दिसून आले नाही. 


जवळपास ८०% पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन विद्यार्थ्यांबारोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले ९०% पेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन परिणामकारकरित्या करणे अशक्य झाले.


अशियन विकास बँक २०२१ नुसार शाळा बंद राहिल्यामुळे ५ अशियन देशामधील मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या ३.५% ते ४.७% नुकसान झाले. म्हणून सध्याची परिस्थिती लक्षात घेता मुलांना पायाभूत शिक्षण मिळणे गरजेचे आहे. *नविन प्रवेशित आणि प्राथमिक स्तरावरील मुलांच्या मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान

Foundational Literacy And Numeracy 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. युनेस्को च्या अहवालानुसार अद्यापही बहुतेक प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी मुलभुत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केलेले नाही. असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. यासाठी मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 


वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून राज्यामध्ये अंगलबजावणी करणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेता मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (Foundational Literacy And Numeracy) निपुण भारत मिशन सुरु करण्यात आले आहे.


NIPUN/FLN कार्यक्रमामध्ये पायाभूत साक्षरतेचे घटक भाषा व गणित यावर लक्ष असून निपुण भारत मिशन मुलभूत साक्षरता अभियान FLN हे पायाभूत साक्षरता शिक्षणाशी संबंधित आहे.


*पायाभूत साक्षरतेचे घटक*

१) मौखिक भाषा विकास  


लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे.


२) उच्चार शास्त्राची जाणीव


शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरेजेचे आहे.


३) सांकेतिक भाषा/लिपी समजून घेणे 


यामध्ये छापील मजकूरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे.


४) शब्द संग्रह


मौखिक शब्द संग्रह, वाचन/लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा.


५) वाचन व आकलन


मजकूराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकूराचे स्पष्टीकरण करणे.


६) वाचनातील ओघवतेपणा


मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.


७) लेखन


अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता.


८) आकलन


छापील मजकूर/पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत.


९) वाचन संस्कृती/वाचनाकडे कल 


यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचण्याकडे कल असणे.


पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये

पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता. 


संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमश: मांडणी करणे, आकृतीबंध/संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.


प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन


संख्या पूर्व :- गणन व संख्या ज्ञान


संख्या व संख्येवरील क्रिया :- दशमान पध्दतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे.


गणना करणे:- तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे.


आकार व अवकाश याबाबत समजून घेणे:- तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करुन त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे.


नमुना/संरचना:- आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.


निपुण भारत अभियानाचा मुख्य उद्देश ध्येय कोणते आहे?

निपुण भारत मिशन अंतर्गत मुलभूत साक्षरता अभियान FLN चे Goal , Nipun Bharat Mission Aim खालीलप्रमाणे आहेत.


निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करणे.

केंद्र पुरस्कृत ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत मुलांना शालेय शिक्षणामध्ये प्रवेश देणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे.

शिक्षक प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन संदर्भ ई-साहित्य विकसित करणे. 

वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य आत्मसात करणे.

प्राथमिक स्तरावरील सन २०२६-२७ पर्यत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करणे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे.

राज्यात सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता ३ री पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता ३ री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास शासनाने शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, निपुण भारत शासन निर्णय दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.