प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४ आयोजन करणे बाबत SCERT चे निर्देश.

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम २०२३-२४ आयोजन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


रंगोत्सव कार्यक्रमात, सादरीकरण करण्याच्या दृष्टीने शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी/शिक्षकांसाठी राज्यस्तरावरील रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी खुला आहे. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, व Story Telling या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांना विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओ

 https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6 या लिंकमध्ये माहिती भरून अपलोड करावयाचे आहेत.

राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे सहकार्याने सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि व्हिडीओची लिंक पेस्ट करणे याबाबत सूचित करावयाचे आहे. दि. ७ मार्च २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरून वरील ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक या प्रमाणे व्हिडीओची लिंक दि. ७ मार्च २०२४ पर्यंत लिंकवर पेस्ट करणे हे करणे अपेक्षित आहे.

तद्नंतर लिंकवर प्राप्त व्हिडीओंचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर ३ परीक्षकांची एक समिती गठीत करून उत्कृष्ठ व्हिडीओंची निवड करण्यात येऊन दि. १८ व १९ मार्च रोजी राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल.

राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका गटास, विविध उत्कृष्ट कृर्ती पैकी उत्तम सादरीकरण, उत्तम परिणामकारकता, गटातील एकसंघ भावना इत्यादी करिता प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच सर्व सहभागी गटांना प्रमाणपत्रे दिली जातील. राज्यस्तरावर उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.

यासाठी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असे पाहावे. रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडीओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट करणेसंबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.


सोबत- १. मार्गदर्शक सूचना

मा. संचालकांच्या मान्यतेनुसार


 (डॉ. माधुरी सावरकर)

 उपसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३०




वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.