"हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान" या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची राज्यातील सर्व शाळेत अंमलबाजावणी करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
संदर्भ :- शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२९६/एस.डी.४ दि. २६.०८.२०२५
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्र व सहपत्राची प्रत या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे. (प्रत संलग्न) संदर्भीय शासन पत्रात कळविलेनुसार अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्यावतीने दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये "हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान" हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्यधिष्ठित जीवनविचार विकसित होतील. त्यामुळे महाराष्ट्रतील सर्व शाळांमध्ये (सर्व माध्यमांतून चालना-या) हा उपक्रम राबविण्याबाबत नमूद केले आहे.
सदर विषयी शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक ०१.०९.२०२५ रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान" हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आवश्यक त्या सूचना आपल्यास्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच ज्या जिल्ह्यांना दिनांक ०१.०९.२०२५ रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल, त्या जिल्हातील शाळांमध्ये सदर उपक्रम दि.०२.०९.२०२५ रोजी राबविण्याबाबत सूचित करण्यात यावे.
Digitally signed by Sachindra Pratap Singh Date: 29-08-2025 22:3109
(सचिन्द्र प्रताप सिंह भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य. पुणे.
'हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान' या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची राज्यातील सर्व शाळेत अंमलबजावणी करणेबाबत वरील पत्रातील संदर्भित शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
महोदय,
२संदर्भाधीन पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्यावतीने दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी- शिक्षक एकत्रितपणे शाळा व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प करणार आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शिक्षक एकत्रितपणे शाळेतील स्वच्छता, शिस्तबद्धता व हरितमय वातावरण, विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजविणे, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता व नागरी कर्तव्यांचे पालन, शाळेला केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणून न पाहता राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून पाहणे, नैसर्गिक पर्यावरण व मूल्यांची जपणूक करणे, यासंबंधी प्रार्थनेच्या वेळी शिक्षक विद्यार्थी सामूहिक संकल्प करणार आहेत.
या उपक्रमामुळे विद्याथ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्याधिष्ठित जीवनविचार विकसित होतील. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये (सर्व माध्यमांतून चालणाऱ्या) हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती संदर्भाधीन पत्रान्वये करण्यात आली आहे.
३. संदर्भाधीन पत्रातील विनंतीप्रमाणे दिनांक ०१ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्याबाबत आवश्यक त्या सूचना आपल्यास्तरावरून निर्गमित करण्यात याव्यात. तसेच ज्या जिल्ह्यांना दिनांक ०१ सप्टेंबर, २०२५ रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल, त्या जिल्ह्यातील शाळांमध्ये सदर उपक्रम दिनांक ०२ सप्टेंबर, २०२५ रोजी राबविण्याबाबत सूचित करण्यात यावे, ही विनंती.
आपला,
Digitally signed by Aniruddha Avinash Kulkarni Date: 2025.08.26 18:59:28 +05'30'
सहपत्र : वरीलप्रमाणे.
(अ.अ. कुलकर्णी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments