Promotion Update - पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत शिक्षण संचालक आदेश.

 महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 2 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


संदर्भः-१. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१/दि.७/२/२०१९ २.मा.श्री. संजय केळकर, आमदार विधानसभा यांचे दि.११-६-२०२४ चे पत्र ३. श्री. राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.प.न.प/म.न.पा) यांचे पत्र क्र.१०३/२४/दि.११/६/२०२४


उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, जिल्हा परिषदांमध्ये विज्ञान / गणित विषयाचे शिक्षक पदे रिक्त आहेत. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपुर्वी सद्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाजेष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार इयत्ता ६ वी व इयत्ता ८ वी करीता विज्ञान/गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदांच्या मर्यादत पदोन्नतीची प्रक्रिया आपल्या स्तरावरून शासन नियमानुसार राबविण्यात यावी.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे


प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव-शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.