सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील थकित देयकांबाबत करावयाची कार्यवाही शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 8 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्र. शिसंमा/२०२६/टि-७/थकित वेतन/
दिनांक :- ०८ /०७/२०२६.
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. सर्व
२. अधीक्षक, वेतन पथक व भनिनि (माध्य), सर्व
विषय :- सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील थकित देयकांबाबत करावयाची कार्यवाही.
संदर्भ : १. अधीक्षक, वेतन पथक माध्य सातारा यांचे पत्र जा.क्र. शिक्षण/वेपसा/२०२६-२७/१९६७६०९ दिनांक ०१/०६/२०२६.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन २०२५-२६ मध्ये संचालनालयाच्या स्तरावरुन मान्य करण्यात आलेल्या तथापि, संबंधितास अदा न झालेल्या देयकाची सध्यःस्थिती व यासंदर्भात करावयाची कार्यवाही बाबत पुढील प्रमाणे कळविण्यात येत आहे.
अ.क्र.
देयकाची स्थिती
करावयाची कार्यवाही
संचालनालय स्तरावरुन मान्य करण्यात आलेले (Approved) तथापि आदेश पारित न केलेले देयके
सदरील देयकाची सन २०२६-२७ मधील आदेश संचलनालय स्तरावरुन निर्गमित करण्यात येतील. देयके पुनश्चः सादर करण्याची आवश्यकता नाही.
सदरील देयके पुनश्चः मान्यतेस्तव विहित अ, ब, क प्रपत्रात मान्यतेस्तव शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावी.
संचालनालय स्तरावरुन मान्य करण्यात आलेले (Approved) व आदेश पारित करण्यात आलेली (Order Generate)
संचालनालय स्तरावरुन आदेश पारित करण्यात आलेली, तथापि बीडीएस न काढता आलेली देयके
बीडीएस Revert करण्यात यावी व सदरील देयके पुनश्चः मान्यतेस्तव विहित अ, ब, क प्रपत्रात मान्यतेस्तव शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावी.
संचालनालय स्तरावरुन आदेश पारित करण्यात आलेली, तथापि बीडीएस (Generate) करुन ही कोषागारात सादर न होऊ शकलेली देयके.
सदरील देयके पुनश्चः मान्यतेस्तव विहित अ, ब, क प्रपत्रात मान्यतेस्तव शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावी.
संचालनालय स्तरावरुन आदेश पारित करण्यात आलेली तथापि, बीडीएस (Generate) होऊन कोषागारात दाखल केलेली, पंरतू कोषागाराने अमान्य केलेली देयके.
करिता रकाना क्र २ मध्ये नमूद केलेल्या सन २०२५-२६ च्या थकित देयकाबाबत यापुढे नमूद केले प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देणे बाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 26 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.
शिसंमापु/शिक्षक-शिक्षकेत्तर/टी-५-६-७/२६-२७/
दि.२३/०६/२०२६
प्रति,
१. मुख्य लेखा व वित्त अधिकारी संबधित सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संबधित सर्वे
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संबधित सर्व
४. शिक्षण निरिक्षक (मुंबई उत्तर/ पश्चिम / दक्षिण) सर्व
५. अधिक्षक वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व
विषय- सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देणे बाबत.
संदर्भ -१. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे व्हाईट बुक २०२६-२७
२. वित्त विभाग परिपत्रक अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/ अर्थ-०३/दि.०९/०४/२०२६
३. बीम्स वरील खर्चाचा आढावा.
शासन स्तरावरून त्या त्या आर्थिक वर्षात मंजूर व प्राप्त अनुदानातून देयक अदा करतांना त्या आर्थिक वर्षातील माहे मार्च ते फेब्रुवारी या महिन्याचा नियमित वेतनाचा खर्च भागविणे क्रमप्राप्त आहे. तसेच वेतना व्यतिरिक्त अन्य देयकासाठी आवश्यक असणारे जादाचे अनुदान उपलब्ध असल्याचे अथवा उपलब्ध करून देण्याची खात्री करूनच देयके अदा करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
सन २०२६-२७ मध्ये मंजूर अनुदानाच्या ६० टक्के अनुदान प्राप्त झाले असल्याने संदर्भ ०२ मुद्दा क्र.२१ नुसार डिसेंबर अखेर पर्यत नियोजन पुर्वक यथा नियम ५० टक्के अनुदान खर्च करता येणे शक्य होणार आहे.
ज्या लेखाशिर्षात प्राप्त ६० टक्के अनुदानातून ९ महिन्याचा खर्च भागवून बचत दिसत आहे त्या लेखाशिर्षात उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून उपलब्धतेनुसार मा. न्या. प्रकरणातील थकित देयके नियमित थकित देयके/वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देवून वेळोवेळी (Periodically) अदा करणे शक्य होणार आहे. सबब सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशिर्ष २२०२०४४२,२२०२०४७८,२२०२०५३१,२२०२०५५८,२२०२०५७६,२२०२०५४९,२२०२१९०१ सन 2026-27 या आशरकिवांत वैद्यकीयदेयके अदाकरण्याचीपरवानगी देणेबाबत.
२२०२०४६९,२२०२१९४८, २२०२एच९७३ मध्ये उपलब्ध करून दिलेल्या अनुदनातून सद्या स्थितीत नियमित वेतना व्यतिरिक्त केवळ वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
१. केवळ उपरोक्त लेखाशिर्षामध्ये वैद्यकीय देयके यथानियम शालार्थ प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावे.
२. वैद्यकीय देयके अदा करतांना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबधित वेतन पथक / संबधित कार्यालय यांनी देयके अदा करावीत.
३. शासनाकडून वेळोवळी उपलब्ध करून देण्यात आलेलेल्या अनुदानातून उपरोक्त खर्च भागविण्यात यावा.
४. कोणत्याही परिस्थितीत वेतन ही बाब प्रलंबित ठेवून वैद्यकीय देयके अदा करण्यात येवू नये.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 26-06-2026 08:18:54
(डॉ महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत -१. माहितीस्तव मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांना सविनय सादर.
२. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
३. जिल्हा कोषागार अधिकारी सर्व
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ-
१) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/वे. दे/४५५६ दि. २३/८/२०२४.
३) अधीक्षक, वेतन व भनिनी पथक, (माध्यमिक) अहमदनगर यांचे पत्र क्र. शिअवेभनिनिप/वैदय. देयके/९०५/२०२४ दि. २/१२/२०२४.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. २ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दि. ३०/९/२०२४ अखेर पर्यंतची वैद्यकीय देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन काढण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
तथापि दि. ३०/९/२०२४ नंतर ऑनलाईन वैद्यकीय देयके वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयास प्राप्त झाली असून नियमित वेतन झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्याने शिल्लक अनुदानामधून वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे.
त्यानुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०४६९, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२१९०१ २२०२एच९७३ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी.
उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्रशासकीय मान्यता मिळालेली थकीत देयके अनुदान उपलब्धतेनुसार अदा करण्यात यावी.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई. यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे नमूद लेखाशीर्षासाठी सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. व इतर देयके शालार्थमधून अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य 23 August 2024 चे निर्देश पूढील प्रमाणे.
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्य) संबधित सर्व यांचेकडुन वैद्यकीय देयकाची प्राप्त माहिती.
उपरोक्त विषयास अनुसरून वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांचेकडे दि. १३/८/२०२४ अखेर प्राप्त वैद्यकीय देयक संख्या व त्यासाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती मागविण्यात आली होती.
त्यानुसार वेतन पथक (माध्यमिक) यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२०४६९ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी. (दिन् ३०/९/ 2028 अखेरपर्यंत) उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये प्रशासकीय मान्यता/पुनर्मान्यता मिळालेली थकीत देयके अदा करण्यात नेऊ नये तथापि लेखाशीर्ष २२०२१९४८, २२०२१९०१ व २२०२एच९७३ मध्ये पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने सदर लेखाशीषाअंतर्गत वैद्यकीय देयके शालार्थमधून ऑनलाईन अदा करण्यात येऊ नये.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत- माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई, यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे नमूद लेखाशीर्षासाठी सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी शालार्थमध्ये दिनांक ३०/०९/२०२४ अखेर पर्यंतच टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. व इतर देयके शालार्थमधून अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली मधुन ऑनलाइन अदा करण्या बाबत शिक्षण संचालक यांचे दि 1 डिसें 2023 रोजीचे निर्देश..
दि. २६/१०/२०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.
तथापि शासन पत्र क्र. वेतन-१२२३/प्र.क्र.१०१/टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर, २०२३ अन्वये ऑनलाईन पद्धतीन देयक अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे १ महिन्याचा कालवधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत देयक अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने निर्देश दिलेले आहे.
सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विसित करण्याची कार्यवाही सुरू असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झालेनंतर २२०२०४४२. २२०२०४७८ व २२०२०४६९ या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतूदीमधून वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
तथापि सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार अदा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग, आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात यावी. शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.







0 टिप्पण्या