अत्यंत महत्त्वाचे -
प्रति,
1. उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,अमरावती,छत्रपती संभाजीनगर ,मुंबई,नाशिक,
नागपूर.
2. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
3. शिक्षण प्रमुख मनपा (सर्व)
4. प्रशासन अधिकारी ( सर्व मनपा)
5. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक ),जि. प. (सर्व)
6. शिक्षण निरीक्षक (पश्चिम,दक्षिण व उत्तर ) मुंबई.
7. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व).
8. प्रशासन अधिकारी ( न.पा ) (सर्व).
*विषय* - माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम सन 2025- 2026 अंतर्गत नोंदणीसाठी पाच दिवस मुदतवाढ देणे (दि.04/08/2025 ते दि.08/09/2025) बाबत.
मा. महोदय,
NCERT व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने समृध्दी कार्यक्रम सन 2025 - 2026 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. *दि.01/10/2025,(अंदाजे) रोजी SCERT येथे या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शिक्षक यांचेसाठी हा समृध्दी कार्यक्रम आहे.
समृध्दी कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षक यांना स्पर्धेत सहभागी होणेसाठी video लिंक अपलोड करायची अंतिम मुदतवाढ दि.04/09/2025 ते दि.08/09/2025 सायंकाळी ठिक 6.00 वाजे पर्यंत आहे. समृद्धी कार्यक्रम बाबतची लिंक या प्रमाणे आहे-
https://forms.gle/ZAZUQ696XCGwGN5U6
तदनुषंगाने ,यासंदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व यांनी समृद्धी कार्यक्रम संदर्भात आपल्या जिल्हयातून नोंदणी वाढावी यासाठी उचित प्रयत्न करण्यात यावे, ही विनंती.
कला व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे-30.
राज्यस्तरीय समृद्धी कार्यक्रम २०२५-२६ साठी शाळांनी नोंदणी करणेसाठी.
समृद्धी कार्यक्रमासाठी (स्पर्धा) २०२५-२६ साठी ही माहिती संकलित करण्यात येत आहे. समृद्धी उपक्रमाचे पत्र व मार्गदर्शक सूचना वाचून मगच हा फॉर्म भरावा. संपूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये लिहावी. फोन क्र. व ईमेल आय डी बरोबर लिहावेत. इयत्ता ९वी ते १२वी च्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षक समृद्धी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी यात माहिती भरू शकतात. शाळेतील एक कला शिक्षक आणि एक विषय शिक्षक अशा २ व्यक्तींचा संघ यांनी आपल्या शाळेतील
गोष्टी, खेळ आधारित अध्यापन, कला व क्रीडा या माध्यमातून शिक्षण (Experiential Learning) यासंबंधी २० मिनिटांचा व्हिडीओ तयार करून त्याची लिंक अपलोड करावयाची आहे. तसेच व्हिडीओ लिंकला access देण्यात यावा. प्रत्येक शाळा एक कृती किंवा उपक्रम याची नोंदणी करू शकतात.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments