गुरू नानक देव - आज त्यांची जयंती जाणुन घ्या त्यांच्या विषयी अधिक माहिती.

 श्री गुरू नानक देव - शिख धर्म संस्थापक


आज श्री गुरू नानक देव यांची जयंती आहे. त्यांनीं शिख धर्माची स्थापना केली ते शिख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. त्यांचा जन्म पाकिस्तान मधील लाहोर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका सर्वसाधारण हिंदू कुटुंबात झाला सर्वसामान्य जनतेला देव व धर्माबाबत जागृत करण्याचे काम त्यांनी केले.

हिंदू मुस्लिम यांना एकतेचा संदेश दिला. त्यांना सुरवाीपासूनच आध्यात्म यामध्ये रुची होती. लहानपणी त्यांचे मन शाळेत रमले नाही ते साधू संत साधू यांचे सहवासात राहू लागले त्यांचे सोबत जेवण करणे इतर कामे करणे त्यामुळे त्यांची इतर विषयातील रुची कमी होऊन त्यांचे मन आध्यात्माकडे  वळले.

मात्र त्यांच्या वडिलांना त्यांची काळजी वाटू लागली त्यांनी एक दिवस त्यांना २० रुपये दीले आणि या पैशाने एक 'सच्चा सौदा' प्रामाणिक व्यवहार करून ये म्हणून सांगितले त्यांनी त्या वीस रुपयात साधू संतांना जेवण दिले आणि वडिलांना सांगितले "मी 'सच्चा सौदा' करून आलो. " या त्यांच्या विचारांवरच आज गुरुद्वारा मध्ये लंगर दिली जाते.

त्यानंतर मात्र त्यांच्या आईवडिलांनी त्यांना वैवाहिक जीवनात बांधुन ठेवायचे ठरवले आणि त्यांचा विवाह सुलक्षिनी यांचेशी झाला. त्यांना श्रीचंद आणि लखमी दोन मुले झाली मात्र त्यांचा मूळ स्वभाव मात्र बदलला नाही.

समाजातील अंधश्रद्धा, मूर्तिपूजा ई. थोतांड त्यांना मान्य नव्हते. त्यांनी या सर्व उथळ धार्मिक गोष्टींना विरोध केला.

ज्यांच्या मनात दया, क्षमा, शांती, प्रेम या भावना ऐवजी क्रोध मत्सर, द्वेष, निष्टुरपणा या गोष्टी असतात त्या ठिकाणी ईश्वर असूच शकत नाही अशी त्यांची धारणा होती. ईश्वराला कुठे बाहेर शोधायची गरज नाही तो आपल्या अंतर्मनात असतो हा संदेश त्यांनी समाजाला दिला.

गुरू नानक देव यांनी 

“श्री ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब,”

“महला १”

“गुरबाणी तखरी”

“बारहमाहाँ”

“जपुजी”

हे ग्रंथ लिहून समाज जागृतीचे काम केले.

गुरुनानक यांचे निधन:

शीख धर्माची स्थापना करणारे गुरुनानक साहिब यांची संपूर्ण जगात एक ओळख निर्माण झाली होती लोक त्यांना गुरु मानायला लागले होते, त्यांनी तेव्हाच्या काळात एक शहर बसवले होते ते म्हणजे कर्तारपूर जे आज पाकिस्तान मध्ये आहे, आणि तेथेच त्यांनी १५३९ मध्ये शेवटचा श्वास सोडला.


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.