गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र जिल्हा परिषद आदर्श शाळा वरखेड!
वरखेड येथील जिल्हा परिषदेची शाळा ही एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी ग्रामीण भागातील शाळा म्हणून समोर आली आहे. या शाळेत आजूबाजूच्या 23 गावातील 463 विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत शाळेला अनेक भौतिक सोयी सुविधा मिळाल्यामुळे शाळेमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र, रोबोटिक लॅब, संगणक कक्ष, इंटरनेट वाय-फाय, प्रत्येक खोलीत प्रोजेक्ट इंटर ऍक्टिव्ह बोर्ड, बालस्नेही सुसज्ज वर्गखोल्या, खुले विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांसाठी आरो वॉटर फिल्टर प्लांट यासारख्या भौतिक सुविधांनी शाळा सुसज्ज झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शाळेत विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम देखील राबवले जातात.
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्र अमोल हाके सर यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच पुरवले जातात सामान्य ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते व दर महिन्याला सामान्य ज्ञानावर आधारित शंभर गुणांचा पेपर देखील घेतला जातो.
कैलास पाटील यांच्या नेतृत्वात शालेय परसबागेची कामकाज पाहिले जाते. शालेय परत बागेतून उत्पादित भाजीपाला व फळभाज्या यांचा वापर विद्यार्थ्यांसाठी मध्यान्य भोजनाअंतर्गत केला जातो.
शुभम बुरुकुल यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना संगणक व रोबोटिक्सचे धडे दिले जातात त्यामुळे आधुनिक युगाला सामोरे जाणारे विद्यार्थी शाळेत तयार केले जातात.
उर्मिला शेळके विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश चे धडे देतात ज्यामुळे विद्यार्थी अस्खलित इंग्रजीमध्ये संभाषण करू शकतात.
संजय बावस्कर सर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी मैदानावर आपली गुणवत्ता सिद्ध करतात खो-खो, कबड्डी, रिले बॅडमिंटन लांब उडी उंच उडी भालाफेक गोळा फेक यासारख्या अनेक क्रीडा प्रकारात विद्यार्थी पारंगत झाले आहे व त्यांनी तालुका जिल्हा विभागीय स्तरापर्यंत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
मंगेश झगरे सर यांच्या नेतृत्वात शाळेत विद्यार्थी बचत बँक चालवली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांना बँकेची प्रत्यक्ष व्यवहार याचा अनुभव व बचतीची सवय याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून जागृत केले जाते.
वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षा व स्कॉलरशिप साठी विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते.
तसेच श्याम सुरोशे सर यांच्या नेतृत्वात आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना एन एम एम एस सारख्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार केले जाते तसेच आठवीच्या स्कॉलरशिप साठी देखील विद्यार्थ्यांची विशेष तयारी घेतली जाते.
वर्षभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम रतिराम गायकवाड सरांच्या नेतृत्वात पार पाडले जातात यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव मिळतो.
भागवत पाटील सर विद्यार्थ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर शालेय वस्तू भांडार चालवतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू कमी दरात शाळेतच उपलब्ध होतात.
इंद्रजीत मोरे सर विद्यार्थ्यांना हार्मोनियम तबला यासारख्या संगीत साहित्याचे प्रशिक्षण देतात त्यामुळे विद्यार्थ्यांना गायन वादन याबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळते.
भागवत सवडतकर सर विद्यार्थ्यांना वेगवेगळी व्यावसायिक कौशल्य अवगत करून देण्यासाठी शाळेत उपलब्ध व्यावसायिक केंद्रातील वेगवेगळ्या साहित्यांचा वापर प्रत्यक्ष व्यवसाय करताना कसा करता येईल याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतात.
दयाल जाधव सर विद्यार्थ्यांना सीबीएससी पुस्तकातील महत्त्वपूर्ण संकल्पना विशेष प्रयत्न करून अवगत करून देतात.
त्या त्या विषयात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत विशेष वर्ग घेऊन त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्याचा प्रयत्न केला जातो.
विलास साळवे सर विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची गोडी लावण्यासाठी त्यातील व्याकरण अतिशय सोप्या व सुलभ भाषेत अवगत करून देतात.
इंग्रजी व विविध तंत्रज्ञानाचे धडे प्रदीप जाधव हे विद्यार्थ्यांना देतात तसेच एन एम एम एस व स्कॉलरशिप साठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात.
शाळेत कला क्रीडा व कार्यानुभव शिकवण्यासाठी अतिथी निदेशक म्हणून ज्ञानेश्वर शेळके, कुटे सर व नरवाडे सर ही कार्यरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाबाबत अधिक विशेष मार्गदर्शन मिळण्यास मदत होते.
वरील सर्व उपक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापक शरद बंगाळे शाळा व्यवस्थापन समिती व अध्यक्ष गणेश भगत हे काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी तत्पर असतात.
शैक्षणिक सत्र 2024 25 आठव्या वर्गातील सात विद्यार्थ्यांनी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. वर्ग आठवीची एक विद्यार्थिनी राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक झाली आहे. आतापर्यंत गेल्या दोन शैक्षणिक क्षेत्रात दोन विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा पास होऊन नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरले आहे. जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तनिषा तांबट या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच फोर बाय फोर रिले स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. शाळेतील दोन विद्यार्थी खो-खोच्या विभागीय संघात खेळले आहे.
वरखेड आदर्श शाळेतील विद्यार्थी संख्या ही 2018 पासून सतत वाढत आहे याचे कारण म्हणजे शाळेतील प्रत्येक शिक्षक हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे थीम बेस लर्निंग, टेक्नॉलॉजी बेस लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग यासारख्या नवीन 21 व्या शतकातील कौशल्य अवगत करून देण्यासाठी विशेष प्रशिक्षित आहेत. तसेच सर्व शिक्षक हे उच्च शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारक आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा विश्वास शाळेवर निश्चितच वाढलेला आहे.
नुकतेच गुलाबराव खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी शाळेची पाहणी वजा तपासणी करून विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments