Students' Aadhaar Update 2025-26 - राज्यातील विद्याथ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण बाबतची कार्यवाही करणे 04/09/2025 संचालक निर्देश

राज्यातील विद्याथ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण बाबतची कार्यवाही करणेबाबत  शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांनी दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्याचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (CRC) ०२ प्रमाणे एकूण ८१६ आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते, मटस्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज पूर्ण करुन घेण्यात याचे.

राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नोंदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी Draft Box मध्ये असल्याचे आढळूनयेत आहे. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत त्यापैकी नादुरुस्त संच वगळता उर्वरित कार्यरत संचाचा उपयोग करुन आधार विषयक सर्व प्रलंबित कामकाज होणे आवश्यक आहे, उक्त आधार नोंदणी संच (Aadhar Enrolment Kit) यांचा उचित उपयोग करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करुन घेणेत यावीत उदा. आधार नोदंणी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार मध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे.

२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाची विचारात घेण्यात याव्यात. भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेण्याकरीता पक्का रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी.

३. तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोण कोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजासाठी येणार आहेत अशा शाळा निश्चित करणे आवश्यक आहे.

४. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुद्दा

क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

५. संचमान्यता आधार व्हॅलिड विद्यार्थी संखेच्या आधारावर होणार असल्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील mis-match, invalid आणि आधार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार बाबतची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे.

६. गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील आधार प्रलंबित शाळांचा आढावा घेऊन तालुक्यास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधार नोंदणी संचाच्या कामकाजाचे अचूक नियोजन करावयाचे आहे, नियोजन करतांना केंद्रनिहाय करण्यात यावे तसेच एखाद्या शाळेत जास्त विद्यार्थी प्रलंबित असल्यास आधार नोंदणी संच (यूनिट) सदरहू शाळेस प्रलंबित कामाकरीता उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.

७. गटशिक्षणाधिकारी यांनी दररोज तालुक्यात कार्यरत आधार नोंदणी संच ऑपरेटर यांचेकडून शाळांकडील आधार नोंदणी व अपडेशन यांचा आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार संबंधित ऑपरेटर यांचेकडून सर्व कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

८. तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेले आधार नोंदणी संघ किरकोळ कारणांमुळे नादुरुस्त झाले असल्यास, कार्यालयाकडे उपलब्ध निधीमधून दुरुस्ती करून घेण्यात यावे व नादुरुस्त संच त्वरीत सुरु करुन घेण्यात यावेत.

९. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करून देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.

१०. दि. ३० सप्टेंबर, २०२५ पूर्वी शाळेतील सर्व विधाण्यांच्या आधार विषयक नोदी अद्यावत करून सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुख्खांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.

११. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरून वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले जातील, त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्वे क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे.

ब. सरल ड्रॉपबॉक्स बाबत कार्यवाही करणे :-

१. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता Drop Box मध्ये दिसणारे तसेच शाळास्तरावर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत attach (प्रवेशित) करणे आवश्यक आहे.

२. सरल प्रणाली अंतर्गत कार्यरत स्कूल पोर्टलवरील (School Portal) मधील Drop Box मध्ये अद्यापही १३.८४ लक्ष विद्यार्थी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. सोबत जिल्हानिहाय विवरण तक्ता जोडण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्ह्यांनी कार्यवाही करावी.

४. शाळा लॉगिनवरील Drap Box मध्ये दिसणारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणेकरीता त्यांची Drop Box मधील नोद कमी होऊन शाळेत attach आवश्यक आहे.

५. प्रस्तुत बाबत शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय आढावा घेऊन प्रलंबित शाळा व तालुक्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत तसेच याबाबत नियमितपणे आढावा घेऊन (Drop Box मध्ये दिसणारे सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.

६. Drop Box मध्ये दिसणारे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी यांना इन केलेनंतरच सदर विद्यार्थ्यांची नोंद SAHAI प्रणालीमध्ये कायमस्वरूपी संग्रहित होते तसेच शाळेला कोणत्या विद्यार्थ्यांची नोंद प्रलंबित आहे हे स्पष्टपणे दिसते, त्यामुळे आवश्यक असल्यास follow-up करुन पुढील कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी.

७. तसेच वरिष्ठ कार्यालयास विद्यार्थ्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेत, Drop Box च्या माध्यमातून मागील शाळेने विद्यार्थ्यांची नीद सोडली आहे की नाही आणि नवीन शाळेने प्रवेश मंजूर केला आहे की नाही याचा आढावा घेता येतो.

क. अपार आयडी (APAAR-Automated Permanent Academic Account Registry) बाबत कार्यवाही करणे

१. केंद्रशासन निर्देशानुसार शाळांमध्ये प्रवेशित सर्व इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना U-DISE प्रणालीचा वापर करून APAAR ID (१२ अंकी एकमेव ओळख क्रमांक) उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत.

२. APAAR ID मार्फत सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये एकाच विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी एकम ओळख क्रमांक उपलब करुन देण्यात येतो तसेच अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक नोंदी, प्रमाणपत्रे व इतर माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे, तसेच विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थांमध्ये बदल केल्यास पूर्व माहिती आपोआप नवीन संस्थेस हस्तांतरित होणार आहे.

३. APAAR ID हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एकमेव युनिक आयडी असल्यामुळे विद्यार्थ्यांची पुनरावृत्ती (Duplication) बाबतच्या नोंदी टाळता येतात. APAAR ॥ मुळे विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्त्या व शासन योजनांसाठी पात्रतेची सोपी पडताळणी करता येऊ शकते.

४. राज्यातील विद्यार्थ्यांच्या APAAR ID जनरेशन बाबतचा आढावा घेण्यात आला असता अद्यापही २० टक्के विद्यार्थ्यांचे APAAR ID तयार करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. APAAR ID विद्यार्थ्यांच्या भविष्याकरीता महत्याचा क्रमांक असल्यामुळे सदर बाबीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि (माध्यमिक) यांनी सदर कामास प्राधान्य देण्यात येऊन प्रलंबित विद्यार्थ्यांचे APAAR ID दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात यावे.

वरील सर्व कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने सर्व शिक्षणाधिकारी यांनी योग्य ते नियोजन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी.


(महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत माहितीकरीता सविनय सादरः

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व

वरील संपूर्ण परिपत्रक आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक १०० टक्के प्रमाणित करण्याबाबत  शिक्षण आयुक्तांनी दिनांक एक एप्रिल 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.



राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इ. श्ली ते इ. १२वी मध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्याथ्यांचे युडायस प्लस व सरल पोर्टलमधील स्टूडेंट पोर्टलवर आधार नोंदणी/अद्ययावत करणाचे काम पूर्ण करुन संबंधित विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाची खात्री (Validation) करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावरुन वेळोवेळी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शालेय शिक्षण विभगांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार, शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत दुर्बल, वंचित घटकाकरीता २५टक्के प्रवेश प्रक्रिया तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. संदर्भ क्र ३ व ४ अन्वये विविध सवलती व वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभाच्यर्थ्यांपर्यंत पारदर्शी पध्दतीने पोहचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच संदर्भ क्र.६ अन्वये मा. मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार नोंदणी करण्याबाबत सूचना प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. याबाबत मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांचेकडून देखील वारंवार आढावा घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत राज्यात एकूण ९४.७२ टक्के विद्याथ्यांचे आधार प्रमाणित झाले आहेत. विविध कारणास्तव विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित न होणे, आधार कार्ड उपलब्ध नसणे यामुळे १०० टक्के काम पूर्ण होताना दिसून येत नाही.

उर्वरित ५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीबाबत शाळा, केंद्र व तालुकास्तवर सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे, यासाठी तालुकास्तवरावरून कांही शाळांकरिता मिळून एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. प्रत्येक शाळेतील ज्या विद्याथ्यांचे आधार प्रमाणित झालेले नाही त्या विद्यार्थ्यांचे नाव व कारणासह यादी शाळांनी तयार करावी, या विविध कारणांचा आढावा घेऊन अशा विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने कार्यवाही करता येईल. ज्या शाळांमध्ये जास्त प्रमाणात आधार प्रमाणित नसलेले विद्यार्थी संख्या असेल तेथे स्वतः गटशिक्षणाधिकारी अथवा वर्ग-२ दर्जाचे अधिकारी यांनी भेट देऊन आधार विषयक कार्यवाही पूर्ण करावी.

युडावस प्लस व सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगीनवर सर्व संख्यात्मक व शाळा/विद्यार्थी निहाय माहिती उपलब्ध आहे. या महितोद्वारे आधार प्रमाणित करण्यात मागे असलेल्या शाळा पाहता येतात, या माहितीच्या आधारे नियमितपणे आढावा घेऊन प्रत्येक शाळेचा पाठपुरावा करुन आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पूर्ण करता येईल.

तसेच या नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांनी आठवडयातून किमान दोन वेळा केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांचे कडून नियमित आढावा घ्यावा. प्रसंगी शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांचेद्वारा आयोजित केलेल्या केंद्र प्रमुख यांच्या ऑनलाईन आढाव्यामध्ये सहभाग घेऊन येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करावे, याबाबत शिक्षणाधिकारी यांनी आठवडयातून किमान एकदा गटशिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी.

यासाठी दिनांक ०१/०४/२०२५ ते १५/०४/२०२५ वा कालावधीत विशेष मोहिम राबवून प्रत्येक शाळेतील शिल्लक आधार प्रमाणित असलेल्या विद्याथी निहाय काम केल्यास नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये १०० टक्के आधार प्रमाणित करण्याची कार्यवाही पूर्ण होईल.

तसेच, आधार प्रमाणित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या APAAR ID ची देखिल कार्यवाही पूर्ण करावी.

तरी शासन निर्णयामध्ये नमुद बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते नियोजन करुन राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करुन आधार प्रमाणित होतील यादृष्टीने आपल्या विभागातील कार्यवाही पूर्ण करावी व केलेली कार्यवाही वेळोवेळी या कार्यालयास व शासनास अवगत करावी,


आयुक्त (शिक्षण)

(सचिन्द्र प्रताप सिंह. भा.प्र.से.)


प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव :

महाराष्ट्र राज्य, पुणे-१

शिक्षण संचालक

 (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे

२. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे

संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


सर्व विदयार्थ्याच्या आधार क्रमांक वैधता तपासणी १०० टक्के पूर्ण करणेबाबत.

सर्व विदयार्थ्याच्या आधार तपासणीचे करुन १०० टक्के पुर्ण करणेबाबत आपल्या जिल्हयातील जि.प/खाजगी अनुदानति/स्वंय अर्थसाहाय्यित शाळामधील विदयार्थ्यांचे प्रलंबित आधार कार्ड अपडेशन संख्या निहाय यादी तयार करुन आधार कार्ड अपडेशन पूर्ण करण्यासाठी केंद्रस्तरावर २ ते ३ शाळाकरीता प्रत्येकी एक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन व उपलब्ध मशिनाचा वापर करुन आधार तपासणीचे कामकाज १०० टक्के पुर्ण करणेबाबत वेळोवेळी पत्राव्दारे व व्ही.सी. व्दारे निर्देश देण्यात आले होते. तरीही आपल्या जिल्हयाचे कामकाज प्रभावीपणे पुर्ण झाल्याचे दिसुन येत नाही.

