HSC Examination 2026 Update - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी वेळापत्रक!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४

प्रकटन •

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२६ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, III (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocatioanl Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा

नियमित शुल्क

सोमवार, दिनांक ०८/०९/२०२५ ते

मंगळवार, दिनांक ३०/०९/२०२५

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख / प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे-

१. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISE मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. UDISE मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल. २. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्यांची माहिती UDISE मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.

 

(देविदास कुलाळ)

सचिव,

राज्य मंडळ, पुणे-०४.

दिनांक - ०४/०९/२०२५



उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणा मडळामार्फत घेण्यात येणान्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ


इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदन SARAL DATABASE वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे उम्म माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र


(Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व मुख्ळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit पेणारे विद्यार्थी) से विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने दि ३०/१०/२०२४ पर्यंत भरावयानी होती. सदर तारखांना मुदतवाढ देण्यात येत असूम मुदतवाढीच्या तसेच शुल्क व कागदपत्रे जमा करावयाच्या तारखांचा तपशील खालीलप्रमाणे- उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी

विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा

नियमित शुल्क (मुदतवाढ)

गुरुवार, दिनांक ३१/१०/२०२४

गुरुवार, दिनांक १४/११/२०२४

विलंब

शुकवार, दिनांक १५/११/२०२४

शुकवार, दिनांक २२/११/२०२४


सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून नी अयुक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यागप्रमाणे पडताळणी केलेवाचवत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख प्राचार्य यांनी प्रिलिस्तव्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्याथ्यांनी आवेदपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालीीर महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहेत-

२. उन्य माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी SARAL DATABASE मध्ये विद्यार्थ्यांनी नोद असणे आवश्यक आहे. सदर SARAL DATABASE वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational)/औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नियमित विद्यार्थ्यांची माहिती SARAL DATABASE मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित पध्दतीने ऑनलाईन भरावयाची आहेत, याची नोंद मेण्यात यावी.

३ सर्व उन्न माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी Website द्वारे प्राप्त Online गलनावर नमूद केलेल्या ICICI स्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून RTGS/NEFT द्वारे चलमाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा व गलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा कराचे रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्याथ्र्याच्या application status मध्ये Draft" या "Send to Board" Payment status मध्ये Not Paid" चा "Paid" असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा "Send to Board" "Paid" Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उवरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व व्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही.

यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/Axis Bank च्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरुपात शुल्क स्विकारले जाणार नाही. शाला तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड कसले एक विशंवा एकापेक्षा अधिक पलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्याभ्यांचे Status Update होईल

६ उन्न माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर बोलेल्या सर्व आवेदनपत्रर्शने विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांनी प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीन. ७ विलय शुलकाने आवेदनपत्रे सादर करण्याम्या तारखांना मुदतवाव देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नींद घेण्यात यावी.

८ अतिविलंय शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील. उपरोक्त सर्व बाबी आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उन्य माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.



राज्य मंडळ, पुणे-०४.









 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.


॥ प्रकटन |


विषय :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणान्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रु मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE बस्न ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit [घेणारे विद्यार्थी) से विषय घेऊन प्रविष्ठ होवू इच्छिणान्या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे त्याचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे 

www.mahahsscboard.in

 या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.


उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला, व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरून ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्याचे आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा. 


नियमित शुल्क

सोमवार ०९ ऑक्टोबर २०२३

ते सोमवार ०६ नोव्हेंबर २०२३


उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख / प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.


सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज (College Login) मधून Pre-list उपलब्ध करून दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत प्राचार्य ज्यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.


इ. १२वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या 

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात येणे आवश्यक आहे- १. शासननिर्णय क. गव्ह१५१७/ प्र.क१९ संगणक, दि. १४/०८/२०१७ नुसार उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. सदर Saral Database वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. २. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational)/ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नियमित विद्यार्थ्यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित पध्दतीने ऑनलाईन भरावयाची आहेत, याची

नोंद घेण्यात यावी...


दिनांक - ०६/१०/२०२३


(अनुराधा ओक) सचिव,

राज्य मंडळ पुणे- ४.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.