महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा
OW/2026/G/102
दि. २०/०७/२०२६
जाहीर प्रकटन
दि. ०७ जुलै, २०२६ रोजी सेट विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. सदर प्रकटनात ४१ व्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख दि. ६ सप्टेंबर, २०२६ अशी जाहीर करण्यात आली असून या तारखेबाबत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील १५ दिवसांत सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.
परंतू दि. ६ सप्टेंबर, २०२६ रोजी CTET ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित रहावे लागेल, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांचे ईमेल व पत्र सेट विभागास प्राप्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचीत राहू नये यासाठी दि. ६ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा दि. २७ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
समन्वयक, सेट परीण ७/२०२७
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा
OW/2026/G/96
दि. ०९/०७/२०२६
जाहीर प्रकटन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे.
दि. ६ सप्टेंबर, २०२६ रोजी ४१ व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत करण्यात आले आहे. विलंब शुल्कासहित परीक्षा अर्ज भरण्याची मुदत दि. ७ जुलै, २०२६ रोजी संपुष्टात आली. परंतु सदर काळात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागात इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आले नाहीत असे मेल सेट विभागास प्राप्त झाले आहेत.
त्यामुळे विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी विलंब शुल्कासहीत सेट परीक्षा अर्ज भरण्याची मुदत दि. १३ जुलै, २०२६ ते दि. २३ जुलै, २०२६ अशी वाढविण्यात येत असून अर्ज भरताना त्यात काही चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्यासाठीची मुदत दि. २४ जुलै, २०२६ ते २६ जुलै, २०२६ अशी देण्यात येत आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
समन्वयक, सेट परीक्षा

26 जुलै 2026 रोजी होणारी SET परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे.
MPSC परीक्षा आणि आषाढी वारीमुळे होणारा संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन SET विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
📌 नवीन संभाव्य परीक्षा दिनांक : 6 सप्टेंबर 2026
विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून घेतलेला हा निर्णय हजारो परीक्षार्थ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
👉 अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. सर्व उमेदवारांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा.
#SET2026 #SETExam #SPPU #ExamUpdate
महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)
(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा
OW/2026/G/95
दि. ०७/०७/२०२६
जाहीर प्रकटन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे.
दि. २६ जुलै, २०२६ रोजी ४१ व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले होते. परंतु दिनांक २६ जुलै, २०२६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीकरिता विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित रहाता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल.
तसेच दि. ७ जुलै, २०२६ ते २५ जुलै, २०२६ या काळात आषाढी वारीचे आयोजन असल्याने, २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि परीक्षार्थी वेळेत परीक्षेस पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. या दोन्ही पार्श्वभूमीवर दि. २६ जुलै, २०२६ रोजीची सेट परीक्षा पुढे आयोजित करण्याबाबत विद्यार्थ्यांची निवेदने प्राप्त झाली आहेत.
सबब, दि. २६ जुलै, २०२६ रोजीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचीत राहू नये यासाठी दि. २६ जुलै, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख ६ सप्टेंबर, २०२६ अशी जाहीर करण्यात येत असून ह्याहीबाबतीत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील १५ दिवसांत सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
समन्वयक,
सेट परीक्षा

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा
दि. २७/०६/२०२६
OW/2026/G/87
दि. २६ जुलै, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या सेट परीक्षा जाहिरात क्र. १२ चे शुद्धीपत्रक आणि सेट परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ.
सेट परीक्षेची जाहिरात क्रमांक १२, दिनांक २८ मे, २०२६ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध वर्तमानपत्रात तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. संकेतस्थळावरील जाहिरातीत व माहितीपुस्तकात खालीलप्रमाणे उल्लेख केला होता.
संवर्ग
नियमित शुल्क
विलंब शुल्कासह शुल्क
१. खुला
रु. ८००/-
रू. १,३००/-
२. इतर मागासवर्गीय/भटक्या व विमुक्त जाती जमाती/सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)*/खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS)/आणि विकलांग प्रवर्ग (PWD)/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/तृतीयपंथी / अनाथ
रु. ६५०/ー
रू. १,१५०/-
त्याऐवजी जाहिरात व माहितीपुस्तक खालीलप्रमाणे वाचावे
संवर्ग
नियमित शुल्क
विलंब शुल्कासह शुल्क
१. खुला
रू. ८००/-
रू. १,३००/-
२. इतर मागासवर्गीय/भटक्या व विमुक्त जाती जमाती / सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग/विशेष मागास वर्ग (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)*/
रु. ६५०/-
रू. १,१५०/-
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS)/आणि विकलांग प्रवर्ग (PWD)/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/तृतीयपंथी / अनाथ
त्यानुसार सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक २७ जून, २०२६ ते ०३ जुलै, २०२६ अशी विनाविलंब शुल्क मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच दिनांक ४ जुलै, २०२६ ते ७ जुलै, २०२६ अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देण्यात येत आहे. यापूर्वी विशेष मागास प्रवर्गाच्या ज्या विद्यार्थ्यांनी विशेष मागास प्रवर्गाव्यतिरीक्त इतर प्रवर्गातून सेट परीक्षा अर्ज भरले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात संवर्ग दुरुस्त करण्यासाठी दिनांक ८ जुलै, २०२६ ते १० जुलै, २०२६ अशी मुदत देण्यात येत आहे. उपरोक्त विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गाच्या संभाव्य आरक्षणाबाबत शासनाचे या संबंधीचे आदेश व मार्गदर्शन तसेच मा. उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातील याचिका क्र. ५८८५ च्या अधीन राहून कार्यवाही करण्यात येईल.
प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट परीक्षा)
0 टिप्पण्या