अदयापही आपल्या जिल्हयाचे आधार तपासणीचे प्रलबित असल्याचे दिसुन येते. सदर कामकाज विहित मुदती अधिनस्त यंत्रणेचा सुयोग्य वापर करुन विनाविलब पुर्ण करावे मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करणेबाबत पत्र निर्गमित केले आहे. सदर पत्रात सर्व विदयार्थ्याच्या आधार क्रमांक वैधता तपासणी करणे हा मुददा प्राधान्यक्रमाचा आहे यास्तव प्राधान्याने आधार तपासणीचे कामकाज येत्या ८ दिवसात १०० टक्के पुर्ण करणेबाबत पूर्वी सुचित केल्यानुसार प्रलंबित शाळाची यादी तयार करुन अंदाजे २ ते ३ शाळाकरीता एक संपर्क अधिकारी नेमावा व त्यांचे मार्फत सतत आढावा घेड्न पाठपुरावा करुन प्रलंबित कामपुर्ण करण्याची कार्यवाही करावी.

या बाबत मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे स्वतः आढावा घेणार असल्यामुळे सदर कामकाज प्राधान्याने विना विलंब पूर्ण करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि.०७.२.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पर्यत विहित नमुन्यात सादर करावा.


(निलिमा टाके) 

शिक्षण उपसंचालक 

अमरावती विभाग अमरावती


प्रत माहितीस्तव :-

१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर

२. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर

३. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर




महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करणेबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहे. 


शासन पत्र (शालेय शिक्षण विभाग) क. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२५५-अ/एस.डी.१, दि. १५/१२/२०२२.

संदर्भ :-

लिमिटेड यांचेसोबत करण्यात आलेला करारनामा दि. २१/०७/२०२२.

२. मे. आयटीआय प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडील निर्देश पत्र क्र. २४२६ दि. २२/१२/२०२२.

३. ४. प्राथमिक शिक्षण संचबालनालयाकडील निर्देश पत्र क्र. २४७६ दि. ३०/१२/२०२२.

५. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांचे निर्देश दि. २६/०७/२०२४.

राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (CRC) ०२ प्रमाणे एकूण ८१६ आधार नोदणी संघ (Aadhar Enrollment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते. शासनाने गटस्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrolment Kit) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज करण्यासाठी ८१६ आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून घेण्यात आलेली असून, आयटीआय लिमिटेड, मुंबई व बेसिल लिमिटेड या दोन संस्थांना आधार संच हाताळणीकरीता मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नांदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उक्त आधार नोंदणी संघ (Aadhar Enrollment Kit) यांचा उचित उपयोग करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

५. शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करुन घेणेत यावीत उदा. आधार नोदंणी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार मध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे,

२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात, भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरीता पक्का रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी

3. तसेब सदर केंद्रावर नजीकच्या कोण कोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोदणी व अद्ययावतीकरणाच्या कामक येणार आहेत अशा शाज्जा निश्चित करणे आवश्यक आहे.

४. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुद्दा क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

५. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करुन देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.

६. दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्यावत करुन सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.

७. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले जातील. त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे





शिक्षण संचालनालय माध्यमिक मधून दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार मिस मॅच अवैध व आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.


संदर्भिय शिक्षण आयुक्तालयाचे पत्रान्वये मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित आढावा बैठक दि.१५.०९.२०२३ मध्ये विषयांकित प्रकरणी झालेल्या चर्चेमधील सूचनानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील टॉप १० शाळांची निश्चिती करावी. सदर शाळांना दोन वेळा भेटी देवून पडताळणी करुन शाळेत उपस्थित नसलेले व आधार नसलेले विद्यार्थी वगळणेबाबतची कार्यवाही आपल्यास्तरावरून करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि.१४.१०.२०२३ अखेर शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या पडताळणीसह सादर करावा. सदर कार्यवाही करतांना विद्यार्थी शाळाबाहय होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


(दिपक चवणे)

शिक्षण उपसंचालक,

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)



या आदेशानुसार विद्यार्थी आधार नोंदणी, मिस मॅच व अवैध आधार, आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत शाळा स्तरावरील स्थितीची पडताळणी करणेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी उपशिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे या निर्देशानुसार त्यांनी कमीत कमी प्रत्येकी दहा शाळांची याबाबतची पडताळणी करावयाची आहे. 




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.