राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा/वर्ग स्तरावर 'विद्यार्थी समूह'! सूचना मार्गदर्शिका.

 राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा / वर्ग स्तरावर 'विद्यार्थी समूह' (STUDENTS CLUB) स्थापन करणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ :-

१. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२०.

२. राज्य अभ्यासक्रम आराखडा-२०२४

३. शासननिर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एस डी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च २०२४ (SQAAF)

उपरोक्त संदर्भीय विषयान्वाये, राज्यातील सर्व प्राथमिक/माध्य. शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वंकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, अंगभूत कौशल्याला, कल्पकतेला, सृजनशीलतेला, उर्जेला, चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्यान्वयन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण २०२४, PGI INDICATORS, SQAAF मधिल निदर्शकांचा यात समावेश आहे. या संदर्भाने काही विद्यार्थी समूहांची माहिती सोबतच्या यादीत दिलेली आहे.

उपरोक्त नमूद समूहांची शाळा / वर्ग स्तरावर स्थापना, कामकाज प्रक्रिया इ. बाबत मुद्देनिहाय सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी' विद्यार्थी समूह- मार्गदर्शिका (शाळा/वर्ग स्तर)' ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपले कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर https://www.maa.ac.in/documents/VidyarthiSamuh.pdf या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत इ. १ ली ते १२ वी च्या वर्गांसाठी दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यार्थी समूहांची स्थापना करून कार्यान्वयन करणे आवश्यक राहील.

राज्य मंडळाच्या अधीनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये (प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये) विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्य तेवढे विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांच्या आवडी व कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ताण येऊ न देता दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्थापन करण्यात यावेत. सोबतच्या मार्गदर्शिकेत नमूद बार्बीव्यतिरिक्तही प्रत्येक समूहाशी संबंधित इतर बाबींचा समावेशही समूहाच्या कामकाजामध्ये करता येईल. प्रत्येक विद्यार्थी किमान एका तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री करावी.


तसेच उपरोक्त विषयांव्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर प्रथम तो उपरोक्त ३४ समूहांमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही याची शाळास्तरावरच खात्री करावी आणि नंतरच नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा. अशा नविन विद्यार्थी समूहासाठी प्रथम या पुस्तिकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात आणि त्याची एक प्रत DIET ला माहितीस्तव पाठवावी. यावर DIET ने योग्य ते अभिप्राय शाळेला द्यावेत. सर्व DIET नी असे प्राप्त प्रस्ताव SCERT ला आवश्यक दुरुस्त्यांसह पाठवावेत. याविषयी DIET ने एक अधिव्याख्याता यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सर्व शाळांना ती कळवावी. विद्यार्थी समूहांची प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य समन्वयन व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी/पर्यवेक्षकीय अधिकारी/मुख्याध्यापक/शिक्षक यांनी पुढीलप्रमाणे जबाबदारी देण्यात येत आहे.

क्षेत्रीय अधिकारी/पर्यवेक्षीय अधिकारी / मुख्याध्यापक / शिक्षक

जबाबदारी

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)

१. जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन 

२. नोडल अधिकारी यांची नेमणूक व संनियंत्रण

३. विद्यार्थी समूहाची जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रभावी कार्यवाही होत असल्याची खात्री करणे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी

१. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ

(माध्यमिक)

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी समूहाची स्थापना करणे. 

२. पुस्तिकेत निर्देशित विद्यार्थी समूह संरचना व कार्यपद्धती याबाबत अंमलबजावणी करणे.


३. विद्यार्थी समूह स्थापना व कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे.

२ गट शिक्षणाधिकारी

तालुकास्तरीय नियोजन, संनियंत्रण, संकलन व पर्यवेक्षण

३ विस्तार अधिकारी (शिक्षण) / केंद्रप्रमुख

बीट/केंद्रस्तरीय मार्गदर्शन, पर्यवेक्षण व संनियंत्रण

४ मुख्याध्यापक

शाळा पातळीवर समूहांची स्थापना, उपक्रम / वेळापत्रक ठरवणे व कार्यवाही करणे,

५ वर्गशिक्षक/समूह समन्वयक

विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, बैठकांचे आयोजन ( शिक्षक व पालक) आणि कृत्ती अहवाल तयार करणे विद्यार्थी समूह स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावरील सुयोग्य समन्वयनासाठी मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या आहेत. याविषयी कोणतीही शंका असल्यास DIET मधील नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करावा.


Digitally signed by

RAHUL ASHOK REKHAWAR Date: 03-09-2025 20:38:06


(राहूल रेखावार भा.प्र.से.)

 संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली विद्यार्थी समूह शाळास्तर वर्ग स्तर संपूर्ण मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

प्रत माहितीस्तव सविनय सादर:-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

२.मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे.

१. मा. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तवः-

२. मा. संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे.

३. मा. संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे

४. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

५. शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद (सर्व)

६. गटशिक्षणाधिकारी (सर्व)


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. उपक्रमांचा भडीमार होतोय सर..

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.